फेसबुक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फेसबुक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

फेसबुक चा पंचनामा

रात्रीचे दहा वाजलेले आहेत, समोरच सत्संग चा कार्यक्रम असल्या मुळे लौड स्पीकर चा मोठ्याने घोंघाट  होत आहे. आज बारा ते एक वाजे पर्यंत काही झोप लागणार नाही. अगदी खिडकीच्या समोरच्या दिशेला तो लाउड स्पीकर लावलेला आहे. इ मेल चेक केले, फेसबुक वर थोडा हिंडलो. पण कंटाळा आला. काही नवीन नाही. तीच लबाड गोष्ट दिसते. एखादी मुलगी एखादे फोटो अपलोड करते आणि मध माश्या प्रमाणे मुळे कमेंट करण्यासाठी तुटून पडतात. त्या फोटो मध्ये जरी काही आकर्षक नसेल तरी बेफाम पणे "wow", "nice", "chhaan" वगैरे सारख्या शब्दाचा प्रेम पूर्वक वर्षाव होतो.घरात असलेले फ्रीज आणि फेसबुक यांच्यामध्ये एक साम्म्यता आहे. ती म्हणजे आपण नेहमी अधून मधून फेसबुक उघडून बघत असतो. कोणी कमेंट केली तर नाही न ? कोणी मेसेज तर नाही केला ना ? पण तिथे नवीन काही नसते. तसेच फ्रीज च्या संदर्भात आहे आपण परत परत उत्सुकतेने दरवाजा उघडून पाहतो पण नवीन काही नसते. होय , पण एक अपवाद म्हणावा लागेल. तो अपवाद म्हणजे लबाडी. अशी विधाने हामखास पणे फेसबुक वर पहावयास  मिळतात. पण एक गोष्ट तर स्वीकारावीच लागेल कि जिथे मुली असतील तेथे गर्दी असेलच. दोन आठवड्या पूर्वी माझ्या एका मैत्रिणीला फेसबुक वर एका दिवसात २०३ फ्रेंड्स request मिळाल्यात. फेसबुक च काय ..ओर्कुट मध्ये देखील तसेच. असे वाटते ना कि मुली साठी अर्धे जग रिकाम टेकडे आहे. एक  वेळ होता शालेय मुला मुलींच्या हातात जास्तकरून अभ्यास विषयक साहित्य असायचे . आता फक्त मोबाईल फोन दिसतो.आणि त्यात हि ते फेसबुक वर चिकटलेले दिसतात. अहो  चालू वर्गात देखील !!!...
आज माझ्या BSNL च्या conection  मधेय प्रोब्लेम असल्याने फोन कॉम्पुटर शी जोडून इंटरनेट सर्फिंग करत होतो. वाटले आज छान स एखादा टोपिक लिहिणार पण............ ...हत्ती च्या !!!??!  पावर कट झाला आहे. बेटरी आवाज करत आहे.कॉम्पुटर बंद करावे लागणार. पण समोर जनरेटर वर परत घोघाट सुरु झाला आहे त्यामुळे   कानात कापूस खुपसावा लागणार .. चलां, नंतर कधी आपण चर्चा करू. भेटू मग...शुभ रात्री.

     
  

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

तर चला परत वास्तविक जगाकडे.

      आज तारीख ५ ऑगस्ट २०११ वार शुक्रवार सकाळ ची वेळ. सहज फिरता फिरता माध्यमिक विभागात गेलो. स्टाफ रूम मधे शिरलो . पाहतो तर काय ? आमचा प्यून जो बिचारा दोन तीन दिवसा पासून चा फेसबुक वियोग मध्ये कोरड़ा झाला होता. तो समोरच्या कंप्यूटर वर यु एस बी डिवाइस लावून फेसबुक सर्फ़ करत होता. आणि त्याच्या मुखावर अमूल्य हास्य होते. तो फारच प्रसन्न मुद्रेत असल्याचे दिसत होता . माझ्याकडे तेव्हा त्याने जास्त लक्ष देण्याची तस्दी पण घेतली नाही. तरी मी मागे एक खुर्ची वर जावून बसलो व एक शिक्षक बरोबर चर्चा करू लागलो. जवळ पास अर्धा तास झाला पण तो फेसबुक वरील व्यक्ति न इकडे पाहतो न तिकडे . सारखे कंप्यूटर स्क्रीन वर लक्ष ...   टेबला वर कोफ़ी चा कप भरून ठेवलेला आहे पण त्याचे फेसबुक शिवाय कोठे ही लक्ष नाही एवढा तो त्याच्यात मग्न आहे. 
     अजून पाच मिनिटे पसार झाली असतील तेवढ्यात पावर गेली. तेव्हा जणू काही मोठे संकट त्या प्यून वर कोसळले असावे असा चेहरा त्याचा झाला . परत तीच उदासी , आणि गंभीर मनःस्थिती त्याची झाली. मला कळत नव्हते त्याची मानसिकता कशी असेल फेसबुक साठी ? तसे जर खोल वर विचार केला तर हा प्रश्न खरोखर गंभीर आहे. चिंतेचा विषय आहे. आजची तरुण पिढी या सोसीअल नेट्वर्किंग च्या नादात पडून वास्तविक जीवनात जगण्याचा आनंद गमावतात व त्या काल्पनिक जगाला वास्तविक जग समजून घेतात. अशीच गत या प्यून ची झाली आहे. दोन दिवसा पूर्वी त्याला मी फक्त दोन तीन दिवस वाट पाहण्यास सांगितले , पण तो काही थांबला नाही आणि नवीन इंटरनेट कनेक्शन घेवून फेसबुक वर जावून परत चिकटला. कुठे चालले आहे आज जग ? वास्तविक जीवनाचा आस्वाद सोडून काल्पनिक जगाकडे ? मनुष्याने तंत्र ज्ञानाचा पाया टाकला , संशोधन केले  ते प्रगती साठी. मनुष्याच्या विकास साठी, फायद्यासाठी ..पण तुम्हास वाटते खरोखर आपण फायदा करून घेत आहोत या गोष्टी पासून ? मित्रांनो , जागे व्हा , अजून वेळ गेलेली नाही. पहा जरा आजू बाजूला या फेसबुक च्या नांदात तुम्ही वास्तविक जीवनातून तुमचे मित्र , स्नेही वगेरे तर नाही गमावत आहात ना ?  

मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

फेसबुक ....फेसबुक .......फेसबुक .........??!!!!!

 जिकडे पाहिले तिकडे एकच गम्मत दिसते  ती गम्मत म्हणजे फेसबुक. हल्ली लोकांचे जीवन धोरण बदलले आहे. लहान मोठे सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. जिकडे तिकडे फेसबुक ची माया कामावर, जेवतांना , खेळतांना , छोटे से लहान काम का असे ना  "लगेच सामुरून उत्तर मिळते फेसबुक वर भेट आपण चर्चा करू "  काय चाललंय हे ? वाटते मनुष्याच नियंत्रण फेसबुक च्या हातात गेले आहे. कामावर एक प्यून आहे. बरेच दिवसा पासून त्याच्या मोबाईल वर फेसबुक उघडत नाही. बिचारा सारखा चिंता करतोय. खाण्या पिण्या कडे पण  लक्ष देत नाही मला तर आश्चर्याच वाटते . मगाशी माझ्या कडे येवून हळूच बोलला यार हे फेसबुक वाले आणि आपल्या सरकार मध्ये काही फरक नाही . मी विचारले का बरे ? तू असे को बोलतो ? तर त्याने मला फेसबुक उघडत नाही म्हणून ही हकीकत सांगितली. मला तर फारच हसू आले कि हा माणूस , त्याच्या फोन वर फेसबुक बंद आहे तर किती तळमळत आहे. मला त्याचा फेसबुक वियोग पहिला जात नव्हता. अर्थात हसू हि फार येत होते आणि नवल पण वाटत होते. पण मी करणार तरी काय या केस मध्ये ? त्याला अजून तीन चार दिवस वाट पाहण्याचे आश्वासन दिले आहे.  पाहुया काय होते ते या दोन चार दिवसात ...