मंगळवार, १४ जून, २०११

मुंबई नको .........

१ फेब्रुवारी २००३ , स्थळ: उधना रेलवे स्टेशन आम्ही तीन बंधू  मुंबई येथे असलेल्या नातेवायाकाच्या लग्नाला जाण्यास निघालो. सकाळी ५.३० वाजले होते. थंडी चे प्रमाण जास्त असल्याने   स्टेशन वर  कमी प्रवाश्यांची गर्दी दिसत होती. गाडीचा वेळ सुमारे ७.४० वाजे चा होता त्यामुले माला करमत नव्हते . प्लेटफोर्म वर फिरता फिरता न्यूज़ स्टाल वर गेलो वेळ पसार करण्यासाठी वर्तमान पत्र विकत घेतले. पहिलेच पेज पाहताच मला आश्चर्य चा धक्का लागला कारण बातमी होती "कल्पना चावला चे स्पस शत्टल मधे उतरन करताना निधन " तेव्हा माजी मात्र ठंडी उडाली. मी ती बातमी वाचू लागलो. स्वाभाविकपणे प्रथम पेज वरच तो समाचार असल्या कारणाने इतर लोक जवळ जमले आणि त्या बातमी वर दृष्टी फेकू लागले . आपापसात चर्चा सुरु झाल्यात. तोच गाडी आली आणि आम्ही निघालो. अत्यंत निवांतपणे बसलो. आल्हाददायक वातावरण असल्याने डोळे बंद झाले. कधी दिड ते दोन तास पसार झाले आणि आमचे स्टेशन आले ते समजलेच नाही. बोरीवली त्या स्टेशन चे नाव. सारखी लोकांची गर्दी प्लेटफोर्म वर दिसत होती एवढी गर्दी मी आयुष्यात रेलवे स्टेशन वर या अगोदर कधी ही पाहिलेली नव्हती. म्हणून मी तोंडातच बोट घातले. आता उतरायचे कसे ? तो प्रश्न पडला. तेव्हा समोरच्या एक व्यक्ति ने सांगितले की तुम्हास  उतरन्यासाठी फ़क्त दरवाज्या समोर जाउन उभे रहवयाचे आहे  प्रवाश्यांचा प्रवाह तुम्हास चमत्कारिक रित्या प्लेटफ़ॉर्म वर सोडेल. आम्ही तेच केले आणि मग काय ? गाड़ी थांबते न थांबते तोच चढ़ उतर करणारे प्रवाशी मोठी वर्दल उभी करण्यासाठी निमित्तच बनले. आम्ही दोन भाऊ उतरले पण एक मधेच रहूँ गेले. आम्ही चिंतित झालो. पण त्यानी ही मधेच समय सुचाकता वापरून मागच्या दरवाजा कड़े वाट धरली. आणि गाडी सुरु होण्या अगोदरच रेलवे रूलावर उतरले. आम्हास दे दिसले नाही म्हणून वाटले की दादा गेले पुढील स्टेशन वर. पण जसी गाडी पसार झाली ते समोर दिसले आम्हास आनंद झाला.     
     सर्व एकत्र जमलो. मी मात्र गर्दी पाहून तोंडातच बोटे घातली होती. प्रत्येक व्यक्ती घाई मध्ये असताना दिसत होती. जो तो ज्याच्या त्याच्या कामाच्या तंद्रीत होता. आणि ते पण अगदी घायीत. चालताना एक स्त्रीला माझ्याकडून धक्का लागला. अचानक ती स्त्री व मी समोर समोर झाले होते.. दोघा पैकी कोणालाही वाट काढता येत नव्हती. ती संतापली आणि वाटेल ते वेडे वाकडे मला बोलू लागली. मला सहन झाले नाही म्हणून मी पण वाटेल त्या शब्दात प्रत्युत्तर दिले. तेव्हा मात्र माझ्या मनात मुंबईकरा विषयी एक प्रकाची घृणा व कुठल्याही प्रकारची शिस्त नसलेली व्यक्ती म्हणून छाप उभी झाली. 
     पुढे मला मात्र माझी मुंबईकरा विषयी असलेली खोटी गैरसमज मध्ये  सुधारणा करावी लागली. आम्ही तिघे हि  बंधू एका मागून एक लवकर लवकर रस्ता काढत निघालो होतो. तोच मध्ये आमच्या मोठ्या बंधूला मीर्घीचा विकार पडला. ते मागे रस्त्यातच कुठे तरी पडले. आम्ही बरेच पुढे निघून आलो होतो. सारखी गर्दी व त्या गर्दीची कच कच त्यामुळे मागे पुढे पाहण्या ऐवजी आम्ही सरळ वाटच धरली होती, तेव्हा चालतानाच दादा विषयी मोठ्या बंधूनी विचारले कि ते कुठे आहेत.? मी मागे वळून पहिले पण गर्दी शिवाय काही दिसत नव्हते. आम्ही घाबरलो परत मागे वाट धरली. धूम धावत सुटलो plateform वर. दादा एका जिन्या जवळ पडले होते. काही व्यक्ती पादत्राणे तर काही कांदा नाकाशी लावत होते. आम्ही जवळ पोहचलो आणि त्यांना शुद्धीवर आण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा समोर उभी असलेल्या ट्रेन मध्ये काही medical कोलेज च्या मुली  होत्या त्यांनी हि हे दृश्य पहिले व ते धावत मदती साठी आल्यात. आणि आपण डॉक्टर असल्याचा परिचय देवून सर्वाना दूर केले व दादा ला हात चोळून शुद्धीवर आणले. मधेच एक वृद्ध स्त्री ने पाणी आणून दिले.  व आम्हास दादा ला एखाद्या ठिकाणी शांततेने बसावयास सांगितले. तोच त्या डॉक्टर ची ट्रेन निघाली ती धावत त्या ट्रेन वर चढली..पण त्या अगोदर दादा ची काळजी घेण्यास सांगितले ... या ठिकाणी मी , जेव्हा त्या स्त्री ने वेडे वाकडे बोलली होतीस तेव्हा पासून मला सतत वाटत होते कि या ठिकाणी मानवता तर नसेलच पण ह्या घटनेत जी मुंबई च्या लोकांनी आपुलकी दाखवली , जो सहकार दिला , मदद केली. ती खरोखर नगण्य होती. तेव्हा मात्र माझ्या मनात मुंबई करा विषयी एक मित्रत्वाची , बंधुत्वाची व सन्मानाची भावना निर्माण झाली, बरोबर हे कळले कि मी चुकीचा होतो.
     

४ टिप्पण्या:

  1. Tuza lekh khup chan vatla. Karan ne tar mumbai la kadhe gele nahe pan mazya he manat asech hote k tithe khup garde aste ane tithle lok khupch vayvarik ahet tithe kama shivay kone konashe bolat suddha nahe pan maze he vichar tuzya hya lekha mule badl le. thanks. Excelent vatlaTuza lekh khup chan vatla. Karan ne tar mumbai la kadhe gele nahe pan mazya he manat asech hote k tithe khup garde aste ane tithle lok khupch vayvarik ahet tithe kama shivay kone konashe bolat suddha nahe pan maze he vichar tuzya hya lekha mule badl le. thanks. Excelent vatla

    उत्तर द्याहटवा
  2. तुझा फार फार आभार सीमा. लेख वाचून येथे कमेन्ट पोस्ट केली त्या बद्दल ....

    आणि त्या वरील दोन अनामिकांचा पण फार फार आभार .....

    उत्तर द्याहटवा