इन्टरनेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इन्टरनेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

काय हि ओन लाईन शॉपिंग ?!!?!! नुसता त्रास...

आमच्या शाळेतील प्यून "राजेश " तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत असतो.काही अडचण आली. किवा समजले नाही तर लगेच फोन करतो मला. त्याच्या या इंटरनेट वरील संशोधन करण्याच्या वृत्ती मुळे बहुतेकदा शाळेतील शिक्षक गण त्याची प्रशंसा करताना दिसून येतात. पण म्हणतात ना जास्त शहाणपणा केलेले देखील नुकसान कारक ठरत असते. बस !! तसच काही तर झाले एका आठवड्या पूर्वी त्याच्या सोबत. मागे फेसबुक वर माझ्या द्वारा स्वस्त दरात भारतात लौंच होणारे teblet नावाच्या डिवाईस ची पोस्ट केली गेली होती. ती पोस्ट वाचल्या नंतर teblet सतत त्याच्या डोक्यात फिरत होते. त्याला देखील ते विकत घेण्याची इच्छा झाली. तो प्रत्यक्ष रित्या माझ्या कडे आला आणि कुठून ते खरेदी करता येणार त्याची विचार पूस करू लागला. मी म्हटले अजून एकाद महिना कमीत कमी तुला वाट पहावी लागेल. पण हा भाऊ काही शांत बसत नव्हता. गुगल मध्ये, याहू  मध्ये , रीडीफ मध्ये आणि बऱ्यांच सर्च इंजिन वर त्याने सर्च केले. शेवटी फेसबुक मधेच त्याला ती जाहिरात सापडली आणि नाप तोल डॉट कॉम नावाच्या वेब साईट वर त्याने ओन लाईन खरेदी चा ओर्डर दिला. लगेच दुसर्या दिवसी त्याने मला कमीत कमी ४००० रुपयाची सविनय मागणी केली. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला नकार द्यावा लागला. कारण माझी पूर्ण सेलरी महिना अखेरला मी बाबा ना देवून टाकतो. तरी मी त्याला दोन दिवसात कुठून हि पैसे आणून देण्याचे आश्वासन दिले.   कामा कामात मी ते पैसे देण्याचे विसरलो. दोन दिवस पसार झाले असतील तिसऱ्या दिवशी नाप तोल डॉट कॉम वरून एका कुरियर द्वारा त्याचा घरी ती वस्तू आली. स्वाभाविकच पणे त्याच्या कडे पैसे नव्हते तरी तेव्हा त्या वस्तू साठी त्याने शेजारया कडून रु. ४००० घेतले. एकूण त्याने ७२०० रुपये कुरियर डिलिवरी बोय ला दिली. उत्साहाने लवकर लवकर त्याने नाप तोल डॉट कोम चे रेपर फाडले. आत वेस्प्रो कंपनीचे बोक्ष होते. त्यात ते वेस्प्रो टेबलेट होते.  
वस्तू नवीनच होती म्हणून आणखी शेजारी असलेले पाहण्यासाठी गर्दी करून उभे राहिले. त्याने खोक्या मधून ते teblet  बाहेर काढले आणि ओन करून एक एक फंक्शन चेक करू लागला. सर्व काही ठीक होते पण मात्र त्याचा केमेरा चालत नव्हता. अर्थात त्यात बिघाड होता. लोक पाहत होते पण केमेरा चालत नव्हता म्हणून त्याला फारच वाईट वाटले. त्याला वाटले कि त्याला वेस्प्रो आणि नाप तोल डॉट कोम वाल्यांनी सात हजार रुपयाचा चुना लावला. तो उदास झाला. त्याने परत करण्यासाठी कुरियर बोय ला  फोन केला पण तो बर्याच लांब निघून गेला होता पण तरी त्याने एका तासात परत उधना मध्ये उडीपी हॉटेल जवळ मिळण्याचे काबुल केले. लगेच त्याने मला हि फोन लावला आणि सर्व हकीकत सांगितली व मला देखील त्या हॉटेल जवळ येण्यास सांगितले. हातात शाळेच्या प्रश्न पत्रिकेचे काम घेवून बसलो होतो ते बाजूला ठेवून मला भर दुपारी उन्हामध्ये निघावे लागले.  बाईक मध्ये पेट्रोल देखील नव्हते. जेम तेम लोटत पेट्रोल पंप वर गेलो व पेट्रोल टाकले डोक्यावर हेल्मेट घातले निघालो. पांच मिनिटात पोहचलो . पाहतो तर तो हॉटेल च्या बाहेर माझीच वाट पाहत होता. त्याच्या मुखावरील उदासीन पणा मला दिसत होता. तो विनंती करू लागला मला कि यार तू काही हि कर. पण मला हि वस्तू नको पाहिजे , कशे हि करून माझे पैसे मला परत करवून दे. मी होकार दिला म्हटले येवू दे कुरियर बोय ला गोष्ट करू. दोन तास झाले पण तो कुरियर वाला काही दिसत नव्हता. त्याला फोन वर फोन केले राजेश ने पण तरी हि तो दिसत नव्हता. फक्त समोरून एकच उत्तर मिळायचे कि आताच येतो ..अर्ध्या तासात. कदाचित त्याला माहित पडले असेल कि राजेश त्याला ते teblet  परत करू इच्छितो. इथे तो कंपनी च्या पोलिसी विरुद्ध जावू शकत नव्हता. कारण एकदा त्याने कस्टमर ला वस्तू दिली आणि पैसे घेतले म्हणजे झाले काम. मग त्या वस्तू च्या संदर्भात काही समस्या असतील तर ती जवाबदारी कंपनी आणि ग्राहकाची असते त्यात कुरियर वाल्याचा कुठलाही प्रकारच संबंध नसतो. तीन तास झाले ....राजेश चिडला त्याचे डोके तापले होते, त्याने त्या कुरियर वाल्याला मारण्याचा बेत केला. राजेश ला माहित होते कि तो कुरियर बोय त्यांचा सोसायटीच्या जवळ पास राहतो. लगेच त्याने आणखी दोन मित्रांना फोन करून बोलावले. मला हे सर्व योग्य वाटत नव्हते. म्हणून मी त्याला हे न करण्यास सांगितले . त्याची समजूत घातली कि त्या व्यक्ती चा त्यात काही दोष नाही. त्याने तर त्याची ड्युटी केली. जेम तेम त्याला मी शांत केले. हॉटेल मध्ये नेले आणि त्यांची स्पेशियल डीश "इडली सांभार" मागवले. कसा तरी तो शांत झाला होता. परत बाहेर येवून वाट पहु लागलो वाटले तो शांत असावा पण तरी अधून मधून तो कुर कुर करत होता. निव्वळ चार तास मी तिथे हॉटेल च्या बाहेर घालवले. त्याला सांगितले की ही वस्तु सूरत मधे वेस्प्रो च्या सर्विस सेंटर वर रिपेरिंग ला पाठव ते रिपैर करून देतील व म्हटले की तू चिंता करू नको ती वस्तू आपण दुसर्या कोणाला विकून पैसे काढून घेवू. आणि ग्राहक मीच तुला शोधून देतो. त्याने मान्य केले. गेरंती कार्ड काढले आणि नंबर डायल केले. पण आश्चर्य !!! एक ही सर्विस सेंटर अस्तिवात्त नव्हते . सर्व रोंग नम्बर्स जिथे सर्विस सेंटर होते ते बंद झालेले होते. अहमदाबाद , वापी , बरोडा आणि बर्याच ठिकाणी फोन लावला पण परिणाम शुन्य. काही पर्याय नव्हता .मी त्याला घरी जाण्याचा इशारा केला. काम झाले नहीं म्हणून मला वाईट वाटले उदास मनाने आम्ही आप आपल्या घरी निघालो. घरी पोहचून मला अर्धा तास झाला असेल परत त्याचा फोन आला. "सर, काम झाले, माझे पैसे परत मिळाले. मी त्यांच्या हेड ऑफिस वर गेलो होतो.तिथे काम करणारे माझ्या परिचयाचे निघाले त्यांनी सोल्व केला प्रोब्लेम., आपण भेटू उद्या शाळेत करू चर्चा. गुड नाईट " फोन कट झाला. एकूण मला हि आनंद झाला.
        
    येथे राजेश जास्तच आत्मविश्वासाने फक्त फेसबुक मध्ये एक पोस्ट वाचून ओन लाईन खरेदी करावयास गेला. पण सर्व उलटेच झाले. त्याने कोणाला विचारले  नाही, सल्ला घेतला नाही. शेवटी झाली फसवणूक. पण तरी तो भाग्यशाली म्हटला जाणार कि त्याला त्याचे पैसे परत मिळाले. ते पण कुरियर मध्ये परिचयाचे व्यक्ती असल्या कारणाने . राजेश सारखे नसीब प्रत्येकाचे नसते. प्रत्येकाला काही त्यांचे पैसे परत मिळत नाही. लोक फक्त आलेल्या वस्तू विषयी कंपनी ला फिर्याद करतात पण काही आउटपुट मिळत नाही.  घटने वरून खरोखर एक गोष्ट शिकायला हवे कि ओन लाईन खरेदी करताना माणसाने व्यवस्थित विचार पूस आणि सर्वे करूनच करायला हवे कि जेणे करून असे फसवणुकीचे केसेस बनणार नाही.     

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

इंटरनेट विश्वात माझे पहिले पाऊल...


     त्या वेळेस मी आई टी आई मध्ये शिक्षण पूर्ण करून नुकताच बाहेर पडलो होतो. तसे तर आई टी आई मध्ये इंटरनेट चा "इ" देखील आम्हास शिकवला नव्हता. शिवाय घरी computer नव्हते किवा मित्राकडे देखील कोणत्याही प्रकारची इंटरनेट साठी सोय नव्हती. फक्त कॉम्पुटर चे प्रमाणपत्र हातात घेवून जोब साठी बाहेर हिंडत होतो.   सुदैवाने दोन तीन ठिकाणी जोबच्या ऑफर्स आल्यात. अगदी नटून सजून, सुसज्ज होऊन प्रमाणपत्राची फाईल हातात घेवून मोठ्या उत्साहाने interview च्या ठिकाणी गेलो. अगोदर पासूनच वीसेक मुले मुली रांगेत बसलेले होते. स्वाभाविकच पणे मी पण रांगेत बसलो. आजू बाजूला बसलेले काही उमेदवारांचे मी प्रमाणपत्र पाहिले आणि त्यांचा पूर्ण  bio-data वाचला. मी थक्क झालो. त्यांचे प्रमाणपत्र पाहून. मनातच विचार करू लागलो. यांच्या समोर तर माझी लायकात तर शून्य आहे. नोकरी जर मिळवतील तर ती हेच लोक, माझा तर interview साठी क्रमांक पण येणार नाही. मी थोडा उदास मनाने उभा झालो आणि सरळ बाहेर वाट धरली. पण चालता चालता मन स्वतःला धिक्कारात होते कि "तू स्वतःला युद्ध मैदानात उतरण्या अगोदरच हरवले. तू स्वतः तुझा पराभव करत आहे. तर बाहेरचे का नाही करणार ?"  आणि परत हकारात्मक विचारासह interview च्या ठिकाणी आलो. मला  आत बोलावले गेले. पहिलाच प्रश्नाचा मारा करण्यात आला कि तुम्हाला इ मैल पाठवता येतो का ? मी आई टी आई मध्ये असतांना मेल express ने प्रवास करायचो त्यामुळे फक्त तो मेल एक्ष्प्रेस्स वाला " मेल" लक्ष्यात होता. मी प्रत्युत्तर म्हणून नकार मध्ये मान हलवली. प्रथम प्रश्नांचे उत्तर मी देवू शकला नाही त्यामुळे त्यांनी दुसरा प्रश्न विचारलाच नाही. फक्त दोन शब्द बोलले ते , "आम्ही सांगू लवकरच ", आणि मी बाहेर. मी समझलो कि ते परत लवकर काही सांगणार नव्हते.

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

तर चला परत वास्तविक जगाकडे.

      आज तारीख ५ ऑगस्ट २०११ वार शुक्रवार सकाळ ची वेळ. सहज फिरता फिरता माध्यमिक विभागात गेलो. स्टाफ रूम मधे शिरलो . पाहतो तर काय ? आमचा प्यून जो बिचारा दोन तीन दिवसा पासून चा फेसबुक वियोग मध्ये कोरड़ा झाला होता. तो समोरच्या कंप्यूटर वर यु एस बी डिवाइस लावून फेसबुक सर्फ़ करत होता. आणि त्याच्या मुखावर अमूल्य हास्य होते. तो फारच प्रसन्न मुद्रेत असल्याचे दिसत होता . माझ्याकडे तेव्हा त्याने जास्त लक्ष देण्याची तस्दी पण घेतली नाही. तरी मी मागे एक खुर्ची वर जावून बसलो व एक शिक्षक बरोबर चर्चा करू लागलो. जवळ पास अर्धा तास झाला पण तो फेसबुक वरील व्यक्ति न इकडे पाहतो न तिकडे . सारखे कंप्यूटर स्क्रीन वर लक्ष ...   टेबला वर कोफ़ी चा कप भरून ठेवलेला आहे पण त्याचे फेसबुक शिवाय कोठे ही लक्ष नाही एवढा तो त्याच्यात मग्न आहे. 
     अजून पाच मिनिटे पसार झाली असतील तेवढ्यात पावर गेली. तेव्हा जणू काही मोठे संकट त्या प्यून वर कोसळले असावे असा चेहरा त्याचा झाला . परत तीच उदासी , आणि गंभीर मनःस्थिती त्याची झाली. मला कळत नव्हते त्याची मानसिकता कशी असेल फेसबुक साठी ? तसे जर खोल वर विचार केला तर हा प्रश्न खरोखर गंभीर आहे. चिंतेचा विषय आहे. आजची तरुण पिढी या सोसीअल नेट्वर्किंग च्या नादात पडून वास्तविक जीवनात जगण्याचा आनंद गमावतात व त्या काल्पनिक जगाला वास्तविक जग समजून घेतात. अशीच गत या प्यून ची झाली आहे. दोन दिवसा पूर्वी त्याला मी फक्त दोन तीन दिवस वाट पाहण्यास सांगितले , पण तो काही थांबला नाही आणि नवीन इंटरनेट कनेक्शन घेवून फेसबुक वर जावून परत चिकटला. कुठे चालले आहे आज जग ? वास्तविक जीवनाचा आस्वाद सोडून काल्पनिक जगाकडे ? मनुष्याने तंत्र ज्ञानाचा पाया टाकला , संशोधन केले  ते प्रगती साठी. मनुष्याच्या विकास साठी, फायद्यासाठी ..पण तुम्हास वाटते खरोखर आपण फायदा करून घेत आहोत या गोष्टी पासून ? मित्रांनो , जागे व्हा , अजून वेळ गेलेली नाही. पहा जरा आजू बाजूला या फेसबुक च्या नांदात तुम्ही वास्तविक जीवनातून तुमचे मित्र , स्नेही वगेरे तर नाही गमावत आहात ना ?  

मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

फेसबुक ....फेसबुक .......फेसबुक .........??!!!!!

 जिकडे पाहिले तिकडे एकच गम्मत दिसते  ती गम्मत म्हणजे फेसबुक. हल्ली लोकांचे जीवन धोरण बदलले आहे. लहान मोठे सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. जिकडे तिकडे फेसबुक ची माया कामावर, जेवतांना , खेळतांना , छोटे से लहान काम का असे ना  "लगेच सामुरून उत्तर मिळते फेसबुक वर भेट आपण चर्चा करू "  काय चाललंय हे ? वाटते मनुष्याच नियंत्रण फेसबुक च्या हातात गेले आहे. कामावर एक प्यून आहे. बरेच दिवसा पासून त्याच्या मोबाईल वर फेसबुक उघडत नाही. बिचारा सारखा चिंता करतोय. खाण्या पिण्या कडे पण  लक्ष देत नाही मला तर आश्चर्याच वाटते . मगाशी माझ्या कडे येवून हळूच बोलला यार हे फेसबुक वाले आणि आपल्या सरकार मध्ये काही फरक नाही . मी विचारले का बरे ? तू असे को बोलतो ? तर त्याने मला फेसबुक उघडत नाही म्हणून ही हकीकत सांगितली. मला तर फारच हसू आले कि हा माणूस , त्याच्या फोन वर फेसबुक बंद आहे तर किती तळमळत आहे. मला त्याचा फेसबुक वियोग पहिला जात नव्हता. अर्थात हसू हि फार येत होते आणि नवल पण वाटत होते. पण मी करणार तरी काय या केस मध्ये ? त्याला अजून तीन चार दिवस वाट पाहण्याचे आश्वासन दिले आहे.  पाहुया काय होते ते या दोन चार दिवसात ...