मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

फेसबुक ....फेसबुक .......फेसबुक .........??!!!!!

 जिकडे पाहिले तिकडे एकच गम्मत दिसते  ती गम्मत म्हणजे फेसबुक. हल्ली लोकांचे जीवन धोरण बदलले आहे. लहान मोठे सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. जिकडे तिकडे फेसबुक ची माया कामावर, जेवतांना , खेळतांना , छोटे से लहान काम का असे ना  "लगेच सामुरून उत्तर मिळते फेसबुक वर भेट आपण चर्चा करू "  काय चाललंय हे ? वाटते मनुष्याच नियंत्रण फेसबुक च्या हातात गेले आहे. कामावर एक प्यून आहे. बरेच दिवसा पासून त्याच्या मोबाईल वर फेसबुक उघडत नाही. बिचारा सारखा चिंता करतोय. खाण्या पिण्या कडे पण  लक्ष देत नाही मला तर आश्चर्याच वाटते . मगाशी माझ्या कडे येवून हळूच बोलला यार हे फेसबुक वाले आणि आपल्या सरकार मध्ये काही फरक नाही . मी विचारले का बरे ? तू असे को बोलतो ? तर त्याने मला फेसबुक उघडत नाही म्हणून ही हकीकत सांगितली. मला तर फारच हसू आले कि हा माणूस , त्याच्या फोन वर फेसबुक बंद आहे तर किती तळमळत आहे. मला त्याचा फेसबुक वियोग पहिला जात नव्हता. अर्थात हसू हि फार येत होते आणि नवल पण वाटत होते. पण मी करणार तरी काय या केस मध्ये ? त्याला अजून तीन चार दिवस वाट पाहण्याचे आश्वासन दिले आहे.  पाहुया काय होते ते या दोन चार दिवसात ...

1 टिप्पणी:

  1. छान मित्रा ....लायी आवडले ...असेच post कर येथे. फारच हसू आले...कसे लोक असतात ? फक्त फेसबुक साठी तळमळत आहे.. छान ...उत्तम आणखी post कर आतुरतेने वात पाहतो आहे

    उत्तर द्याहटवा