बायको पाहिजे - भाग 1 बायको पाहिजे - भाग 2पासून पुढे
मित्र पण सांगतात - "यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणार...थांबव कि आता...एखादी पसंत कर आणि लग्न कर ..कश्याला एवढे खोल वर विचारतो.". पण मला उत्तर न देणेच योग्य वाटते. शाळा नियमित सुरु झालेली आहे. मुलगी पाहण्यासाठी सुट्टी घेवून बाहेर गावी जाणे कमीत कमी मार्च ते एप्रिल पर्यंत शक्य नाही. तरी मध्येच जर सतत दोन तीन दिवसाच्या सुट्या आल्यात कि आई घाई करते. थोड्या दिवसापूर्वी सुरत मधेच आणखी एका बी एड झालेल्या मुलीसाठी आमंत्रण आले. पण इथे पण तेच नाटक होते. मुलीचा बाप राजकारणी (नेता ) होता. जे मला अजिबात आवडत नाहीत. पण आई ने केलेल्या जोर जबरदस्ती मुले जावे लागले. मुलगी सुरत मधेच कुठे तरी शाळेत माध्यमिक विभागात खाजगी जोब वर होती.
त्या स्थळी एका नातेवाईक द्वारे जाण्याचे ठरले. मी, आई आणि एक नाते वाईक अशी तीन व्यक्ती तेथे गेलो. दुपारची वेळ होती. बहुतेक लोक झोपलेले असतात त्या वेळी. अश्या वेळी एका सोसायटी मध्ये घर शोधत शोधत आम्ही पोहचलो. जेम तेम ते घर सापडले. एरिया थोडा अंडर प्रोग्रेस होता. पुरेशी सोय अजून झालेली नव्हती.घराच्या बाहेर मुलीच्या वडिलाने मोठे बेनर लावले होते. ठळक अक्षरात दुरून कोणाला हि दिसेल अश्या पद्धतीने एका राजकीय पक्षाचे आणि स्वत:चे नाव लिहिले होते. ज्या प्रकारे ते बेनर लावले होते त्या वरून मी एकच अंदाज लावला कि या व्यक्तीला लवकरच एखादा मोठा नेता होण्याची घाई झालेली आहे. बाहेरून लोखंडी दरवाजा बंद होता.आम्ही बेल वाजली.मधून एक स्त्री आली व सस्मित आम्हास आत येण्यास आग्रह केला. दरवाजाच्या अगदी समोर सोफा सेट वर मुलीचा मावशीचा मुलगा उलटा (उताणा) होऊन झोपलेला होता.त्याची पेंट मागून अर्धी उतरलेली असून "रूपा" ची अंडर विंयर दिसत होती. ते पाहून मला अमीर खान चा गेल्या वर्षी आलेला चित्रपट Delhi Belly आठवला. त्याच्यात एक केरेक्टर अगदी तसेच आहे. मुलीच्या आई ने त्यास तीन चार थाप मारून उठवले. कुंभ कर्णी निद्रेतून जागे होऊन तो सरळ किचन मध्ये गेला.मुलीच्या आई आणि माझ्या आई मध्ये संभाषण झाले. पण मी कोणाशीही बोलू शकत नव्हतो कारण माणसा पैकी एक हि हजर नव्हते. त्या च संदर्भात मी त्यांना (मुलीच्या आईला ) विचारले समोरून मला उत्तर मिळाले कि "आज इलेक्शन आहे त्यामुळे ते वार्ड (बूथ) वर गेलेले आहेत." हे ऐकून मला तर आश्चर्याचा धक्का बसला होता. एकच विचार मनात आला कि स्वत:च्या मुलीच्या लग्नाची गोष्ट निघालेली आहे आणि हा व्यक्ती घरी न थांबता बाहेर आहे. याचा अर्थ काय? कि त्याला कसली हि पडलेली नाही "राजकारण" शिवाय......