मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

ट्राफिक सिग्नल

     बरेच दिवस झाले काही लिहिले गेले नाही ब्लोग वर. सारखे काम , काम आणि फक्त कामच थोडा फार वेळ उरला असेल तर तो वाचन करण्यात  आणि समाचार मध्ये अन्ना हजारे यांना पाहण्यात जातो. आज शाळा चार तास लवकर सुटली, तर बराच वेळ मिळाला इथे लिहिण्यासाठी. वाटले थोडे फार लिहावे येथे. हल्ली सुरत मध्ये वाहन चालकावर फारच कडक पद्धतीने शिक्षा केली जात आहे. हेल्मेट नसेल तर दंड, फारच गतीने वाहन चालवत असेल तर, रोंग साईट वर पार्किंग केली असेल तर दंड, येथे तुम्ही म्हणाल कि यात काय नवे ? हे तर प्रत्येक मेट्रो सिटी मध्ये आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच कि आता पर्यंत वाहन चालकावर सक्तीने नियम नव्हते लावले गेले. आता तर तुम्ही जरी दोन मिनिटा साठी वाहन रोंग साईट वर लावली म्हणजे झाले ....समजून घ्यायचे कि खिश्यातून एक महात्मा गांधी ची नोट गेली. सध्या ट्राफिक शाखेतील सर्व पोलिसांना एक फ़िक्ष टार्गेट देण्यात आला आहे कि अमुक दंडाची रक्कम जमा व्हायलाच हवी, नाही तर बदली किवा इतर कार्यवाही साठी तयार असावे. मग गम्मत अशी झाली आहे कि जे ट्राफिक नियंत्रक आहेत ते सकाळी १० ची ड्युटी असतांनाही सकाळी ६.३०  ला  किवा ७ वाजेला त्यांच्या गणवेशात सज्ज होवून रोडवर दिसायला लागतात. आणि मग तेच वसुलीचे रामायण चालू होते. चांगलेच कलेक्शन करून घेतात ते. पण त्यात मात्र ओटो रिक्षा चालकांना चांगलाच त्रास होतो. पहाटे पहाटे गच्च रिक्षा भरून ते स्टेशन कडे निघालेले असतात.साहजिकच पणे  जास्त प्रवासी असल्या कारणाने ते  रोडवर उभे असलेल्या पोलिसाची नजर चुकवून वाट  काढण्याचा प्रयत्न करतात. नजर चुकवून निघून गेले तर चालकांचे गुड लक नाही तर बेड लकच समजावे .कधी कधी पाठलाग पण  करतात. अमुक वेळेस तर तुमच्या कडे सर्व काही असतांना पण काही न काही कारण काढून पैसे वसूल करतीलच. त्या पोलीस अधिकार्यांना त्यांचे वरील अधिकारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्रास देतात तर ते त्रस्त पोलीस वाहन चालकांना एक प्रकारचा त्रास देतात. पुष्कळ वेळा या डोकेदुखी मूळे मला देखील शाळेत पोहचायला उशीर होतो त्यामुळे कधी कधी प्रिन्सिपल ची कट कट ऐकावी लागते.आज देखील ऑटो रिक्षा चालकाला एका पोलिसाने अडविल्याने निव्वड अर्धा ते पौन तास घरी येण्यास उशीर झाला.मला त्या दोघांवर फार राग आला होता, पण काय करणार रोज असाच नित्यक्रम चालणार असल्यास ? इथे ऑटो रिक्षा चालक त्या वाहने नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला "मामा" म्हणून संबोधित करतात. पुढे चालक जवळ जर एखादा प्रवासी बसलेला असेल तर चालक त्याला थोड्या वेळा साठी उतरून देतील आणि म्हणतील "आगे मामा खडा है , थोडा पैदल चल के उधार के  साईट पे निकल , मै मामा को झांसा देके आता हु."  म्हणजे असेच काही तरी म्हणतील कि जे एकल्या वर हसू येणार. ट्राफिक स्पोट वर कधी कधी फार पाहण्यालायक  दृश्य निर्माण होते. इकडे सारखी वाहनाची गर्दी असते. होर्न वर होर्न वाजून चालक नुसते गोंगाट करत असतात आणि दुसर्या बाजूला रोडच्या एखाद्या कडेला किवा केबिन मध्ये चालक कडून दंडाची रक्कमेच्या नावाने पैसे मोजले जात असतात. अमुक वेळेस गाई म्हशीची रोडवर गर्दी झाल्याने ट्राफिक समस्या निर्माण होते, ती समस्या सोडविण्या साठी पोलिसांना त्यांचा मेन स्पोट सोडून गाई म्हशीच्या मागे हाकलण्यासाठी काठी घेवून पडावे लागते. आणि एकी कडे वाहन चालकांची चांगलीच आरडा ओरड सुरु होते. तेव्हा त्या पोलिसांवर हसू येते. आठवड्यातून दोन तीन दा तर या प्रकारचे दृश्य हमखास पहावयास मिळतात. काही लोक नुसती गम्मत पहावयास मिळेल म्हणून मेन रोडवर जावून विड्या ओढत त्या पोलिसावर आणि येणाऱ्या जाणार्या चालकावर दृष्टी फेकत असतात. पण मात्र अमुक वेळेस ते देखील सहन करतात. जास्तच जर गर्दी झाली तर मात्र बिचारे फटके खात असताना आढळून येतात.

२ टिप्पण्या:

  1. मजा आली वाचून , तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी आमच्या इथे पण घडतात . मला वाटते जवळ जवळ सर्वच ठिकाणी हे घडत असेल.
    तरी खरोखर माला आवडला तुमचा लेख ...

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्याला लेख आवडला त्या बद्दल मना पासून आभार.

    उत्तर द्याहटवा