मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

ट्राफिक सिग्नल

     बरेच दिवस झाले काही लिहिले गेले नाही ब्लोग वर. सारखे काम , काम आणि फक्त कामच थोडा फार वेळ उरला असेल तर तो वाचन करण्यात  आणि समाचार मध्ये अन्ना हजारे यांना पाहण्यात जातो. आज शाळा चार तास लवकर सुटली, तर बराच वेळ मिळाला इथे लिहिण्यासाठी. वाटले थोडे फार लिहावे येथे. हल्ली सुरत मध्ये वाहन चालकावर फारच कडक पद्धतीने शिक्षा केली जात आहे. हेल्मेट नसेल तर दंड, फारच गतीने वाहन चालवत असेल तर, रोंग साईट वर पार्किंग केली असेल तर दंड, येथे तुम्ही म्हणाल कि यात काय नवे ? हे तर प्रत्येक मेट्रो सिटी मध्ये आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच कि आता पर्यंत वाहन चालकावर सक्तीने नियम नव्हते लावले गेले. आता तर तुम्ही जरी दोन मिनिटा साठी वाहन रोंग साईट वर लावली म्हणजे झाले ....समजून घ्यायचे कि खिश्यातून एक महात्मा गांधी ची नोट गेली. सध्या ट्राफिक शाखेतील सर्व पोलिसांना एक फ़िक्ष टार्गेट देण्यात आला आहे कि अमुक दंडाची रक्कम जमा व्हायलाच हवी, नाही तर बदली किवा इतर कार्यवाही साठी तयार असावे. मग गम्मत अशी झाली आहे कि जे ट्राफिक नियंत्रक आहेत ते सकाळी १० ची ड्युटी असतांनाही सकाळी ६.३०  ला  किवा ७ वाजेला त्यांच्या गणवेशात सज्ज होवून रोडवर दिसायला लागतात. आणि मग तेच वसुलीचे रामायण चालू होते. चांगलेच कलेक्शन करून घेतात ते. पण त्यात मात्र ओटो रिक्षा चालकांना चांगलाच त्रास होतो. पहाटे पहाटे गच्च रिक्षा भरून ते स्टेशन कडे निघालेले असतात.साहजिकच पणे  जास्त प्रवासी असल्या कारणाने ते  रोडवर उभे असलेल्या पोलिसाची नजर चुकवून वाट  काढण्याचा प्रयत्न करतात. नजर चुकवून निघून गेले तर चालकांचे गुड लक नाही तर बेड लकच समजावे .कधी कधी पाठलाग पण  करतात. अमुक वेळेस तर तुमच्या कडे सर्व काही असतांना पण काही न काही कारण काढून पैसे वसूल करतीलच. त्या पोलीस अधिकार्यांना त्यांचे वरील अधिकारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्रास देतात तर ते त्रस्त पोलीस वाहन चालकांना एक प्रकारचा त्रास देतात. पुष्कळ वेळा या डोकेदुखी मूळे मला देखील शाळेत पोहचायला उशीर होतो त्यामुळे कधी कधी प्रिन्सिपल ची कट कट ऐकावी लागते.आज देखील ऑटो रिक्षा चालकाला एका पोलिसाने अडविल्याने निव्वड अर्धा ते पौन तास घरी येण्यास उशीर झाला.मला त्या दोघांवर फार राग आला होता, पण काय करणार रोज असाच नित्यक्रम चालणार असल्यास ? इथे ऑटो रिक्षा चालक त्या वाहने नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला "मामा" म्हणून संबोधित करतात. पुढे चालक जवळ जर एखादा प्रवासी बसलेला असेल तर चालक त्याला थोड्या वेळा साठी उतरून देतील आणि म्हणतील "आगे मामा खडा है , थोडा पैदल चल के उधार के  साईट पे निकल , मै मामा को झांसा देके आता हु."  म्हणजे असेच काही तरी म्हणतील कि जे एकल्या वर हसू येणार. ट्राफिक स्पोट वर कधी कधी फार पाहण्यालायक  दृश्य निर्माण होते. इकडे सारखी वाहनाची गर्दी असते. होर्न वर होर्न वाजून चालक नुसते गोंगाट करत असतात आणि दुसर्या बाजूला रोडच्या एखाद्या कडेला किवा केबिन मध्ये चालक कडून दंडाची रक्कमेच्या नावाने पैसे मोजले जात असतात. अमुक वेळेस गाई म्हशीची रोडवर गर्दी झाल्याने ट्राफिक समस्या निर्माण होते, ती समस्या सोडविण्या साठी पोलिसांना त्यांचा मेन स्पोट सोडून गाई म्हशीच्या मागे हाकलण्यासाठी काठी घेवून पडावे लागते. आणि एकी कडे वाहन चालकांची चांगलीच आरडा ओरड सुरु होते. तेव्हा त्या पोलिसांवर हसू येते. आठवड्यातून दोन तीन दा तर या प्रकारचे दृश्य हमखास पहावयास मिळतात. काही लोक नुसती गम्मत पहावयास मिळेल म्हणून मेन रोडवर जावून विड्या ओढत त्या पोलिसावर आणि येणाऱ्या जाणार्या चालकावर दृष्टी फेकत असतात. पण मात्र अमुक वेळेस ते देखील सहन करतात. जास्तच जर गर्दी झाली तर मात्र बिचारे फटके खात असताना आढळून येतात.

रविवार, १४ ऑगस्ट, २०११

प्रेम शब्दाचा शोर्ट कट

     आज माहिती तंत्र ज्ञानाच्या प्रगतीमुळे जग फार वेगाने पुढे धावत आहे. प्रत्येक गोष्टी साठी कोणता न कोणता संक्षिप्त मार्ग आहे. कि ज्याच्या उपयोगाने मोठी गोष्ट अगदी थोडक्यात सांगून उरकवता येते. कारण वेळ नाही लोकाकडे. जो तो ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहे, आणि कामाची ती गोष्ट पण त्याला कोणता न कोणता शोर्ट कट वापरून लवकर पूर्ण करून घ्यावयाची आहे. 

     त्यात प्रेम देखील हे सुटलेले नाही. आजच्या तरुण पेढीचे प्रेम थोडे टेक्निकल म्हणावे लागेल. कारण पूर्वी जर कोणी आपले प्रेम एखाद्या व्यक्ती साठी व्यक्त करत असेल तर, त्या वर मोठी, एखादी मनाला आणि हृदयाला भेदणारी कवितेचे निर्मिती होत असे. पण आज तसे आढडून येत नाही. कारण आज माहिती तंत्रज्ञानामुळे सर्वत्र शोर्ट कट चे भूत माजले आहे. जर प्रियकराला फक्त "आय लव यु " सारखे शब्द जरी सांगायचे असतील तरी ते तो फक्त "१ ४ ३ " असे तीन संख्यांचा उपयोग करून दर्शवित असतो.  मुश्किलीने एखादी व्यक्ती कागदावर मनाचे व हृदयातील मोती प्रियकर साठी अंकित करत असेल. आज " १ ४ ३" चा वापर "माझे तुझ्या वर प्रेम आहे." या गोड शब्द ऐवजी शोर्ट कट (पर्याय) म्हणून केला जातो. जे वात्सल्य , प्रेम आणि समर्पणाची भावना  "माझे तुझ्या वर प्रेम आहे." किवा "मी तुला प्रेम करतो " या शब्दात दिसते ती त्या तीन अंकामध्ये दिसून येत नाही. 
     या "१ ४ ३"  मुळे  प्रेम विषयी तरुणे  व तरुणीच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्याचे दिसून येते. जसे आपण रोज नवीन आहार घेत असतो , किवा शॉपिंग मोल मध्ये जावून नव्या वस्तू खरेदी करतो तशी आजची पिढी प्रेम करत असते. त्यांचा ग्रूप पण मोठा असतो. फेसबुक चार असतील, ओर्कुट वर दोन असतील, इतर डेटिंग साईट वर आणखी दोन तीन परिचयाची व्यक्ती असतील....मग काय ? ? ? तेच "१ ४ ३ " ज्याला आधुनिक जगाने "डेटिंग" सारखा शब्द देखील दिला आहे. डेटिंग म्हणजे काय ?तेच, वस्तू आवडली तर घ्या नाही तर पैसे परत. डेटिंग म्हणजे "प्रेमाचे शोर्ट कट" जर म्हटले तरी त्याला अतिशयोक्ती नाही. एक सार्वत्रिक सत्य आहे कि मन हे भोवऱ्या सारखे असते. ते कधी एका जागेवर नसते. या डेटिंग सारख्या प्रथे मुळे त्याला अधिकच चालना मिळाली आहे.
     अहो ! हल्ली तर एस एम एस सारख्या सुविधेचा वापर करून सुद्धा लोक प्रेमाचा पंचनामा करायला लागले आहेत. फक्त एका वाक्यात विचारले जाते. "are you interested in me ?"  किवा  "Do you like me ?" . बस समोरून लगेच उत्तर मिळते. "No, sorry"किवा "Yeah !! My pleasure" फटक्यात प्रेमाची देवाण घेवाण होते. मग कसली कविता नि कसल्या चारोळ्या ? सर्व काही एकदम फटक्यात...आहे ना कमाल ?!! 
     तो दिवस दूर नाही जेव्हा लोक फोन वर किवा इंटरनेट च्या माध्येमाने लग्न पण करतील आणि घटस्फोट पण होतील. प्रेम विषयीच्या गजल , चारोळ्या , शायरी. ग्रंथ हे फक्त साहित्यातच शिल्लक राहील. सर्वत्र एकच सूत्र दिसेल. "वापरा शोट कट आणि मिळवा परिणाम फटाफट"

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

इंटरनेट विश्वात माझे पहिले पाऊल...


     त्या वेळेस मी आई टी आई मध्ये शिक्षण पूर्ण करून नुकताच बाहेर पडलो होतो. तसे तर आई टी आई मध्ये इंटरनेट चा "इ" देखील आम्हास शिकवला नव्हता. शिवाय घरी computer नव्हते किवा मित्राकडे देखील कोणत्याही प्रकारची इंटरनेट साठी सोय नव्हती. फक्त कॉम्पुटर चे प्रमाणपत्र हातात घेवून जोब साठी बाहेर हिंडत होतो.   सुदैवाने दोन तीन ठिकाणी जोबच्या ऑफर्स आल्यात. अगदी नटून सजून, सुसज्ज होऊन प्रमाणपत्राची फाईल हातात घेवून मोठ्या उत्साहाने interview च्या ठिकाणी गेलो. अगोदर पासूनच वीसेक मुले मुली रांगेत बसलेले होते. स्वाभाविकच पणे मी पण रांगेत बसलो. आजू बाजूला बसलेले काही उमेदवारांचे मी प्रमाणपत्र पाहिले आणि त्यांचा पूर्ण  bio-data वाचला. मी थक्क झालो. त्यांचे प्रमाणपत्र पाहून. मनातच विचार करू लागलो. यांच्या समोर तर माझी लायकात तर शून्य आहे. नोकरी जर मिळवतील तर ती हेच लोक, माझा तर interview साठी क्रमांक पण येणार नाही. मी थोडा उदास मनाने उभा झालो आणि सरळ बाहेर वाट धरली. पण चालता चालता मन स्वतःला धिक्कारात होते कि "तू स्वतःला युद्ध मैदानात उतरण्या अगोदरच हरवले. तू स्वतः तुझा पराभव करत आहे. तर बाहेरचे का नाही करणार ?"  आणि परत हकारात्मक विचारासह interview च्या ठिकाणी आलो. मला  आत बोलावले गेले. पहिलाच प्रश्नाचा मारा करण्यात आला कि तुम्हाला इ मैल पाठवता येतो का ? मी आई टी आई मध्ये असतांना मेल express ने प्रवास करायचो त्यामुळे फक्त तो मेल एक्ष्प्रेस्स वाला " मेल" लक्ष्यात होता. मी प्रत्युत्तर म्हणून नकार मध्ये मान हलवली. प्रथम प्रश्नांचे उत्तर मी देवू शकला नाही त्यामुळे त्यांनी दुसरा प्रश्न विचारलाच नाही. फक्त दोन शब्द बोलले ते , "आम्ही सांगू लवकरच ", आणि मी बाहेर. मी समझलो कि ते परत लवकर काही सांगणार नव्हते.

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

कोण असेल तो ?


     आज पासून सुमारे दहा वर्षा पूर्वीची गोष्ट. तेव्हा मी आय टी आय अंकलेश्वर येथे शिकत होतो. रोजच रेल्वेने सुरत पासून तर अंकलेश्वर चा प्रवास करायचो. तसा मला रोज सकाळी लवकर उठायचं म्हणजे फारच मोटा त्रास वाटायचे , मी आळसी होतो. तरी आई पाच वाजता उठून सारखी   "उठ उठ लवकर उठ ......गाडी चुकणार तू आज ...उठ लवकर " शब्द कानावर टाकत असे. शेवटी मला उठावे लागायचे. आणि मग घाई घाई ने मी तयार होत असे. फारच कठीण दिवस होते. कोठल्याही प्रकारचा ब्रेकफास्ट न घेता धावत रेल्वे स्टेशनावर पोहोचायचो. आणि पाच वाजे पर्यंत कुठले हि जेवण न घेता रेल्वेने परतायचो. कधी कधी मित्रांनी जर होस्टेल मध्ये बनवले असेल तर त्यांच्या आग्रहावर जावून जेवणाचा आस्वाद घ्यायचो पण ते कधी कधी होते..कारण मला रोज रोज त्यांच्या आग्रहावर जावून त्यांच्या बरोबर होस्टेल वर जेवण करणे बरोबर वाटत नव्हते. कदाचित मला फार शरम वाटत असे. असाच रुटीन चालला होता. 
     एके दिवशी , मी रोजच्या नियम प्रमाणे आय टी आय ला जाण्यास निघालो. ट्रेन आली बसलो. तीन तास पसार झाले , माझे स्टेशन आले आणि मी उतरलो.  प्लेटफोर्म कडे निघालो. अचानक एक व्यक्ती माझ्याकडे धावत आला आणि उदगारला, "ला भाई कल के बाकी पैसे दे दे पेपर ले के तू तो गायब हि हो गये  हा ?" त्याचे हे बोलणे ऐकून मी तर अवाकच झालो. मला कळत नव्हते तो कसले पैसे मागत आहे. मी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याला सोप्या भाषेत सांगितले कि तो जी व्यक्ती मला समजत आहे ती व्यक्ती मी नाही. तो कोणी दुसरा आहे आणि मी दुसरा. पण तो काही माझी गोष्ट स्वीकारायला तयार नव्हता. त्याच्या चेहरा वर संतापाचे भाव मी वाचू शकत होतो. मी घाबरलो आणि शेवटी त्याला पंधरा रुपये दिले आणि तेथून निघालो. चालत असतांना मला सारखा विचार येत होता कि खरच दुसरा व्यक्ती आहे का या ठिकाणी जो माझ्या सारखा दिसत असेल ? पण उत्तर कोण देणार? डोक्याला दोन्ही हात्तानी खाजत आय टी आय मध्ये आलो. मित्रांना हि घटना सांगितली. पण मला अपेक्षा नव्हती तसा प्रतिसाद त्यांचा कडून मिळाला हि गोष्ट ऐकल्यानंतर सर्व माझ्यावर हसू लागले, आणि म्हणाले कि "तुला त्या माणसाने चांगलाच बनवला. पैसे हि घेवून गेला तो वेडा.."  तेव्हा मला स्वतःवर थोडा फार संताप आला कि मी का बरे त्या माणसाला पैसे देवून टाकले ?
     तो दिवस संपला घरी आलो आणि जेवण न करता शांततेने जावून झोपलो. दुसरा दिवस उगवला. परत घाई घाईत स्टेशनवर पोहचलो. ट्रेन आली ...... सुखरूप अंकलेश्वर स्टेशन वर आलो. तेव्हा परत आजू बाजू ला मी त्या काल  मिळालेल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही दृष्टीस पडला नाही. मला वाटले मित्र जे काल बोलले ते खरे होते. चालत चालत पाच मिनिटे झाली असतील, एस टी स्टेन्ड जवळून पसार होत होतो. स्टेन्ड वरच सारखी गर्दी जमलेली दिसली. कदाचित एखादी घटना घडली असेल. मी जवळ न जाता दुरूनच पाहत होतो. एक इसम जवळ आला आणि म्हणाला "क्या यार क्या हो राहा था वहा पे कूच पता चला क्या ? और येह क्या तू दो मिनिट मी कपडे बदल के भी आ गया  हा ?" तर हे शब्द एकूण तर माझ्या डोक्यातील सर्व तंतू हलले ...स्वतःलाच विचारले काय म्हणतो आहे हा इसम ? तेथे मी कोणते हि उत्तर न देता सरळ आई टी आई कडे वात धरली. ती घटना देखील मी मित्रांना  सांगितली नाही. कारण मला वाटलेच की ते काल प्रमाणेच माझी मस्करी करतील आणि हसतील.दिवस संपला घरी परतलो. आणि जेवण न करता झोपलो. पण एक विचार जो माझ्या डोक्यात सतत येत होता कि खरोखर तिथे एखादा व्यक्ती आहे जो माझ्या सारखा दिसत असेल ? मी तेथे आई टी आई मध्ये शिक्षण पूर्ण केले  पण शेवट पर्यंत त्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. फक्त तो विचार डोक्यात प्रश्न्याच्या स्वरुपात राहिला कि "खरोखर तिथे आहे कोणी माझ्या सारखा ?आणि जर असेल तर, कोण असेल तो ?"   "     

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

तर चला परत वास्तविक जगाकडे.

      आज तारीख ५ ऑगस्ट २०११ वार शुक्रवार सकाळ ची वेळ. सहज फिरता फिरता माध्यमिक विभागात गेलो. स्टाफ रूम मधे शिरलो . पाहतो तर काय ? आमचा प्यून जो बिचारा दोन तीन दिवसा पासून चा फेसबुक वियोग मध्ये कोरड़ा झाला होता. तो समोरच्या कंप्यूटर वर यु एस बी डिवाइस लावून फेसबुक सर्फ़ करत होता. आणि त्याच्या मुखावर अमूल्य हास्य होते. तो फारच प्रसन्न मुद्रेत असल्याचे दिसत होता . माझ्याकडे तेव्हा त्याने जास्त लक्ष देण्याची तस्दी पण घेतली नाही. तरी मी मागे एक खुर्ची वर जावून बसलो व एक शिक्षक बरोबर चर्चा करू लागलो. जवळ पास अर्धा तास झाला पण तो फेसबुक वरील व्यक्ति न इकडे पाहतो न तिकडे . सारखे कंप्यूटर स्क्रीन वर लक्ष ...   टेबला वर कोफ़ी चा कप भरून ठेवलेला आहे पण त्याचे फेसबुक शिवाय कोठे ही लक्ष नाही एवढा तो त्याच्यात मग्न आहे. 
     अजून पाच मिनिटे पसार झाली असतील तेवढ्यात पावर गेली. तेव्हा जणू काही मोठे संकट त्या प्यून वर कोसळले असावे असा चेहरा त्याचा झाला . परत तीच उदासी , आणि गंभीर मनःस्थिती त्याची झाली. मला कळत नव्हते त्याची मानसिकता कशी असेल फेसबुक साठी ? तसे जर खोल वर विचार केला तर हा प्रश्न खरोखर गंभीर आहे. चिंतेचा विषय आहे. आजची तरुण पिढी या सोसीअल नेट्वर्किंग च्या नादात पडून वास्तविक जीवनात जगण्याचा आनंद गमावतात व त्या काल्पनिक जगाला वास्तविक जग समजून घेतात. अशीच गत या प्यून ची झाली आहे. दोन दिवसा पूर्वी त्याला मी फक्त दोन तीन दिवस वाट पाहण्यास सांगितले , पण तो काही थांबला नाही आणि नवीन इंटरनेट कनेक्शन घेवून फेसबुक वर जावून परत चिकटला. कुठे चालले आहे आज जग ? वास्तविक जीवनाचा आस्वाद सोडून काल्पनिक जगाकडे ? मनुष्याने तंत्र ज्ञानाचा पाया टाकला , संशोधन केले  ते प्रगती साठी. मनुष्याच्या विकास साठी, फायद्यासाठी ..पण तुम्हास वाटते खरोखर आपण फायदा करून घेत आहोत या गोष्टी पासून ? मित्रांनो , जागे व्हा , अजून वेळ गेलेली नाही. पहा जरा आजू बाजूला या फेसबुक च्या नांदात तुम्ही वास्तविक जीवनातून तुमचे मित्र , स्नेही वगेरे तर नाही गमावत आहात ना ?  

मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

फेसबुक ....फेसबुक .......फेसबुक .........??!!!!!

 जिकडे पाहिले तिकडे एकच गम्मत दिसते  ती गम्मत म्हणजे फेसबुक. हल्ली लोकांचे जीवन धोरण बदलले आहे. लहान मोठे सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. जिकडे तिकडे फेसबुक ची माया कामावर, जेवतांना , खेळतांना , छोटे से लहान काम का असे ना  "लगेच सामुरून उत्तर मिळते फेसबुक वर भेट आपण चर्चा करू "  काय चाललंय हे ? वाटते मनुष्याच नियंत्रण फेसबुक च्या हातात गेले आहे. कामावर एक प्यून आहे. बरेच दिवसा पासून त्याच्या मोबाईल वर फेसबुक उघडत नाही. बिचारा सारखा चिंता करतोय. खाण्या पिण्या कडे पण  लक्ष देत नाही मला तर आश्चर्याच वाटते . मगाशी माझ्या कडे येवून हळूच बोलला यार हे फेसबुक वाले आणि आपल्या सरकार मध्ये काही फरक नाही . मी विचारले का बरे ? तू असे को बोलतो ? तर त्याने मला फेसबुक उघडत नाही म्हणून ही हकीकत सांगितली. मला तर फारच हसू आले कि हा माणूस , त्याच्या फोन वर फेसबुक बंद आहे तर किती तळमळत आहे. मला त्याचा फेसबुक वियोग पहिला जात नव्हता. अर्थात हसू हि फार येत होते आणि नवल पण वाटत होते. पण मी करणार तरी काय या केस मध्ये ? त्याला अजून तीन चार दिवस वाट पाहण्याचे आश्वासन दिले आहे.  पाहुया काय होते ते या दोन चार दिवसात ...