बुधवार, १० ऑगस्ट, २०११

इंटरनेट विश्वात माझे पहिले पाऊल...


     त्या वेळेस मी आई टी आई मध्ये शिक्षण पूर्ण करून नुकताच बाहेर पडलो होतो. तसे तर आई टी आई मध्ये इंटरनेट चा "इ" देखील आम्हास शिकवला नव्हता. शिवाय घरी computer नव्हते किवा मित्राकडे देखील कोणत्याही प्रकारची इंटरनेट साठी सोय नव्हती. फक्त कॉम्पुटर चे प्रमाणपत्र हातात घेवून जोब साठी बाहेर हिंडत होतो.   सुदैवाने दोन तीन ठिकाणी जोबच्या ऑफर्स आल्यात. अगदी नटून सजून, सुसज्ज होऊन प्रमाणपत्राची फाईल हातात घेवून मोठ्या उत्साहाने interview च्या ठिकाणी गेलो. अगोदर पासूनच वीसेक मुले मुली रांगेत बसलेले होते. स्वाभाविकच पणे मी पण रांगेत बसलो. आजू बाजूला बसलेले काही उमेदवारांचे मी प्रमाणपत्र पाहिले आणि त्यांचा पूर्ण  bio-data वाचला. मी थक्क झालो. त्यांचे प्रमाणपत्र पाहून. मनातच विचार करू लागलो. यांच्या समोर तर माझी लायकात तर शून्य आहे. नोकरी जर मिळवतील तर ती हेच लोक, माझा तर interview साठी क्रमांक पण येणार नाही. मी थोडा उदास मनाने उभा झालो आणि सरळ बाहेर वाट धरली. पण चालता चालता मन स्वतःला धिक्कारात होते कि "तू स्वतःला युद्ध मैदानात उतरण्या अगोदरच हरवले. तू स्वतः तुझा पराभव करत आहे. तर बाहेरचे का नाही करणार ?"  आणि परत हकारात्मक विचारासह interview च्या ठिकाणी आलो. मला  आत बोलावले गेले. पहिलाच प्रश्नाचा मारा करण्यात आला कि तुम्हाला इ मैल पाठवता येतो का ? मी आई टी आई मध्ये असतांना मेल express ने प्रवास करायचो त्यामुळे फक्त तो मेल एक्ष्प्रेस्स वाला " मेल" लक्ष्यात होता. मी प्रत्युत्तर म्हणून नकार मध्ये मान हलवली. प्रथम प्रश्नांचे उत्तर मी देवू शकला नाही त्यामुळे त्यांनी दुसरा प्रश्न विचारलाच नाही. फक्त दोन शब्द बोलले ते , "आम्ही सांगू लवकरच ", आणि मी बाहेर. मी समझलो कि ते परत लवकर काही सांगणार नव्हते.


     माझ्या समोर विकट परिस्थिती निर्माण झाली होती. एकाच प्रश्न सतावत होता कि इंटरनेट शिकायचे कसे ? माझ्या कडे तेव्हा पाहिजे तेवढे पैसे नव्हते. साधारण ऑटो रिक्षेत जरी जावयाचे असेल तर मी दहा वेळा विचार करायचो कि एवढे पैसे जातील..., तेवढे पैसे जातील...मग पुढे काय ? जेम तें इन मीन साडे तीन रुपये जमवले होते पण ते पुरेशे नव्हते.मित्राकडून मदद घेण्यास मला शरम वाटत असे. त्यामुळे त्यांच्या कडे पण जावू शकत नव्हतो. कसे करायचे ?...कसे करायचे ?.....चिंतातूर झालो होतो   विचार करत करत एखादा आठवडा गेला असेल.  अचानक एक दिवशी वर्तमान पत्रात जाहिरात आली, "Surf Internet Free As An Opening Bonanza" आणि खाली एका साईबर कॅंफे चा पत्ता दिला होता. मला गगनात मह्वेनसा आनंद झाला. कारण ज्या गोष्टी साठी मी सतत चिंता करत होतो ती मला लवकरच मिळणार होती. वर्तमान पत्र बाजूला ठेवले, साईबर कॅफे चा पत्ता एका कागदावर लिहून घेतला  आणि पडलो घरा बाहेर. एकाद तासाने त्या ठिकाणी पोहचलो. फुकट ऑफर होती म्हणून तिथे माझ्या सारखे वर्तमान पत्रात वाचून आलेले बरेच लोक होती. मग तेच परत ...रांगेत बसलो. जवळ जवळ दीड तास नुसते फुकट बसून मी घालवले. मध्ये तर मला वाटले जावू दे काय ते इंटरनेट शिकायचे ? दुसरी गोष्ट म्हणजे मला भूख पण फार लागलेली..पण करणार तरी काय ? शिकायचे असेल तर जिभेला थोडा चिमटा द्यावा लागेल ना... जो पर्यंत मी बसलो होतो तो पर्यंत मी निरीक्षण केले कि हे लोक इंटरनेट वर करतात तरी काय ? सारख लक्ष देवून पहिले. ते इंटरनेट एक्ष्प्लोरेर उघडायचे आणि त्यात webcrorepati.com उघडून सभासद म्हणून नोंदणी करत होते , नोंदणी झाल्यानंतर ते अमुक प्रश्नाचे उत्तर देत होते. बस , तेच माझ्या डोक्यात शिरले. जसा माझा नंबर आला तसा मी पण वेब साईट उघडून नोंदणी केली. मी देखील प्रश्न चे उत्तर दिले.  पूर्ण एक तास मी प्रश्न आणि उत्तर ह्या दोनच गोष्टी तिथे केल्यात. कारण दुसरे काही माहित नव्हते. फुकट सर्फिंग ची ऑफर चार दिवस होती म्हणून चार दिवस तिथे जावून मी हि एकाच साईट उघडली. तीन दिवस तर काही झाले नाही. पण चौथ्या दिवशी जणू देवाने कृपा केली असावी तसे घडले. त्या वेब साईट वर सर्व प्रश्नाचे उत्तर देणारा एक मात्र विजेता जाहीर झालो. आणि मला बक्षीस म्हणून दोन हजार रुपय मिळणार होती. ती रकम घेण्यासाठी सुरत मधेच आठवागेट नावाच्या स्थळी असलेल्या त्यांच्या ऑफिस वर बोलवण्यात आले. मी गेलो आणि ते रक्कम मिळवली. मग काय ? इंटरनेट चे पुस्तक वीकत घेतले आणि साईबर कॅफे मध्ये एका तासाचे तीस रुपये फी देवून शिकायला सुरुवात केली. आणि मी विषयात पारंगत झालो. आज पण मला ते दिवस विशेष वाटतात.जेव्हा मी रक्कम जिंकली आणि ती रक्कम शिकण्यासाठी खर्च केली. कदाचित परमेश्वराची कृपा होती. 

1 टिप्पणी: