शनिवार, १४ जानेवारी, २०१२

मकर संक्रांती कि मोठे पाप ???

"कायपो छे रे ...ए पकड !!! आ राह्यो छेडो.....ए लाल गई, जो लीलो आवे छे .........."
सकाळी झोपलेलो असतांना कानावर हे शब्द पडत होते. आज सुट्टी असल्यामुळे नऊ वाजे पर्यंत झोपण्याचा बेत केला होता. पण या आरळा ओरळ होत होती म्हणून झोप उडाली. घड्याळात पहिले तर साडे आठ वाजले होते. परत झोपायचा प्रयत्न केला पण आवाज मुले काही झोप लागली नाही. मकर संक्रांत चा दिवस होता आज. लवकर लवकर तयार झालो. आणि छतावर गेलो. सर्वत्र हल्ला गुल्ला दिसत होता. प्रत्येक जन मोठा लाउड स्पीकर वाजवत होता. त्यामुळे जवळ चे व्यक्ती काय बोलत आहेत ते हि कळत नव्हते. सकाळचा जसा वरती गेलो तसा भूक लागत नाही तो पर्यंत खाली काही आलोच नाही. आई जेवण साठी वारवार बोलावत होती , पण माझे मन वरती आकाशात पतंग पाहण्यात तल्लीन झाले होते.तसे पाहिले तर दोन दिवस हा सन येथे गुजरात मध्ये साजरा केला जातो. लोक नुसते त्यांच्या रंगात रंगलेले दिसून येतात . खाण्या पिण्याचे तर विचारू नका. आज वर्तमान पत्रात आलेल्या बातमी नुसार सुरत मध्ये एका दिवसात लोक एकूण आठ करोड  .....होय तब्बल आठ करोड रुपयाची मिठाई व इतर खाद्य पदार्थ मध्ये पैसे उडवतात. मला तर वाचून फारच आश्चर्य झाले.एवढी रक्कम नुसती खाण्या पिण्या मध्ये ? मकर संक्रांतीच काय तर इतर सणा मध्ये देखील लखलुट पैसा लोक खर्च करत असतात. तसा मला पक्ष्या विषयी फारच प्रेम असल्याने मी कधी हि पतंग उडवत नाही. हो पतंग जर पकडायचा असेल ..तर चालेल ... पण उडवायचे नको रे बाबा. चार वर्षा पूर्वी मी मित्र कडे गेलो होतो , तेव्हा हाच सन होता. दोघे हि पतंग उडवत होतो. अचानक माझ्या पतंगाच्या दोर्याने एक पक्षी घायाळ झाले. आणि जमिनी वर पडले. ते तर फडत होते. मी त्याला उचलले. जख्मावर हळद लावले. पण शेवटी ते पक्षी मरण पावले. मला फारच दुख झाले. बस तेव्हा पासून चा नेम धरला कि आयुष्यात कधी हि पतंग उडवणार नाही. काय मिळते याने ? कधी आपण विचार करतो का ? फक्त या एका दिवसा मुळे लाखो पक्षी मरण पावतात. एवढे मोठे पाप कश्याला ? फक्त आपल्याला आनंद मिळावा म्हणून ??? .छे .... योग्य नाही. 
मित्रांनो, आनंद मिळवायचा असेल तर जरूर मिळवा. पण आपल्या आनंदामुळे  कोणाचा जीव धोक्यात येईल तसा नव्हे. नक्की विचार करा. तुमचा एक विचार कुण्या पक्षीच जीव धोक्यात जाण्या पासून वाचवेल.   
शेवटी. मकर संक्रांतीच्या तुम्हास आणि तुमच्या कुटुंबीयास हार्दिक शुभेच्छा


तुमचा
जितेंद्र इंदवे

३ टिप्पण्या:

  1. दुसऱ्याच्या वेदनेत रंगलेले सुख ,सुख असूच शकत नाही ! तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकलात पण काही महाभाग तेही करत नाहीत !

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. लोकांनी फक्त एकदा विचार करायला हवे .कि ज्या गोष्टीला आपण त्रास देत आहोत त्या जागी स्वतः राहिले असते तर ? जसे पक्षी मेले तसे आपण वारलो असतो तर ? फक्त विचारानेच भीती वाटते. येथे मनुष्य माणुसकी विसरलेला आहे. त्याला स्वतःच्या स्वार्थ आणि आनंदा शिवाय काही दिसत नाही.

      हटवा