मंगळवार, २९ मे, २०१२

डोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............

दोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा माझा प्रथमच प्रसंग होता. म्हणून एक वेगळाच प्रकारचा उत्साह होता. जाण्या अगोदर तेथे गडावर कोणती सुविधा आहे व कोठे थांबता येईल ती जानकारी इंटरनेट वर शोधण्याचा प्रयत्न केला. सप्तशृंगी मातेची वेब साईट सापडली पण पाहिजे तशी माहिती उपलब्ध नव्हती.रात्री दोन वाजेला सुरत हून प्रवास प्रारंभ केला.आई वडील आणि मी तसेच सोबत काका आणि त्यांची चार मुले होती.सकाळ च्या सहा वाजे पर्यंत प्रवास सुरळीत पार पडला . पण जसे आम्ही गुजरात च्या डांग जिल्ह्यात पोहचलो. चार हि बहिणी नी उलटी (ओमिट ) करायला सुरवात केली. कारण रस्ता सर्पाकार आणि वळणदार होता. ते त्यांनी पाहिले कि त्रास सुरु होत असे. पण नाइलाज होता. कोणत्याही प्रकारची औषधे सोबत घेतली नव्हती. त्यामुळे तो त्रास सहन करूनच पुढे जावे लागले. गाडीच्या दोन्ही बाजूचे दरवाजे बाहेरून रंगले गेले होते. दरवाजा उघडण्याचे hendal देखील सुटले नव्हते. सापुतारा या ठिकाणी चहा घेण्याचे ठरवले. दिवस उगवण्याच्या तयारीत होता. तेथील ते थंड आणि अल्हाद दायक वातावरण शरीरात एक वेगळ्याच प्रकारचे रोमांच उभे करत होते. सुरत व गुजरातच्या इतर भागातून आलेले प्रवाशी त्या वातावरणाचा आनंद घेत होते. पर्वतामागून सूर्याचे अगदी नयनरम्य दुर्श्य दिसत होते. फोन मध्ये बिघाड झाल्या कारणाने ते दृष्य मी घेवून शकलो नाही.ढगामध्ये कधी लाल तर कधी तांबड्या रंगाचे किरण पसरत होते. तर कधी अचानक सूर्य मावडला असावा तसा भास होत होता. सूर्य जणू काही लपा छपी खेळत असावा असे वाटत होते.पुढे आम्ही सापुतारा हून कळवण या भागातून नांदोरी ला जाण्याचा मार्गावर निघालो.पर्वतावर ढग जणू काही आम्हास पाहत होते.
     पहाटेची वेळ होती. सकाळी कळवण या मार्गाने जात असतांना मधेच रोडवर कोंबडी , पिले अमुक वेळेस कुत्रे मध्ये येत होते. त्यांना वाचवत वाचवत चालकाने व्यवस्थित गाडी काढली. चालकाला भीती वाटत होती जर  चाका  खाली एखादी कोंबडी किवा पिलू आले म्हणजे गेली एखादी गांधीजींची नोट त्यामुळे त्याने अगदी काळजीपूर्वक त्या मार्गावर गाडी काढली. कळवण भाग संपला. पुढे त्या गडाच्या मार्गावर नांदोरी चेक पोस्ट लागले तेथे आम्ही सगळ्यांनी प्रवेशद्वार कडे दोन्ही हात जोडून नमन केले. आणि  आम्ही लागलो त्या पवित्र नांदोरी च्या वाटेवर. गोल गोल फिरून त्या डोंगरावर वाट काढायची होती. शिवाय रस्ता देखील थोडा रुंद आहे.वर जात असताना ढग जणूकाही डोंगराला आलिंगन घालत होते.  जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही सुखरूप पणे वर पोहचलो. गाडी पार्क करून तेथील धर्मशाळेत आंघोळी साठी व्यवस्था आहे कि नाही ते शोधू लागलोत. आश्चर्य !!! किती तरी धर्मशाळा आहेत. पण आंघोळी साठी सोय नव्हती. सर्व कळे पाण्याची बोंब. आजू बाजूला लौज वर आंघोळी साठी विचारले तर एका व्यक्ती चे ३० ते ४० रुपये आणि आम्ही जवळ पास आठ जन होतो. म्हणून आम्हास ते खर्चिक वाटले. पण न इलाज होता. शेवटी एका लौज वर सर्वांनी दोन रूम भाड्याने घेवून स्नान केले. मला तर वाटले कि स्नान केल्या शिवाय दर्शन केले तरी चालेल फक्त मन पाप पासून आणि वाईट विचार पासून एकदाचे धुतले पाहिजे. पण काकांनी स्नान करून जाण्याचा आग्रह केला.सर्व तयार झाले आणि निघाले मंदिराच्या दिशेने. 
आई ला पूजा अभिषेक साठी जे काही लागते ते विकत घेतले. पादत्राणे एका दुकानात ठेवले आणि निघालो सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. सर्व प्रथम काकांनी व भाऊ बहिणींनी ज्योत पहिल्या पायथ्याशी लावली. त्याच्या मागो माग मी देखील कपूर च्या वडीची ज्योत लावली. अश्या बर्याच पायर्यावर ज्योती लावल्यात. मधेच एका स्थळावर सोबत घेतलेले तेल, जे एका प्लास्टिक च्या पिशवीत होते ते वाहिले. ते तेल का वाहिले ते आज पर्यंत मला समजले नाही. मला वाटले एखादी पौराणिक कथा असेल त्या मागे त्याची नक्की खाली उतरल्यावर माहिती घेवू. पण दर्शन करून परत फिरल्यावर मला काही त्या बाबतीत विचारयाचे लक्ष्यात राहिले नाही. आता ते मला पुढे कधी प्रसंग जाण्याचा बनला तर माहित होईल. माझी प्रकृती ठीक नव्हती . शरीर अशक्त होते. पंधरा दिवसा पासून चा आजारी होतो. पाय उचलले जात नव्हते. पण जेम तेम मनात मातेचे नाव घेवून वर चढायला सुरुवात केली होती. पण मातेच्या कृपेने मला कोणतेही कष्ट जाणवले नाही आणि मी थेट वर मंदिरात जावून पोहचलो. सुदैवाने मातेची आरती व स्नान चालले होते. मला ते लाभले. मातेचे दुधाने स्नान केले जात होते. पण ते दुध खाली कुठे जात होते त्याचा काही मला पत्ता लागला नाही.नक्कीच चमत्कार म्हणावे लागेल. खाली उतरल्या नंतर दुकानावरून प्रसाद घेतला. आणि पादत्राणे घेवून लौज वर गेलोत. आप आपल्या बेग्स धरून गाडीत ठेवले आणि पुढे नाशिकला लग्न अटेंड करायचे असल्या कारणाने नाशिक मार्गावर निघालो.