रविवार, २९ जानेवारी, २०१२

देर से आए पर दुरुस्त आए

आज शाळेत ओपन हाउस होते. अर्थात मुल व मुलींचे पालक त्यांनी उत्तर वहीत परीक्षेत काय लिहिले ते पाहण्यासाठी येतात. सकाळी आठ ते दहा पर्यंत कार्यक्रम चालला.आणि साडे दहा पर्यंत मी फ्री झालो. वाटले आज थोडा फार आराम करणार आणि काही वाचन करायचे होते ते करणार. एकाद तासांनी घरी पोहचलो. हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. तोच समोरून डॉक्टरचा फोन आला. त्यांनी मला डोळे तपासनीस बोलावले होते. जेवण करता करता रेल्वेचा टाईम टेबल पाहू लागलो. पाहतो तर फक्त २० मिनिटे बाकी होती ट्रेन सुटायला. मग मला जेवण सोडून द्यावे लागले. घाईतच कपडे बदलले , बूट घातले काळा चष्मा लावला आणि निघालो. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी रिक्षेत बसलो. रीक्षा चालकाला त्वरेने नेण्यासाठी मी विनंती केली. पण तो जशी बैल गाडी चालते तशी रिक्षा चालवत होता. मी त्याला दोन वेळा विनंती केली. पण तेच. शेवटी कंटाळून ती रिक्षा सोडली आणि दुसरी रिक्षेत बसलो.त्याने वेगाने चालवली रिक्षा, पण ट्राफिक मुळे उशीर झाला. स्टेशन च्या गेट पर्यंत पोहचलो तेवढ्यात तर गाडी प्लेटफोर्म वर आली. सूदैवाने तिकीट विंडो वर गर्दी नव्हती. पटकन तिकीट काढले आणि दोन नंबरच्या प्लेटफोर्म कडे धाव घेतली. धावत असतांना मी विसरलो कि मी रेल्वे ट्रेक क्रॉस करून पडत होतो. आणि त्याच ट्रेक वर मुंबई (विरार) - भरूच शटल वेगाने येत होती.ते दृश्य पाहून दोन्ही प्लेटफोर्म वरचे लोक जोराने ओरडू लागले. तेव्हा माझे समोर येणारी ट्रेन वर लक्ष गेले. आणि समय सूचकता वापरून ट्रेक वरून बाजूला झालो.मी फार काही तरी अनुभवले त्या एक क्षणात. मला वाटले जीव गेला आणि परत आला त्या एका क्षणात. मी स्तब्ध होतो. जवळचे रेल्वे पोलीस माझ्या कडे आले. आणि हाथ धरून समोरच्या प्लेटफोर्म वर घेवून गेले व बाक वर बसवले. त्यांनी मला सांगितले कि हा चमत्कार आहे कि तू वाचला. पुढे असे करू नको. तुझी गाडी सुटत असेल तर सुटू दे, सुटलेली गाडी परत मिळेल पण शरीरातील जीव नावाची गाडी जर एकदा जीवनाच्या प्लेटफोर्म वरून गेली तर कधी परत येत नाही.मी त्यांचा आभार व्यक्त केला आणि समोर उभी असलेल्या गाडीत जावून बसलो. या घटने मुळे सर्व लोकांची दुर्ष्टी माझ्यावरच होती. मधेच शाळेतील एक शिक्षक भेटले त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यात. अर्धा तास नंतर माझे stop आले मी उतरलो.रोटरी आय हॉस्पिटल जाण्यासाठी रिक्षेची वाट पहिली. पण एक पण रिक्षा चालक ४० किवा ५० रुपया खाली बसवायला तयार नव्हता.जिथे जाण्यासाठी किमान ५ रुपये लागतात तेवढ्या जागे साठी ५० रुपये ? मी पायीच निघालो. 
     जवळ जवळ २० मिनिटांनी तेथे पोहचलो.केस पेपर काढला आणि क्लिनिक मध्ये शिरलो पाहतो तर एक हि डॉक्टर नाही. त्यांची  Conference  चालली होती त्यामुळे मला वाट पहावी लागली.आणखी दोन तास झाले तेव्हा ते डॉक्टर आले. माझ्या अगोदरच काही पेशंट येवून बसलेले होते. ते एक एक करून मध्ये बोलावल्यावर जात होते.मी मात्र माझा नंबर कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. मध्ये मध्ये च दुसरे पेशंट येत होते. ते हि आत जात होते. मी विचार केला नंतर येणार्यांना आत बोलावत आहे मला का बोलावत नाही ?आत वार्ड रूम मधेय जावून  नर्स ला दोन वेळा विचारले. दोन्ही वेळा तिने सांगितले "डॉक्टर बोलावतील तुम्हास ..थोडे थांबा." परत बाक वर जावून बसलो.समोर एक सतरा - अठरा वर्षाची मुलगी आणि ३५ ते ३६ वर्ष  वयोगटातील स्त्री येवून बसली. दोन्ही एन आर आई होते. त्या मुलीच्या आई ला गुजराती बोलता येत होते पण मुलीला अजिबात गुजराती समजत नव्हते आणि बोलता पण येत नव्हते म्हणून ते इंग्लिश मधून संभाषण करत होते. मी काळा चष्मा घातला होता म्हणून त्यांना वाटत होते कि माझे लक्ष त्यांचावरच आहे.कदाचित ती स्त्री माझा तिरस्कार करत होती. माझ्या कडे पाहून ती स्त्री तिच्या मुलीला स्थानिक लोका विषयी बरे वाईट सांगू लागली.मला तर रागच आला होता. पण काही न बोलण्याचे योग्य वाटले आणि बसून राहिलो.माझा नंबर आला आत गेलो.तपासणी झाली , औषध घेतली आणि निघालो स्टेशन कडे. त्या दोन्ही एन आर आई माय लेकी देखील माझ्या मागे निघालेत. योगानु-योग त्यांनाही स्टेशन जावयाचे होते म्हणून एकाच रिक्षेत बसलो. त्या स्त्रीला वाटले मी गुजराती असावा म्हणून तिने मला प्रश्न केला "तमे गुजराती  छो ?"(तुम्ही गुजराती आहात का ?) मी प्रत्युत्तर दिले "हु भारतीय छु." (मी भारतीय आहे.) आणि मी स्थानिक व्यक्ती आहे. त्या स्त्रीला अपमानास्पद वाटले आणि तिने बोलणे बंद केले. तिच्या मुलीला माझ्या विषयी बरे वाईट इंग्रजी तून सांगू लागली.मी फक्त ऐकत होतो. स्टेशन आले. रिक्षे चे पैसे दिले आणि पुढे निघालो.तिच्या कडे सुटे पैसे नव्हते म्हणून रिक्षा चालक डोके लावू लागला. मी मागे वळून तो प्रकार पाहिला आणि स्वतः समोर जावून त्या दोघांचे हि  दहा रुपये रिक्षा चालकाला दिले. आणि घाईत  प्लेटफोर्म कडे निघालो. त्या दिवशी मला तर असे वाटले कि माझ्या नशिबाच्या रेघा मधून त्या दोन्ही व्यक्ती निघणार नव्हती. कारण ज्या ट्रेन मध्ये मी बसलो त्याच ट्रेन वर ते पण मागो माग आले. मी दहा रुपये जरी दिले तरी ती स्त्री (मुलीची आई) मला थेंक यु म्हणायला पण तयार नव्हती.. गच्च गर्दी असल्याने लोक एक मेकांना लोटत होते. आणि त्यांना भारतातील अशी धक्का बुक्कीची सवय नव्हती.मी त्या मुलीला माझ्या जागेवर बसण्याचा इशारा केला.अगोदर तिने नाकारले .थोड्या वेळाने गर्दी जास्त वाढली , मी परत इशारा केला, तेव्हा ती मुलगी येवून बसली. मी मात्र उभा राहिलो.पंधरा मिनिटे झाली माझे स्टेशन येणारच होते. मी त्या स्त्री जवळ गेलो आणि म्हटले "which ever place you go to visit, never ever insult of there local people. There will not be always a gujarti to help you. there will be only an indian and that indian means a local people. at lest don't teach your child to wrong things about local people. you also belongs to same locality before being a foreigner." ती स्त्री अवाक च झाली होती. तिने देखील काळा चष्मा घातला होता . तो चष्मा डोक्या वर करून तिने खाली मान घातली. तेव्हा ती मुलगी मला मात्र "thanks" म्हटली.मी वेल कम म्हटले आणि उतरलो. कदाचित त्या स्त्रीला चुकी कळली असेल त्या मुळे तिने खिडकी मधूनच "बाय" चा इशारा केला. तेव्हा वाटले कि आता ती स्त्री कोणाचाही अपमान करणार नाही.चलो कोई बात नाही "देर से आये पर  दुरुस्त आये"                                                 

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

जाना था जापान , पहोच गए चीन !!

हाश !! संपली मुलांची परीक्षा. कालच बारावी च्या मुलांची  कम्प्युटर विषयाची परीक्षा संपली. दोन दिवस चालली. गुण देण्यासाठी सकाळ पासून दुपारचे बारा वाजेपर्यंत एका लेब मधून दुसर्या लेब मधेय चकरा मारत होतो. आता थोडा विसावा मिळाला आहे.तरी अधून मधून मेनेजमेंट मुलाकडून प्रोजेक्ट तयार करवून घेण्यासाठी रोज रोज टोमणा मारत आहेत. कॉम्प्युटर चा हेड फोनमध्ये बिघाड झाला आहे. त्याला सर्विस सेन्टर वर घेवून जावयाचे आहे. मित्राचे जुने कॉम्प्युटर घरी आणून ठेवले आहे त्याचे दुरुस्तीकरण बाकी आहे.इतर वर्गामध्ये अजून बरेच धडे पूर्ण करायचे राहिले आहेत.त्या बद्दल प्रिन्सिपल माझी लेफ्ट राईट  करवून घेत आहे . रोज नवीन काही न काही काम निघत आहे. माझे स्वतः चे कामे अजून राहिली आहेत ते पूर्ण करायला वेळ मिळत नाही. तीन आठवड्या पूर्वी आमचे जुने हेड अमेरिके हून परत आले  तेव्हा पासून शाळा सुटल्या वर हि दोन दोन तीन तीन तास मीटिंग करत बसत आहे. काय करायचे काही सुचत नाही. हे झाले .. लगेच तीन दिवसा पूर्वी पूर्ण फेमिली गावाला गेली आहे. मग काय ? अहो.. घरातील सर्व ...म्हणजे सर्वच काम करावे लागत आहे. भांडी , कपडे , बाजार , पाणी भरणे पासून सर्व काही. असे वाटते ना कि लोक जगण्यासाठी काम करतात पण मी कामा साठी जगात आहे. नुसती कृत्रिम लाईफ झाली आहे. आजचा दिवसच विचित्र होता. आज गुगल वर सर्च करून साधी खिचडी कशी बनवतात ती कृती शोधली आणि कागदावर लिहून घेतली.बस त्या लिहिलेल्या कृती नुसार सुरवात केली. पण तांदूळ उकडत असतांना मला समझले नाही कि अजून किती पाणी ओतावे लागेल. चुकीने माझ्या ने जास्त पाणी टाकले गेले. दहा ते पंधरा मिनिटे ते जास्ती चे पाणी बाष्प बनून जात नाही तो पर्यंत वाट पाहिली. पाणी चे बाष्प तर झाले पण तेथे खिचडी च्या ऐवजी दुसराच कोणत्या तरी प्रकारचा पदार्थ तयार झाला. मी तर डोक्यालाच हात लावला. म्हटले "झाले कल्याण ....जाना था जापान पोहोच गये चीन" खिचडी च्या एवजी पिवळ्या रंगाचा चवदार गुंदर तयार झालेला दिसत होता !!. मला भीती हि वाटली कि बाबा आले तर नक्कीच बोलतील. मग आता काय पर्याय ? फेकू तर शकत नव्हतो. काय करायचे ? घराच्या बाहेर निघून गाय शोधू लागलो. म्हटले दिसली तर टाकून देणार. पण तेही दिसत नव्हती. तरी वाटले एकाद तासाने रोड वर ईकडे तिकडे फिरताना एखादी गाय तर नक्की दिसेल. दोन तास पसार झाले पण गाईचा काही पत्ता नाही. शेवटी पाच वाजता गाय दिसली तेव्हा ते गाई समोर ठेवले. तो पर्यंत मेगी वर टाइम पास केला.चांगलीच फजिती झाली आज. बघू ..उद्या जर आई लवकर परतली. तर परत अशी फजिती होणार नाही. नाही तर परत दुपारी मेगी आणि संध्याकाळी चाइनीस च्या स्टोल वर चाइनीस. पण एक गोष्ट लक्षात आली कि जेवण बनवणे म्हणजे काही तोंडाचा खेळ नव्हे.शाळेला उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्यात का आई कडून नक्कीच काही तरी बनवायचे शिकून  घ्यावयाचे आहे.  

शनिवार, १४ जानेवारी, २०१२

मकर संक्रांती कि मोठे पाप ???

"कायपो छे रे ...ए पकड !!! आ राह्यो छेडो.....ए लाल गई, जो लीलो आवे छे .........."
सकाळी झोपलेलो असतांना कानावर हे शब्द पडत होते. आज सुट्टी असल्यामुळे नऊ वाजे पर्यंत झोपण्याचा बेत केला होता. पण या आरळा ओरळ होत होती म्हणून झोप उडाली. घड्याळात पहिले तर साडे आठ वाजले होते. परत झोपायचा प्रयत्न केला पण आवाज मुले काही झोप लागली नाही. मकर संक्रांत चा दिवस होता आज. लवकर लवकर तयार झालो. आणि छतावर गेलो. सर्वत्र हल्ला गुल्ला दिसत होता. प्रत्येक जन मोठा लाउड स्पीकर वाजवत होता. त्यामुळे जवळ चे व्यक्ती काय बोलत आहेत ते हि कळत नव्हते. सकाळचा जसा वरती गेलो तसा भूक लागत नाही तो पर्यंत खाली काही आलोच नाही. आई जेवण साठी वारवार बोलावत होती , पण माझे मन वरती आकाशात पतंग पाहण्यात तल्लीन झाले होते.तसे पाहिले तर दोन दिवस हा सन येथे गुजरात मध्ये साजरा केला जातो. लोक नुसते त्यांच्या रंगात रंगलेले दिसून येतात . खाण्या पिण्याचे तर विचारू नका. आज वर्तमान पत्रात आलेल्या बातमी नुसार सुरत मध्ये एका दिवसात लोक एकूण आठ करोड  .....होय तब्बल आठ करोड रुपयाची मिठाई व इतर खाद्य पदार्थ मध्ये पैसे उडवतात. मला तर वाचून फारच आश्चर्य झाले.एवढी रक्कम नुसती खाण्या पिण्या मध्ये ? मकर संक्रांतीच काय तर इतर सणा मध्ये देखील लखलुट पैसा लोक खर्च करत असतात. तसा मला पक्ष्या विषयी फारच प्रेम असल्याने मी कधी हि पतंग उडवत नाही. हो पतंग जर पकडायचा असेल ..तर चालेल ... पण उडवायचे नको रे बाबा. चार वर्षा पूर्वी मी मित्र कडे गेलो होतो , तेव्हा हाच सन होता. दोघे हि पतंग उडवत होतो. अचानक माझ्या पतंगाच्या दोर्याने एक पक्षी घायाळ झाले. आणि जमिनी वर पडले. ते तर फडत होते. मी त्याला उचलले. जख्मावर हळद लावले. पण शेवटी ते पक्षी मरण पावले. मला फारच दुख झाले. बस तेव्हा पासून चा नेम धरला कि आयुष्यात कधी हि पतंग उडवणार नाही. काय मिळते याने ? कधी आपण विचार करतो का ? फक्त या एका दिवसा मुळे लाखो पक्षी मरण पावतात. एवढे मोठे पाप कश्याला ? फक्त आपल्याला आनंद मिळावा म्हणून ??? .छे .... योग्य नाही. 
मित्रांनो, आनंद मिळवायचा असेल तर जरूर मिळवा. पण आपल्या आनंदामुळे  कोणाचा जीव धोक्यात येईल तसा नव्हे. नक्की विचार करा. तुमचा एक विचार कुण्या पक्षीच जीव धोक्यात जाण्या पासून वाचवेल.   
शेवटी. मकर संक्रांतीच्या तुम्हास आणि तुमच्या कुटुंबीयास हार्दिक शुभेच्छा


तुमचा
जितेंद्र इंदवे

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

नवीन वर्ष : आशेचे , शिकण्याचे आणि प्रगतीचे .

     ३१ डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. बरेच काही देवून गेले वर्ष आणि घेवून हि गेले. एकंदरीत दुख आणि सुख दोन्ही गोष्टीचा अनुभव झाला. बऱ्याच गोष्टी शिकलो. शाळेतच माहितगार झालो कि कोणत्या कोणत्या प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक असतात.तशी तर शाळेत पंचरंगी प्रजा  असल्या कारणाने त्यांच्या आचार विचाराचे वेग वेगळे रंग पाहिले. केराली, तमिळ , गुजराती, राजस्थानी अशी प्रजा शाळेत आहे.  अमुक विचाराच्या रंगात  रंगल्यावर आनंद झाला तर अमुक रंगात रंगल्यावर दुख झाले. थोडक्यात जेथे मला सामेल व्हायचे नव्हते तेथे मी सामील झालो. चूक तर माझीच होती. ती मी सुधारून  घेतली आहे.  
     डिसेंबर च्या १२ तारखेला डोळ्याचे लेसिक सर्जरी झाली. माझी दृष्टी कमजोर असल्या मुले चष्मा घालावा लागत होता. त्याचे मी निदान केले. आता दोन महिन्या पर्यंत मला काळा गोगल घालून फिरावे लागणार आहे. शाळेत देखील काळा गोगल घालून जातो. पण या गोष्टी मुळे मला अजून बरेच समजले. कोण माझे हित चिंतक आहेत किवा कोण हित शत्रू ते कळले. काळा चष्मा घालून शाळेत जात होतो तेव्हा काही लोक्काना वाटले कि मी नुसता हुशारी मारण्या साठी तो गोगल घातला असेल. त्यामुळे ते माझ्या बरोबर बोलत नव्हते. अगदी समोरून जात होते पण का म्हणून मी काळा चष्मा घातला ते विचारण्यात त्यांना रस नव्हता. काही तर बाजूला उभे असून हि एखादा अनोळखी चा व्यक्ती बाजूला उभा असावा तसे व्यवहार करीत होते. ते मला नजर अंदाज करीत होते. एका क्षणा साठी वाटले कि मी कुठे चुकलो तर नाही ना ? मला समजले होते. त्या काळ्या गोगल मधून जणू काही मी जगात लोंकाचा खरा चेहरा काय आहे ते पहिले.  जर कोणाचे चांगले होत असेल तर त्याला प्रोत्साहित करणारे आणि "छान" म्हणणारे खूप कमी असतात. 80 ते 90  टक्के लोक बनावटी स्मित चेहरावर ठेवत असतात. त्यांचा एकच बेत असतो की समोरच्या व्यक्ति कडून आपले काम कसे करवून घेता येईल. मग काम करवून घेण्यासाथी त्यांना वाटेल तेवढ्या खोट्या प्रशंशा कराव्या लागल्यात समोरच्या व्यक्ति साथी . ते ती गोष्ट हामखास पणे बेधड़क रित्या करतील. आणि जगात दूसरी एक विडम्बना अशी आहे की जर तो दुसरा व्यक्ति खरा असेल आणि त्याला पण एखादे काम करवून घ्यायचे असेल तर त्याला देखिल असा रोल करावा लागतो. खोटे बोलावे लागते, खोटी प्रशंशा एखाद्याची करावी लागते. थोडक्यात फार वाईट बनावे लागते. आज हाच नियम आहे जगण्यासाठी चा. जाऊ दया के उपदेश देत बसत आहे उगीच मी पण.!!