मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

नवीन वर्ष : आशेचे , शिकण्याचे आणि प्रगतीचे .

     ३१ डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. बरेच काही देवून गेले वर्ष आणि घेवून हि गेले. एकंदरीत दुख आणि सुख दोन्ही गोष्टीचा अनुभव झाला. बऱ्याच गोष्टी शिकलो. शाळेतच माहितगार झालो कि कोणत्या कोणत्या प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक असतात.तशी तर शाळेत पंचरंगी प्रजा  असल्या कारणाने त्यांच्या आचार विचाराचे वेग वेगळे रंग पाहिले. केराली, तमिळ , गुजराती, राजस्थानी अशी प्रजा शाळेत आहे.  अमुक विचाराच्या रंगात  रंगल्यावर आनंद झाला तर अमुक रंगात रंगल्यावर दुख झाले. थोडक्यात जेथे मला सामेल व्हायचे नव्हते तेथे मी सामील झालो. चूक तर माझीच होती. ती मी सुधारून  घेतली आहे.  
     डिसेंबर च्या १२ तारखेला डोळ्याचे लेसिक सर्जरी झाली. माझी दृष्टी कमजोर असल्या मुले चष्मा घालावा लागत होता. त्याचे मी निदान केले. आता दोन महिन्या पर्यंत मला काळा गोगल घालून फिरावे लागणार आहे. शाळेत देखील काळा गोगल घालून जातो. पण या गोष्टी मुळे मला अजून बरेच समजले. कोण माझे हित चिंतक आहेत किवा कोण हित शत्रू ते कळले. काळा चष्मा घालून शाळेत जात होतो तेव्हा काही लोक्काना वाटले कि मी नुसता हुशारी मारण्या साठी तो गोगल घातला असेल. त्यामुळे ते माझ्या बरोबर बोलत नव्हते. अगदी समोरून जात होते पण का म्हणून मी काळा चष्मा घातला ते विचारण्यात त्यांना रस नव्हता. काही तर बाजूला उभे असून हि एखादा अनोळखी चा व्यक्ती बाजूला उभा असावा तसे व्यवहार करीत होते. ते मला नजर अंदाज करीत होते. एका क्षणा साठी वाटले कि मी कुठे चुकलो तर नाही ना ? मला समजले होते. त्या काळ्या गोगल मधून जणू काही मी जगात लोंकाचा खरा चेहरा काय आहे ते पहिले.  जर कोणाचे चांगले होत असेल तर त्याला प्रोत्साहित करणारे आणि "छान" म्हणणारे खूप कमी असतात. 80 ते 90  टक्के लोक बनावटी स्मित चेहरावर ठेवत असतात. त्यांचा एकच बेत असतो की समोरच्या व्यक्ति कडून आपले काम कसे करवून घेता येईल. मग काम करवून घेण्यासाथी त्यांना वाटेल तेवढ्या खोट्या प्रशंशा कराव्या लागल्यात समोरच्या व्यक्ति साथी . ते ती गोष्ट हामखास पणे बेधड़क रित्या करतील. आणि जगात दूसरी एक विडम्बना अशी आहे की जर तो दुसरा व्यक्ति खरा असेल आणि त्याला पण एखादे काम करवून घ्यायचे असेल तर त्याला देखिल असा रोल करावा लागतो. खोटे बोलावे लागते, खोटी प्रशंशा एखाद्याची करावी लागते. थोडक्यात फार वाईट बनावे लागते. आज हाच नियम आहे जगण्यासाठी चा. जाऊ दया के उपदेश देत बसत आहे उगीच मी पण.!! 

     शेवटचा दिवस असल्या मुले शाळेत संध्याकाळी सहा वाजेला एक लहान पार्टी होती. सहाजिकच पणे मला पण जाणे भाग पडले. संगीत खुर्ची चा कार्यक्रम झाला. नंतर अन्ताक्षरी खेळले. फार फार मजा आली. अजुन बरेच काही होते. पण मधेच ऑडियो प्लयेर मध्ये बिघाड झाला. त्यामुले पुढचा कार्यक्रम रद्द करावा लागला. रात्रि चे सवा आठ वाजले होते. प्रत्येकाचे डोळे डिन्नर शोधत होते.सर्व जन दोन, चार, पांच असे  ग्रुप करूँन एक दुस्र्याशी चर्चा करत होते. माझ्या बरोबर हजर असलेली पुरुष मंडळी निघून गेली होती. फ़क्त मी आणि P  T  चे शिक्षक असे दोन पुरुष मंडळी हजर राहिली होती. आणि बाकी सर्व medams  होत्या . होल मध्ये बाजुला जावून गुप चुप उभा राहिलो. आणि निरिक्षण केले इकडे तिकडे की कोण काय करत आहे.  काळा चश्मा असल्या मुले  माझी नजर कुठे जात आहे ते कोणाला समजत नव्हते. मी समोरच्या व्यक्ति कड़े जर पाहिले त्याला वाटायचे की माझे त्यांच्या कड़े लक्षच नाही म्हणून मला कोणी प्रतिसाद देत नव्हते. मधेच समोरून पसार होत असतांना primary  च्या एक मैडम ने विचारले. की कधी झाले डोळ्याचे ओपरेशन. कोणी बोलत नव्हते आणि अचानक कोणी बोलले म्हणून फार उत्साह वाढला.मी प्रतिसाद देता उत्तर दिले की दोन आठवडे झालेत. आता बरे आहे म्हणून. पण माहित नाही के झाले. नंतर माझ्या कडून त्या medam  ची फारच थट्टा मश्करी झाली. पण त्यांनी राग काही व्यक्त केला नाही. कदाचित .............हो कदाचित ..मला त्यांचे आकर्षण झाले होते. अर्धा पाऊन तास माझे लक्ष काही त्यांच्या वरून दुसर्या गोष्टी वर जात नव्हते. खाऊन पिऊन निघत असतांना देखिल मला राहिले गेले नाही आणि परत थट्टा केली. फार मस्त, आणि उत्तम दर्जाची व्यक्ति आहेत त्या मेडम. शेवटी मनात आले की थट्टा करून चुकीचे केले. एक तर अगोदर पासून च माझ्या लिस्ट मधे चांगल्या लोकांचा तुटवडा आहे. आणखी जर एखादी गेली तर दुष्काळच पडेल. मग  घरी जावून त्यांना आणि माझ्या इतर मित्रांना नव्या वर्षाच्या मोबाईल  वर शुभेच्छ्या पाठवल्यात . एक चंग बांधला की या वर्षी मला चांगल्या लोंकाचे सम्बन्ध जपून ठेवायचे आहेत.बस !! डोळे बंद केले आणि एकच विचार केला जितेन्द्र एक नविन सकाळ परत तुझे कर्त्तव्य आणि पराक्रमाची साक्ष होण्याची वाट पाहत आहे ज्या  काही गोष्टी गेल्या वर्षी दुःख देवून गेल्यात त्या आता जसा सूर्यास्त वेळी सूर्य मावळतो तशा तुझ्या हृदयात मावळू दे , या विचारा सह मी ३१ डिसेंबर २०११ चा शेवटचा निरोप घेतला आणि  गाड़ निद्रेत  झोपलो.  तर मित्रांनो तुम्हास पण या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा  नवीन वर्ष भर  भराटी चे जावे अशी देवा चरणी प्रार्थना  .

तुमचा 
जितेन्द्र इन्दवे           
   

३ टिप्पण्या:

  1. फार फार आभार ...तुम्हास हि हे वर्ष भर भराटी चे जावे अशी प्रभू चरणी प्रार्थना
    आणि कृपया तुम्ही ब्लोग लिहिणे चालू ठेवा. फारच हौशेने वाचते मी तुमचा ब्लोग.

    उत्तर द्याहटवा