रविवार, ९ डिसेंबर, २०१२

बायको पाहिजे - भाग 2

indian-bride-in-jwellary
 
      मागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी  मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात "नंदुरबार" जिल्ह्यात गेलो असतांना मला झालेला अनुभव.या भागात आपण वाचणार सुरत शहराचा प्रसंग. गुजरात मध्ये एक वस्तू आढळून येते कि जर कोणी एखादा मराठी माणूस पोलीस खात्यात साधारण पोलीस कोन्स्तेबल जरी असला तरी  त्याचा ठसा वेगळा असतो तो जणू काही एखाद्या कमिशनर च्या पोस्ट वर आहे तसे त्याचे वर्तन समाजात असते.  बाकीच्या समाजात असते कि नाही ते मला माहित नाही पण , कमीत कमी बुद्धिस्ट कम्युनिटी मध्ये हामखास पणे दिसून येते. त्यांचा स्वभाव फारच विचित्र असतो. त्यांचा रग्गटपणा व्यवहारात आणि वर्तुनुकीमध्ये दिसून येतो. समजा रस्त्यावर एखादा "पवार" "सोनवणे" "बैसाणे" "चित्ते "  "रामटेके " "मोहिते " वगैरे पैकी जर कोणी पोलीस दिसून आला आणि जर तुम्ही प्रेमाने सस्मित त्याला राम राम किवा  "जयभिम" म्हटले, तर प्रत्युतर तुमच्या अपेक्षे प्रमाणे तुम्हास मिळणार नाही.त्यांना "राम राम" किवा  "जयभिम" म्हटल्यावर लगेच ते  चिडतील, त्यांना   त्याचे अपमान झाले असे वाटेल आणि रागात  ती व्यक्ती गुजराती मध्ये असे काही तर स्टेटमेन्ट देणार,  "चाल ओये,......आगळ चालतो था " किवा "तारी भेन नो तारी चाल ने निकळ ने"  हे सर्व मी प्रत्येक्ष डोळ्यांनी पहिले आहे. त्यांच्या अश्या वागणुकीमुळे समाजात त्यांच्या पासून अमुक वर्ग दूरच राहतो . कारण त्यां वर्गाला वाटते कि गुजरात मध्ये बुद्धिस्ट कम्युनिटी चा पोलीस म्हणजे माणुसकी नसलेला व्यक्ती. आणि ती म्हण जी आहे ती खरी आहे कि "पुलिस वालो से दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी "... याचा अर्थ असा नाही कि ते समाजा पासून अलिप्त असतात. ते समाजात असतात पण दिसत नाहीत. वास्तविक पणे अमुक पोलिस वर्गाला मराठी असल्याचा अभिमान नसतो. अमुक नेहमी स्वतः ची ओळख लपविण्याचा प्रयत्न करत असतात.मला देखील त्यांचा पासून दूर राहणेच आवडते. संबंध जुळविण्यासाठी त्यांच्यात योग्य आणि व्यावहारिक व्यक्ती शोधणे म्हणजे कोळसाच्या खाणीत हिरा शोधण्या इतके अवघड असते 
     या दोन वर्ष दरम्यान बरीच स्थळे आलीत जिथे मुलीचे वडील , काका किवा मामा पोलीस खात्यात असतील पण मी त्यांना नकार दिला. गेल्या वर्षी गुजरात मधील वापी परिसरातून बी एड झालेल्या मुलीला मला नकार द्यावे लागले कारण एकच होते त्या मुलीच्या मामा चा जास्त  डाम-डीमपणा. वडील, मामा व काका पोलीस खात्यात होते. मुलगी चांगली होती. तिने बी एड केले होते आणि मी बी ए च्या शेवत्याच्या वर्षाची परीक्षा अटेंड करणार होतो. चर्चा करत असतांना मुलीचे वडील जे माझ्या समोर बसले होते एक हि शब्द बोलत नव्हते. जणू काही एखादा लोखंडी लॉक तोंडावर लावला असावा. पण तिचे मामा व काका सतत वट वट करत होते. त्यात मामा चे बोलणे मला खपले नाही ते मला लहान दाखवत बोलत होते "आमची मुलगी तुमच्या पेक्षा जास्त शिकली आहे ती बी एड झाली आहे , तुमच्या पेक्षा जास्त कमवणार , नोकरी तर लगेच लागेल." या ओळी मला ज्या रंगात त्यांनी सांगितले ते मला मुळीच आवडले नाही. मनात विचार आला कि हा व्यक्ती तर लग्न अजून झालेले नाही तोच एवढी वट वट करून धाक दाखवत आहे तो लग्न झाल्यावर कल्याण च करेल. म्हणून मुलगी मला पसंत असून हि "नकार" द्यावा लागला.



     पण या वेळी मला नकार देता आला नाही. आईच्या नात्या  मध्ये एक ६० ते ७० वर्ष वयोगटातील एक म्हतारी आहे. त्यांच्याशी सबंध फार चांगले आहे. मागे दोन आठवड्या पासून ती आजी (म्हतारी) तिच्या मुलाच्या साल्याची साली साठी बोलवत होती. मी पहिल्यांदा चक्क नकार केला.मी सरळ शब्दात सांगितले कि पोलीस खात्याची माणसे व राजकारणी लोक मला चालत नाहीत. तरी ती आजी दर दोन ते तीन दिवसांनी येवून आईच्या काना वर त्या मुली साठी गोष्ट टाकत असे. मी तीन ते चार वेळा नकार दिला त्या गोष्टिला आईचे म्हणणे होते कि ते आपल्या पेक्षा मोठे आहेत चांगल्या परिचयाचे आहेत आणि स्वभाव पण चांगला आहे ते आपल्यास फसवणार नाही एकदा त्यांचा आपण मान ठेवला पाहिजे  मुलगी जाऊन पाहण्यास काय हरकत आहे ? नंतर नकार देता येईल. मी मान्य केले आणि औपचारिकता म्हणून जाण्याचे ठरवले.
     तिथे एक दिवस जाण्या अगोदर आजी ने मला त्यांचा संपर्क नंबर आणून दिला व म्हटले कि तुम्हास तिथे जाण्या अगोदर काही विचारायचे असेल तर ह्या नंबर वर चर्चा करून घ्या.तो नंबर होता त्या मुलीच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा.मी फोन केला. त्या व्यक्तीचे नाव राजेंद्र होते.जे सुरत मध्ये एका प्राईवेट शाळेत एडमिनीस्ट्रेटर होते. रिंग वाजली समोरून फोन उचलला.

"हेलो ...मी जितेंद्र इंदवे बोलत आहे. मला आजी कडून आपला संपर्क नंबर मिळाला ..तर मुली बद्दल मला विचारायचे होते "
समोरून -- "मी राजेंद्र आहिरे..मुलीच्या मोठ्या बहिणीचा हसबंड बोलतोय....काय नाव आपले ?."
मी --"जितेंद्र "
समोरून -- "पूर्ण नाव काय ?"
मी - "जितेंद्र गिरधर इंदवे "
समोरून --"काय करता आपण?"
मी - "मी Computar faculy म्हणून जोब करतो "
समोरून --"कोणत्या शाळेत?"
मी -- "समिती इंग्लिश मिडीयम स्कूल"
समोरून --"कोणत्या सेक्शन मध्ये ?"
मी -- "सेक्शन म्हणजे?"
समोरून --"आपण प्रायमरी मध्ये शिकवतात का ?"
मी --"नाही ..मी इयत्ता 8 वी  पासून तर १२ च्या मुल मुल्लीना शिकवतो"
समोरून --"बरे ....किती सेलरी आहे?"
मी - "9500 प्रती महिना"
समोरून --"जन्म तारीख ?"
मी - "25 डिसेंबर 1981"
समोरून --"बरे ...ठीक आहे मी तुम्हास फोन करून सांगतो."

     आणि लगेच समोरून फोन कट झाला. मी तर अवाक च झालो मनातच म्हटले "च्या आईला कसली घाई होती या व्यक्ती ला मला काय बोलायचे किवा विचारायचे होते तो विषयच नाही झाला !!!!!!!"  तेव्हा परत मनात आले कि आपण तेथे जाण्याचे टाळले पाहिजे. पण आई ने आग्रह केला त्यामुळे जावे लागले. जाण्या अगोदर माझा संपूर्ण बायोडाटा त्यांच्या माहिती साठी एका कागदावर त्या आजीला लिहून दिला. तो त्यांनी तिथे पोहचवला. संध्याकाळी आजीने समाचार आणला कि त्यांनी काल दुपारी आपणास बोलावले आहे.
     सांगितलेल्या वेळे नुसार तेथे पोहचलो. मुलीचे मामा, आई-वडील आणि फोन वर माझ्याशी चर्चा करणारे राजेंद्र आहिरे हजर होते. मुलीचे  मामा धुळे जिल्ह्यात शिक्षक म्हणून सरकारी नोकरी वर होते आणि काका मुंबई ला कल्याण येथे एका कॉलेज मध्ये  प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कडून परत त्याच  विषया वर बोलणे झाले - नाव , गाव, शिक्षण, सेलरी वगैरे. मुलगी चहा आणि पाण्याच्या ट्रे हातात घेवून मरून कलरच्या साडी मध्ये नटून सजून समोर आली. मुलीचे नाव "सारिका" होते. पाहण्या लायक होती. पण थोडी लट्ठ भासत होती.ओवर आल ठीक होते.तिने बारावी नंतर डी  एड केले होते.आणि दोन वर्ष पासून घरी होती. सर्व चर्चा झाल्यावर तीला माझ्या समोर बोलावले गेले ,मी तिला  एकच प्रश्न केला कि जर माझी तिला पुढे शिकवायची इच्छा असेल तर ती पुढे मुक्त विध्यापिठातून शिकणार का ? -- पहिल्या क्षणी ती काही बोलली नाही, कदाचित घाबरत होती. तोच प्रश्न तिच्या वडिलांनी केला..तेव्हा ती "हो" म्हटली.
     या ठिकाणी काका व मामा यांच्या बरोबर चर्चा करत असतांना माझे "राजेंद्र आहिरे " वर दुर्लक्ष झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव सांगत होता कि ते माझ्याशी नाराज झाले आहेत. त्यांचा मनाची एक गोष्ट मी वाचली कि त्यांना वाटत होते कि मी त्यांना इग्नोर (नजर अंदाज) करत आहे. त्यांच्या मनात हेच कि मी एका शाळेच्या प्रीसिपाल च्या पोस्ट वर काम करतो आणि हा व्यक्ती तर मला काहीच समजत नाही, बिलकुल रेस्पोंस देत नाही. ना इलाज होता कारण एका वेळी मी एकालाच तोंड देवू शकत होतो.
चर्चा करत असतानाच मध्ये समोरून  त्यांनी एक शंका जाहीर केली कि   --"एवढी 9500 सेलरी Computer faculty ला असते का?"
मी राजेंद्र ला - "होय ...कित्येक  इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असते."
त्यांनी विचारले -" तुमच्या शाळेचा वेळ काय आहे ?"
 मी उत्तर दिले - "सकाळी ७ ते दुपारी १"
"मग तुम्ही एक वाजे नंतर काय करतात?"
आता या ठिकाणी सांगणे मला थोडे अवघड वाटले कि मी दुपार नंतर काय करतो.कारण मी web development आणि  search engine optimization चे काम करतो.त्यांचा पैकी कोणी ही आई टी फिल्ड मधून नव्हते म्हणून ते त्यांचा डोक्यात उतरले नसते परत तोच प्रश्न डोक्यात राहिला असता कि नेमके काय करतात?
शिवाय सेलरी वाढली असती..आणि त्या व्यक्ती ला पहिल्या पासूनच माझ्या सेलरी बद्दल संशय होता.त्यामुळे मी खरे सांगणे टाळले आणि प्रत्युतर दिले कि -"काही करत नाही".
नंतर  पुढे थोड्या फार इतर विषयावर चर्चा झाल्यात ,मग  मी राजेंद्र आहिरे आणि मुलीच्या वडिलाचा फोन नंबर लिहून घेतला आणि तेथून घरी परतले. मनातल्या मनात विचार करत होतो. काय फरक पडतो मुलीचे वडील जरी पोलीस मध्ये आहेत. पण त्यांचे इतर नाते वाईक सर्व शिक्षणाच्या बाबतीत पुढे आहेत. प्रत्येक जन शिक्षक आहे, शिवाय मुली ने हि डी  एड केले आहे. आपली जमेल तिथे. म्हणून मला या ठिकाणी "हो" म्हणावे तसे वाटले.

     पुढच्या दिवशी आजी ने घरी येऊन सांगितले कि मुलगा त्यांना आवडला आहे.मी पण त्यांना हो कार  मध्ये उत्तर दिले. पण तरी मोठ्या बंधूना एकदा त्या लोकाशी एकदा भेट करून घेण्याचा मी आग्रह केला जे बाहेर गावी होते व एका दिवसांनी परतणार होते. समोरून फोन वर त्यांनी हि "हो नक्की या" म्हणून सांगितले.
     तिसरा दिवस उगवला. मोठ्या बंधूनी त्यांचा कामा वर लिव घेतली. सकाळी आम्ही निघण्याच्या बेतात तेवढ्यात ती आजी समाचार घेवून आली कि "मुलगी, तिची आई आणि मामा धुळे ला जात आहेत ते तुम्हास चार दिवसांनी कळवतील.' .मी थक्क झालो. मला तर हा प्रकार समजलाच नाही कि अचानक काय झाले? त्यांना हि आवडले होते मला हि आवडले होते. मग एका रात्री दरम्यान काय नेमके झाले असेल? .

     मी राजेंद्र अहिरेसा फोन लावला आणि कळवले कि "तुमची इच्छा असेल किवा नसेल मला स्पष्ट पणे चार पाच दिवसात कळवा , कारण शाळा लवकरच उघडतील आणि मग मला या कार्या साठी इतर ठिकाणी जाण्यासाठी वेळ मिळणार नाही. आणि जर इच्छा असेल तर मुलेचे शाळेचे प्रमाण पत्र मागवून घेणे". तेव्हा देखील फोन वर ती व्यक्ती फारच घाईत असल्याचे दिसून आले.त्यांना माझ्याशी चर्चा करण्यात थोडा देखील रस वाटत नव्हता.त्यांनी एक मिनिट देखील फोन वर गोष्ट न करता थोडक्यात "हो ठीक आहे -आम्ही सांगतो लवकर "  बोलून  सरळ फोन कट केला.

    या फोन कोल नंतर मला त्यांच्या विषयी अजून जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली.मी सरळ DEO ऑफिस गाठले. आणि माहिती मिळवली.ते Non-Granted शाळेत administrator होते. शाळेची काही विशेष  प्रोग्रेस नव्हती. दरवर्षी येणारे परिणाम देखील प्रभावशाली नव्हते त्यांची सेलरी देखील माझ्या एकूण सेलरी पेक्षा जास्त नव्हति.

पण साहेबांचा तो थाट  म्हणजे के प्रकारचे कुतूहल होते माझ्यासाठी.

मनात त्या व्यक्ती विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले पण त्याचे  स्पष्टीकरण मला माझ्या मित्राने करवून दिले. त्याने  मला  सांगितले कि या case मध्ये नेमके काय होणार आहे. आणि तसेच झाले.

   मित्राने सांगितले कि इथे इगो प्रोब्लेम झाला आहे. त्याने सांगितले कि जशी एक म्यान मध्ये  दोन तलवार नाही राहू शकत  तशी गोष्ट इथे आहे. जर इथे तुमचे लग्न झाले तर राजेंद्र साहेबांचे तेज तुमच्या समोर डीम होईल त्यांचा प्रकाश जो सध्या सासर्याचा अवती भोवती दिसतोय तो दिसणार नाही . तुमच्या हुशारी मुळे  जास्त मान सन्मान तुम्हास लाभेल. ती गोष्ट त्यांनी बरोबर ओळखली आहे म्हणून ते स्वतः पेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला पुढे येऊ देणार नाहीत.  जरी मुलीचे पाल्य आणि नाते वाईक तयार असतील पण राजेंद्र साहेब सहमत होणार नाही. तुम्हास पाच ते सहा दिवसा नंतर ते सांगतील कि "ओवर आल आम्हा सर्वांना तुमचे आवडलेले पण वय माना मधेय थोडे मागे पुढे होत आहे. त्यामुळे जमेल तसे वाटत नाही." किवा "मुलगी एकाद महिन्या नंतर परतेल तेव्हा आम्ही कळवू "

  मित्राने सांगितलेली हि गोष्ट मी नजर अंदाज केली. आणि इतर कोणत्याही ठिकाणी मुलगी पाहण्यास जाण्या अगोदर हा निर्णय (तिकडचा प्रतिसाद ) घेणे मला अत्यंत आवश्यक वाटले त्यामुळे आठवडा पर्यंत प्रत्युतर ची वाट पाहिली. पण......................... काही नाही.

  शेवटी, आहिरे साहेबांनी जो मुलीचा वडिलांचा एक नंबर लिहून दिला होता त्या नंबर वर मी फोन केला. आश्चर्य !!!!! त्या व्यक्तीने, तो नंबर चुकीचा लिहून दिला होता (कदाचित त्यांची इच्छा होती कि मुलीच्या वडिलाशी किवा नाते वाईकाशी मी  डायरेक्ट संपर्क करायला नको त्यांच्या द्वारेच पुढे गेले पाहिजे )..  ...समोरून कोणी दुसरी स्त्री हिंदी भाषेत बोलत होती. "रोंग नंबर ..यहा कोई बैसाणे नाही है ."
मग आहीरेना फोन केला. फोन रिसीव केला गेला समोरून
मी - " मी जितेंद्र बोलतोय -- जयभीम सर   "
समोरून - "जयभीम ..जयभीम "
मी - "सर आपण मला अजून हो किवा नाही काही स्पष्टता केली नाही. "
समोरून -- "हो ...हो.. मला आठवले ...सर एक्च्युली मी तुम्हास सांगायचे विसरलो होतो कि इथे सर्वाना आवडलेले पण मुलीच्या आणि तुमच्या वयातील फरके मुले  मागे पुढे होत आहे."
मी -- "सर , मला तर तसे काही विशेष दिसत नाही..पण मला वाटते मुलीला मी शिक्षणाचा आग्रह केला तो तिला आवडला नसेल , तसे माझ्या कडून कोणत्याही बाबतीत जास्त प्रेशर नाही. तिला नसेल शिकायचे तरी चालेल..."
मधेच ते बोलले.
--"अहो नाही, नाही, तसे काही नाही...तोच विषय आहे जे मी तुम्हास सांगितले."
एवढे बोलून ते कमीत कमी पाच सेकंद बोलून चूप झाले. मी कोईन बॉक्स वरून फोन केला होता..मिनिट संपला फोन कट झाला.

     मी परत लावला.कोईन बॉक्स वरून फोन केला असल्या कारणाने कट झाल्याचे सांगितले. इथे लग्नाचा विषय संपला होता काही बोलण्या सारखे नव्हते तरी मला आठवले कि हि व्यक्ती शाळेतच आहेत म्हणून एखादी मदद करेल. मी त्यांना विचारले. शाळेत नेहमी मुलांची टेस्ट घ्यावी लागते .म्हणून प्रत्येक आठवड्यात नवीन प्रश्न पत्रिका तयार करणे डोके दुखी असते. त्यामुळे मला त्यांच्या कडून जुन्या प्रश्न पत्रिका मिळतील त्या अपेक्षेने  सरळ विचारले
--"तुमच्या शाळेत अकरावी आणि बारावी चे इंग्रजी माध्यमाचे वर्ग असतील ..तर मला गेल्या वर्षाची चाचणी पेपर्स हवे होते.जर मिळाले असते तर बरे झाले असते."
समोरून -- "माझ्या हातात काही नाही आम्ही कम्प्युटर चा कंत्राट दिला आहे दुसर्या एका व्यक्तीला ते काय करतात कशी परीक्षा घेतात व पेपर्स बनवतात त्यांनाच माहित.आणि ते सर्व दिवाळी नंतरच आता काही नाही ...सध्या रजा (सुट्ट्या) आहेत ....बरे मग ठेवतो" ...आणि  घाईत त्यांनी फोन कट केला.
   
     फोन ठेवल्या नंतर मित्राने सांगितलेले शब्द मला आठवले.अगदी तसेच झाले होते.मुलगी मना पासून आवडलेली , पण काही हकारात्मक घडले नाही. शेवटी  फक्त मनातच म्हटले - " घाबरू नको जितेंद्र, जर हि सारिका नाही तर दुसरी "सारिका" नक्की कुठे तरी तुझी वाट पहात असेल."    

1 टिप्पणी:

  1. you write very good. hi laganchi tar pharch chaan aahe. tumhi maayboli.com chi sadasyata gheun tithe hi lganachi gosht liha tumhala khoop vachak aani comments milatil

    उत्तर द्याहटवा