रविवार, ३० डिसेंबर, २०१२

बायको पाहिजे - भाग ३

indian-dulhan-in-dress
        मित्र पण  सांगतात - "यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणार...थांबव कि आता...एखादी पसंत  कर आणि लग्न कर ..कश्याला एवढे खोल वर विचारतो.". पण मला उत्तर न देणेच योग्य वाटते. शाळा नियमित सुरु झालेली आहे. मुलगी पाहण्यासाठी सुट्टी घेवून बाहेर गावी जाणे कमीत कमी मार्च ते एप्रिल पर्यंत शक्य नाही. तरी मध्येच  जर सतत दोन तीन दिवसाच्या सुट्या आल्यात कि आई घाई करते. थोड्या दिवसापूर्वी सुरत मधेच आणखी एका बी एड झालेल्या मुलीसाठी आमंत्रण आले. पण इथे पण तेच नाटक होते. मुलीचा बाप राजकारणी (नेता ) होता. जे मला अजिबात आवडत नाहीत. पण आई ने केलेल्या जोर जबरदस्ती मुले जावे लागले. मुलगी सुरत मधेच कुठे तरी शाळेत माध्यमिक विभागात खाजगी जोब वर होती.
     त्या स्थळी  एका नातेवाईक द्वारे जाण्याचे ठरले. मी, आई आणि एक नाते वाईक अशी तीन व्यक्ती तेथे गेलो. दुपारची वेळ होती. बहुतेक लोक झोपलेले असतात त्या वेळी. अश्या वेळी एका सोसायटी मध्ये घर शोधत शोधत आम्ही पोहचलो. जेम तेम ते घर सापडले. एरिया थोडा अंडर प्रोग्रेस होता. पुरेशी सोय अजून झालेली नव्हती.घराच्या बाहेर मुलीच्या वडिलाने मोठे  बेनर  लावले होते. ठळक अक्षरात  दुरून कोणाला हि दिसेल अश्या पद्धतीने एका राजकीय पक्षाचे आणि स्वत:चे  नाव लिहिले होते. ज्या प्रकारे ते बेनर लावले होते त्या वरून मी एकच अंदाज लावला कि या व्यक्तीला लवकरच एखादा मोठा नेता होण्याची घाई झालेली आहे. बाहेरून लोखंडी दरवाजा बंद होता.आम्ही बेल वाजली.मधून एक स्त्री आली व सस्मित आम्हास आत येण्यास आग्रह केला. दरवाजाच्या अगदी समोर सोफा सेट वर मुलीचा मावशीचा मुलगा उलटा (उताणा) होऊन झोपलेला होता.त्याची पेंट मागून अर्धी उतरलेली असून  "रूपा" ची अंडर विंयर दिसत होती. ते पाहून मला अमीर खान चा  गेल्या वर्षी आलेला चित्रपट  Delhi Belly आठवला. त्याच्यात एक केरेक्टर अगदी तसेच आहे. मुलीच्या आई ने त्यास तीन चार थाप मारून उठवले. कुंभ कर्णी निद्रेतून जागे होऊन तो सरळ किचन मध्ये गेला.मुलीच्या आई आणि माझ्या आई मध्ये संभाषण झाले. पण मी कोणाशीही बोलू शकत नव्हतो कारण माणसा पैकी एक हि हजर नव्हते. त्या च संदर्भात मी त्यांना (मुलीच्या आईला ) विचारले समोरून मला उत्तर मिळाले कि "आज इलेक्शन आहे त्यामुळे ते वार्ड (बूथ) वर गेलेले आहेत." हे ऐकून मला तर आश्चर्याचा धक्का बसला होता. एकच विचार मनात आला कि स्वत:च्या मुलीच्या लग्नाची गोष्ट निघालेली आहे आणि हा व्यक्ती घरी न थांबता बाहेर आहे. याचा अर्थ काय? कि त्याला कसली हि पडलेली नाही "राजकारण" शिवाय......
     थोडा वेळ झाला मुलीच्या आईने मुलीला चहा पाणी घेवून येण्यासाठी थोड्या हळू स्वरात ओरडली. तिकडून संतापात उत्तर आले - "हो येतेय !" त्याच क्षणी मी तिच्या आई कडे पहिले , नेमके त्याच क्षणाला त्यांनी देखील माझ्या कडे पाहिले आणि मान खाली करून घेतली.पंजाबी ड्रेस  मध्ये हातात चहा चा ट्रे घेवून ती हजर झाली. मी चहा घेतला. चहा जास्त होता म्हणून कमी करण्याचा आग्रह केला.पाच मिनिटा पर्यंत निवांत पाने चहा घेतला.  ती आली चहाचे कप व पाण्याचे ग्लास व ट्रे  घेवून किचन मध्ये परत गेली.मुलीच्या आई ने  तिला परत बोलावले समोर काही विचारायचे असेल तर विचारण्यास सांगितले. 
     आता दुसया वेळेस ती किचन मधून आली तेव्हा मात्र थोडी वेगळी दिसली.ज्या प्रमाणे मुले तोंडात बबल गम ठेवून तोंड हलवतात तशी ती तोंड हलवत आली. बहुतेक तिच्या तोंडात च्व्हिङ्गम होते.ते पाहिल्यावर तिला विचारण्यासाठी जे प्रश्न डोक्यात होते ते सर्व पुसले गेले. आणि "हम आपके है कोण ?" चित्रपटातील एकच दृश्य डोळ्या समोर आले - "जेव्हा सलमान खान बबल गम खात असताना माधुरीला गुलेल ने मारतो" 
मन सांगत होते कि जितु "या मायाशी लग्न केले म्हणजे तुला माधुरीचा रोल करावा लागेल आणि ते सलमान खान बनेल. जी रोज तोंडात चिंगम ठेवून गुलेल ने तुला मागे  मारेल.. "
     मी एका मिनिटा साठी विचारात पडलो होतो कि शिक्षिका असून असे कसे ? पण उत्तर कोण देणार ? कदाचित त्यांच्या घरात जर जास्तच मुक्त वातावरण असेल सुरुवाती पासून.येथे नुसत्या औपचारिकता म्हणून मी तिला शिक्षणा बाबतीत दोन तीन प्रश्न केलेत. सी आय डी  सारखे जास्त विचार पूस न करणेच मला योग्य वाटले. आणि आम्ही तेथून निरोप घेतला. बाहेर आल्या वर आईला म्हटलो - "आई !!!! केस क्लोज  नो मोर इन्क्वायरी ". आई ने देखील "होकार" मध्ये डोके हलवले. तो विषय तिथेच संपला होता.

     आणखी पाचेक दिवसा नंतर "आहिरे साहेबा कडून" (आहिरे व म्हतारी  यांच्या बद्दल अधिक माहिती साठी भाग दोन वाचा ) परत त्याच म्हातारी द्वारा एका नवीन मुलीला पाहण्यासाठी आमंत्रण आले. मुलगी आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाला होती. एवढी लायकात पाहून कोणी हि व्यक्ती "नाही" म्हणणार नाही. तरी येथे मनात संशय निर्माण झाला. संशय असा कि स्वत:च्या साली साठी त्या व्यक्तीने (आहिरे साहेबांनी ) मला पुढे न करता , मागेच केले होते. अर्थात त्याच्या साली साठी मला ते योग्य समजत नव्हते.  तर आता या नवीन स्थळा  साठी का बरे त्यांनी माझे नाव पुढे केले असावे ? डोक्यात एक प्रश्न चिन्ह होते. समोरून त्यांनी निरोप पाठवला कि अमुक दिवशी तुम्ही दुपारी अकरा वाजेला या म्हणजे आपण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पाडू. पण माझी शाळा जवळ जवळ एक वाजेला सुटते. त्या मुले हि बाब शक्य नव्हती , मी सांगितलेल्या वेळी जाण्यास असमर्थता जाहीर केली. आणि मग दोन दिवसा नंतर दुपारी दोन वाजेला पाहण्याचे ठरले.
     मी , आई व परत एक नाते वाईक अशी तीन लोक निघाले. मला वाटले स्थळ सुरत मधेच आहे तर काही लांब नसेल.पण मी चुकीचा होतो. ते स्थळ बरेच लांब होते. सुरत च्या बाहेर म्हणावे लागेल. ओटो चालकाने पण आम्हास अर्ध्या रस्त्यात सोडले. पुढे जाण्यास तो तयार नव्हता. मग ती चार किलो मीटर आम्हास पायी चालावे लागले. दूर पर्यंत एकी कडे शेती व दुसरी कडे बांधून पडलेले कोम्प्लेक्ष आणि रो हाउसेस दिसत होते. एकी कडे सिमेंट , कोन्क्रेत चे जंगल तर दुसरी कडे शेत. पण माणसे दुर्मिळ पणे दिसत होती.चालता चालता मधेच समोरून आहेरे  साहेब मोटार सायकल वर मागे एका व्यक्ती सह  गेस सिलिंडर नेत असताना दिसले. मी त्यांना दुरून ओळखले नाही. पण त्यांनी मला ओळखले.लगेच मोटार सायकल थांबवली.
मोठ्या स्वरात बोलले - "जयभीम हो इन्दवे साहेब. काय हो पायी !!!!!????? रिक्षा येते ना थेट ",
मी उत्तर दिले - "ओटो वाला तयार नव्हता त्यामुळे ....."
आहिरे - "बरे , असे करा तुम्ही सरळ माझ्या घरी जा , आई आहे बसलेली , तुम्ही भेटा आईला, मी जरा हा सिलिंडर पोहचवून येतो ..आणि काय हो सर तुमचा मोबाइल नंबर लागत नाही.."
मी - "तुम्ही युनिनोर चा नंबर डायल केला असेल. तो सध्या बंद आहे."
आहिरे - "कोणता नंबर चालू आहे ?"
मी - "बरे हा घ्या , ९९९८७११०४२"
आहिरे - " तुम्ही चिंता करू नका मुलगी हुशार आणि सुंदर आहे. सध्या आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाला आहे. माणसे देखील अगदी साधी  सिम्पल आहेत. ओ के . बरे ..येतो मी...नंतर चर्चा करू."

परत प्रश्न चिन्ह उदभवला कि ज्या व्यक्ती द्वारा पाहण्यासाठी आमंत्रण आले तीच सोबत हजर नाही.? असे का ?

     ते निघून गेले . तेथे रस्त्यातच मला माहित झाले कि त्यांनी तेथे नवीन घर एकाद महिन्या पूर्वी विकत घेतले आहे. आहिरे च्या घरी पोहचलो. चहा पाणी झाला. त्यांची पत्नी व आई बरोबर एक दोन गोष्टी झाल्यात. घर विषयी गोष्टी निघाली होती तेव्हा मिसिस आहेरी यांनी सांगितले कि त्यांनी घर २० लाख रुपयात घेतले आहे.आणि एका महिन्या नंतर रेट २५ लाख झालेला आहे. मला माहित होते कि त्या ठिकाणी, त्या विस्तारात प्लॉट चा रेट काय चाललेला आहे.. अर्थात ते निव्वळ पणे खोटे बोलत होते. कदाचित त्यांना स्वतः चे स्टेटस जरा  जास्त उंच दाखवायचे होते. मी नुसते "होकार"  मध्ये मान हलवत होतो.

     थोड्या वेळाने आम्ही त्याच एरिया मध्ये थोड्या अंतरावर असलेल्या मुलीच्या घरी गेलो.मुलीचा भाऊ आणि आई हजर  होती.प्रथम दृष्टीस ते अगदी सादे  आणि भोळे  प्रकारची माणसे असल्याची आढळून आली. मुलगी पण चांगली होती फक्त शरीराने माझ्या पेक्षा थोडी सळ पातळ होती. त्या मुलीचा भोळे पणा आणि अगदी सस्मित प्रेमाने हळूच विचार पूर्वक बोलणे मला फार आकर्षितकरत  होते. ओवर आल माझ्या लायक मुलगी होती. पण मनात असलेल्या प्रश्न चिन्हामुले मी पुढे पाउल न टाकता . माघार घेतली. या ठिकाणी मी तीन ते चार दिवसाचा अल्प विराम ठेवला. कारण सरळ "नकार" देणे येथे मला प्रथम वेळेसच कठीण वाटत होते.
   
क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा