सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

शिक्षक दिवस

     आज टीचर्स डे होता. शाळेत जाण्यासाठी लवकर उठलो. आणि लवकर लवकर तयार झालो. शूज घालून दरवाज्याच्या बाहेर निघणार च होतो तोच जोराचा पाउस सुरु झाला. वाटले पाच ते दहा मिनिटे चालेल जास्तीत जास्त . पण हे काय ? पाउसाचे तर बंद होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. शिवाय रेनकोट देखिल फाटलेला होता ते घालून घराबाहेर पडू शकत नव्हतो. तरी बाबानी जेम तेम एक जुनी लहान छत्री शोधून दिली. आणि मग निघालो घराबाहेर. पण कही उपयोग झाला नाही. कारण रोडवर एक ही ओटो रिक्शा चालक थांबत नव्हता. जवळ जवळ दहा ते पंधरा मिनिटे छत्री हातात घेवुन भर पाण्यात ओटो रिक्षाची वाट पाहिली. मला वाटले आज परत प्रिंसिपल मेडम उशिरा पोहचल्या बद्दल रागवतील आणि काही पण बोलतील. शेवटी एक रिक्शा थांबली. ती अगोदर पासूनच गच्च भरलेली होती. बसण्यासाठी  जागा दिसत नव्हती. तरी रिक्शा चालकला मला बसवून घेण्याची घायीच झाली होती. जसा तसा बसलो आत. बसल्या बसल्या विचार करत होतो की काय वातावरण असेल शाळेत ? कारण शाळेत माझी छबी मुले व मुली साठी सर्वानाच मी पसंत पडेल  तशी नाही. रोजच कोणत्या न कोणत्या वर्गात एकाद दोन मुले किव मुली माझ्या संतापाला बळी पड़त असतात. डोक्यात प्रश्न चिन्ह घेवुन पौन तासानंतर, उशिरा पोहचलो शाळेत. प्रिंसिपल फारच आनंदात असल्याचे दिसून आली शिवाय एका पालका बरोबर त्यांचे संभाषण चालू असल्या कारणाने माझ्या कड़े त्यांचे लक्षच गेले नाही. 
     धावत पहिल्या मजल्यावर पोहचलो. तोच समोरून मला पाहताच प्रायमरी विभागाचे विधार्थी केक घवुन धावत आले. आणि मला मधेच उभे करून सर्व विद्यार्थी प्रेमाने केक चा एक एक घास घालू लागले. बाकीचे हेंड शेक करून शुभेच्छा देत होते तर बाकी चे पाया पडून शुभेच्छा व्यक्त करत होते. त्यांचा एक एक घास माझ्यासाठी मोठा घास ठरला. तोंडात जागाच शिल्लक नव्हती जो तो येवून घास केक च टुकड़ा माझ्या तोंडाशी लावत होता. लहान मुलाची माती खाल्ल्या नंतर जी दशा होते तशी माझी झाली होती. ओठ , नाक आणि गाल सुद्धा केक च्या क्रीम ने भरले गेले. मग मी स्टाफ रूम कड़े न जाता सरळ पाणी पिण्याच्या ठिकाणी गेलो आणि तोंड धुतले. तरी थोड़े फार गालावर राहून गेले. स्टाफ रूम मधे शिरताच सह शिक्षिका गण हसू लागले माझ्या वर. मी त्वरीत समझलो की ते का हसले असतील त्यामुले मी परत तोंड धुण्यासाठी गेलो. परत आलो बसलो. सर्वांना शुभेच्छा दिल्यात एकड़ तिकडच्या दोन गोष्टी केल्यात. दहा पंधरा मिनिटे झाले असतील तोच बारावी सायंस च्या मुलींची गर्दी आली. सर्व शिक्षक शिक्षकांना केक दिल्या नंतर माझ्याकडे आल्यात. वाटले फ़क्त केक देवून चालले जातील पण आपण रंगाची जशी होळी खेळतो तसे त्यानी केक माझ्या आणि जवळ बसलेल्या एक शिक्षिकाच्या गालावर लावले. मी तर थक्कच झालो पाहून. पण सर्व जन फार उत्साहात होते त्यामुले काही बोललो नाही. मी पण उत्साहात सहभागी झालो. काहिनी केमेरा आणलेला होता तर फोटो काढले. ग्रीटींग्स कार्ड दिलेत आणि आनंदाने आणखी शुभेच्छा देण्यासाठी इतर वर्गात निघून गेल्यात. परत तोंड धुतले बसलो. वाटले आता शांती राहिल. पण माझा विचार चुकीचा होता तोच नवव्या वर्गातील मुलांची गर्दी आली. परत तोंडात एक एक करून केक ठोसू लागले. केक खावुन पोट असेच अगोदर भरून गेले होते इच्छा नव्हती पण मुलांच्या आग्रहाला मी नकार देवू शकत नव्हतो. परत तोंड भरले. आणि परत धुण्यासाठी गेलो. सकाळी सात पासून हाच कार्यक्रम चालला शाळेत एक वर्ग गेला की दूसरा वर्ग दूसरा गेला की तीसरा वर्ग. शेवटी मी केक खाऊन खाऊन दमलो. पण समोर केक घेवुन येणारे मुले मुलींचा प्रवाह काही कमी झाला नाही. शेवटी जाताना देखील प्रायमरी च्या प्रिंसिपल मेडम ने प्रयमरिच्या विभागाच्या स्टाफ रूम मध्ये मेनेज केलेल्या छोट्या पार्टी मधे बोलवले. तेथे ही नकार देवू शकत नव्हतो. तेथेही ठासून ठासून खाल्ले. 
     मधली सुट्टी पर्यंत हेच चालले. शाळेत सर्वत्र हर्ष आणि उल्हास होता. प्रत्येक वर्गात मुले व मुली शिक्षक म्हणून शिकवत होते. इतर ग्रुप फोटो घेत होते. शुभेच्छा देत होते ..फार आनदाचा क्षण होता तो. सर्वांच्या चेहर्यावर हास्य होते. आजचा दिवस मला खरोखर अविस्मर्णीय वाटला.   

३ टिप्पण्या:

  1. चांगलाच मजेत दिवस पसार केला तुम्ही ..छान

    उत्तर द्याहटवा
  2. खरच खूप मजा केलीस तू तूझा अनूभव वाचून माझ्या मनात ही माझ्या जून्या आठवणी जाग्या झाल्या.आणि मला परत लहान व्हावस वाटलेखरच खूप मजा केलीस तू तूझा अनूभव वाचून माझ्या मनात ही माझ्या जून्या आठवणी जाग्या झाल्या.आणि मला परत लहान व्हावस वाटले

    उत्तर द्याहटवा
  3. अनामित आणि सीमा दोघांचा ही खुप आभार

    उत्तर द्याहटवा