शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

तर चला परत वास्तविक जगाकडे.

      आज तारीख ५ ऑगस्ट २०११ वार शुक्रवार सकाळ ची वेळ. सहज फिरता फिरता माध्यमिक विभागात गेलो. स्टाफ रूम मधे शिरलो . पाहतो तर काय ? आमचा प्यून जो बिचारा दोन तीन दिवसा पासून चा फेसबुक वियोग मध्ये कोरड़ा झाला होता. तो समोरच्या कंप्यूटर वर यु एस बी डिवाइस लावून फेसबुक सर्फ़ करत होता. आणि त्याच्या मुखावर अमूल्य हास्य होते. तो फारच प्रसन्न मुद्रेत असल्याचे दिसत होता . माझ्याकडे तेव्हा त्याने जास्त लक्ष देण्याची तस्दी पण घेतली नाही. तरी मी मागे एक खुर्ची वर जावून बसलो व एक शिक्षक बरोबर चर्चा करू लागलो. जवळ पास अर्धा तास झाला पण तो फेसबुक वरील व्यक्ति न इकडे पाहतो न तिकडे . सारखे कंप्यूटर स्क्रीन वर लक्ष ...   टेबला वर कोफ़ी चा कप भरून ठेवलेला आहे पण त्याचे फेसबुक शिवाय कोठे ही लक्ष नाही एवढा तो त्याच्यात मग्न आहे. 
     अजून पाच मिनिटे पसार झाली असतील तेवढ्यात पावर गेली. तेव्हा जणू काही मोठे संकट त्या प्यून वर कोसळले असावे असा चेहरा त्याचा झाला . परत तीच उदासी , आणि गंभीर मनःस्थिती त्याची झाली. मला कळत नव्हते त्याची मानसिकता कशी असेल फेसबुक साठी ? तसे जर खोल वर विचार केला तर हा प्रश्न खरोखर गंभीर आहे. चिंतेचा विषय आहे. आजची तरुण पिढी या सोसीअल नेट्वर्किंग च्या नादात पडून वास्तविक जीवनात जगण्याचा आनंद गमावतात व त्या काल्पनिक जगाला वास्तविक जग समजून घेतात. अशीच गत या प्यून ची झाली आहे. दोन दिवसा पूर्वी त्याला मी फक्त दोन तीन दिवस वाट पाहण्यास सांगितले , पण तो काही थांबला नाही आणि नवीन इंटरनेट कनेक्शन घेवून फेसबुक वर जावून परत चिकटला. कुठे चालले आहे आज जग ? वास्तविक जीवनाचा आस्वाद सोडून काल्पनिक जगाकडे ? मनुष्याने तंत्र ज्ञानाचा पाया टाकला , संशोधन केले  ते प्रगती साठी. मनुष्याच्या विकास साठी, फायद्यासाठी ..पण तुम्हास वाटते खरोखर आपण फायदा करून घेत आहोत या गोष्टी पासून ? मित्रांनो , जागे व्हा , अजून वेळ गेलेली नाही. पहा जरा आजू बाजूला या फेसबुक च्या नांदात तुम्ही वास्तविक जीवनातून तुमचे मित्र , स्नेही वगेरे तर नाही गमावत आहात ना ?  

२ टिप्पण्या:

  1. खरच तु खूप विचार करतोस. हे बरोबरच आहे कि एकदा फेस बूक चे वेड लागले कि त्यातून सूटका नाही. तूझा लेख मला खूप आवडला. तू असेच लेख लीहीत जा मला आवडतातखरच तु खूप विचार करतोस. हे बरोबरच आहे कि एकदा फेस बूक चे वेड लागले कि त्यातून सूटका नाही. तूझा लेख मला खूप आवडला. तू असेच लेख लीहीत जा मला आवडतात

    उत्तर द्याहटवा
  2. सीमा वाचून प्रोत्साहन दिले त्या बद्दल तुझा फार फार आभार. पुढे पाहत जा अजून काय येते या पथिकच्या मार्गात....

    उत्तर द्याहटवा