रविवार, १४ ऑगस्ट, २०११

प्रेम शब्दाचा शोर्ट कट

     आज माहिती तंत्र ज्ञानाच्या प्रगतीमुळे जग फार वेगाने पुढे धावत आहे. प्रत्येक गोष्टी साठी कोणता न कोणता संक्षिप्त मार्ग आहे. कि ज्याच्या उपयोगाने मोठी गोष्ट अगदी थोडक्यात सांगून उरकवता येते. कारण वेळ नाही लोकाकडे. जो तो ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहे, आणि कामाची ती गोष्ट पण त्याला कोणता न कोणता शोर्ट कट वापरून लवकर पूर्ण करून घ्यावयाची आहे. 

     त्यात प्रेम देखील हे सुटलेले नाही. आजच्या तरुण पेढीचे प्रेम थोडे टेक्निकल म्हणावे लागेल. कारण पूर्वी जर कोणी आपले प्रेम एखाद्या व्यक्ती साठी व्यक्त करत असेल तर, त्या वर मोठी, एखादी मनाला आणि हृदयाला भेदणारी कवितेचे निर्मिती होत असे. पण आज तसे आढडून येत नाही. कारण आज माहिती तंत्रज्ञानामुळे सर्वत्र शोर्ट कट चे भूत माजले आहे. जर प्रियकराला फक्त "आय लव यु " सारखे शब्द जरी सांगायचे असतील तरी ते तो फक्त "१ ४ ३ " असे तीन संख्यांचा उपयोग करून दर्शवित असतो.  मुश्किलीने एखादी व्यक्ती कागदावर मनाचे व हृदयातील मोती प्रियकर साठी अंकित करत असेल. आज " १ ४ ३" चा वापर "माझे तुझ्या वर प्रेम आहे." या गोड शब्द ऐवजी शोर्ट कट (पर्याय) म्हणून केला जातो. जे वात्सल्य , प्रेम आणि समर्पणाची भावना  "माझे तुझ्या वर प्रेम आहे." किवा "मी तुला प्रेम करतो " या शब्दात दिसते ती त्या तीन अंकामध्ये दिसून येत नाही. 
     या "१ ४ ३"  मुळे  प्रेम विषयी तरुणे  व तरुणीच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्याचे दिसून येते. जसे आपण रोज नवीन आहार घेत असतो , किवा शॉपिंग मोल मध्ये जावून नव्या वस्तू खरेदी करतो तशी आजची पिढी प्रेम करत असते. त्यांचा ग्रूप पण मोठा असतो. फेसबुक चार असतील, ओर्कुट वर दोन असतील, इतर डेटिंग साईट वर आणखी दोन तीन परिचयाची व्यक्ती असतील....मग काय ? ? ? तेच "१ ४ ३ " ज्याला आधुनिक जगाने "डेटिंग" सारखा शब्द देखील दिला आहे. डेटिंग म्हणजे काय ?तेच, वस्तू आवडली तर घ्या नाही तर पैसे परत. डेटिंग म्हणजे "प्रेमाचे शोर्ट कट" जर म्हटले तरी त्याला अतिशयोक्ती नाही. एक सार्वत्रिक सत्य आहे कि मन हे भोवऱ्या सारखे असते. ते कधी एका जागेवर नसते. या डेटिंग सारख्या प्रथे मुळे त्याला अधिकच चालना मिळाली आहे.
     अहो ! हल्ली तर एस एम एस सारख्या सुविधेचा वापर करून सुद्धा लोक प्रेमाचा पंचनामा करायला लागले आहेत. फक्त एका वाक्यात विचारले जाते. "are you interested in me ?"  किवा  "Do you like me ?" . बस समोरून लगेच उत्तर मिळते. "No, sorry"किवा "Yeah !! My pleasure" फटक्यात प्रेमाची देवाण घेवाण होते. मग कसली कविता नि कसल्या चारोळ्या ? सर्व काही एकदम फटक्यात...आहे ना कमाल ?!! 
     तो दिवस दूर नाही जेव्हा लोक फोन वर किवा इंटरनेट च्या माध्येमाने लग्न पण करतील आणि घटस्फोट पण होतील. प्रेम विषयीच्या गजल , चारोळ्या , शायरी. ग्रंथ हे फक्त साहित्यातच शिल्लक राहील. सर्वत्र एकच सूत्र दिसेल. "वापरा शोट कट आणि मिळवा परिणाम फटाफट"

२ टिप्पण्या: