मंगळवार, २९ मे, २०१२

डोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............

दोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा माझा प्रथमच प्रसंग होता. म्हणून एक वेगळाच प्रकारचा उत्साह होता. जाण्या अगोदर तेथे गडावर कोणती सुविधा आहे व कोठे थांबता येईल ती जानकारी इंटरनेट वर शोधण्याचा प्रयत्न केला. सप्तशृंगी मातेची वेब साईट सापडली पण पाहिजे तशी माहिती उपलब्ध नव्हती.रात्री दोन वाजेला सुरत हून प्रवास प्रारंभ केला.आई वडील आणि मी तसेच सोबत काका आणि त्यांची चार मुले होती.सकाळ च्या सहा वाजे पर्यंत प्रवास सुरळीत पार पडला . पण जसे आम्ही गुजरात च्या डांग जिल्ह्यात पोहचलो. चार हि बहिणी नी उलटी (ओमिट ) करायला सुरवात केली. कारण रस्ता सर्पाकार आणि वळणदार होता. ते त्यांनी पाहिले कि त्रास सुरु होत असे. पण नाइलाज होता. कोणत्याही प्रकारची औषधे सोबत घेतली नव्हती. त्यामुळे तो त्रास सहन करूनच पुढे जावे लागले. गाडीच्या दोन्ही बाजूचे दरवाजे बाहेरून रंगले गेले होते. दरवाजा उघडण्याचे hendal देखील सुटले नव्हते. सापुतारा या ठिकाणी चहा घेण्याचे ठरवले. दिवस उगवण्याच्या तयारीत होता. तेथील ते थंड आणि अल्हाद दायक वातावरण शरीरात एक वेगळ्याच प्रकारचे रोमांच उभे करत होते. सुरत व गुजरातच्या इतर भागातून आलेले प्रवाशी त्या वातावरणाचा आनंद घेत होते. पर्वतामागून सूर्याचे अगदी नयनरम्य दुर्श्य दिसत होते. फोन मध्ये बिघाड झाल्या कारणाने ते दृष्य मी घेवून शकलो नाही.ढगामध्ये कधी लाल तर कधी तांबड्या रंगाचे किरण पसरत होते. तर कधी अचानक सूर्य मावडला असावा तसा भास होत होता. सूर्य जणू काही लपा छपी खेळत असावा असे वाटत होते.पुढे आम्ही सापुतारा हून कळवण या भागातून नांदोरी ला जाण्याचा मार्गावर निघालो.पर्वतावर ढग जणू काही आम्हास पाहत होते.
     पहाटेची वेळ होती. सकाळी कळवण या मार्गाने जात असतांना मधेच रोडवर कोंबडी , पिले अमुक वेळेस कुत्रे मध्ये येत होते. त्यांना वाचवत वाचवत चालकाने व्यवस्थित गाडी काढली. चालकाला भीती वाटत होती जर  चाका  खाली एखादी कोंबडी किवा पिलू आले म्हणजे गेली एखादी गांधीजींची नोट त्यामुळे त्याने अगदी काळजीपूर्वक त्या मार्गावर गाडी काढली. कळवण भाग संपला. पुढे त्या गडाच्या मार्गावर नांदोरी चेक पोस्ट लागले तेथे आम्ही सगळ्यांनी प्रवेशद्वार कडे दोन्ही हात जोडून नमन केले. आणि  आम्ही लागलो त्या पवित्र नांदोरी च्या वाटेवर. गोल गोल फिरून त्या डोंगरावर वाट काढायची होती. शिवाय रस्ता देखील थोडा रुंद आहे.वर जात असताना ढग जणूकाही डोंगराला आलिंगन घालत होते.  जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही सुखरूप पणे वर पोहचलो. गाडी पार्क करून तेथील धर्मशाळेत आंघोळी साठी व्यवस्था आहे कि नाही ते शोधू लागलोत. आश्चर्य !!! किती तरी धर्मशाळा आहेत. पण आंघोळी साठी सोय नव्हती. सर्व कळे पाण्याची बोंब. आजू बाजूला लौज वर आंघोळी साठी विचारले तर एका व्यक्ती चे ३० ते ४० रुपये आणि आम्ही जवळ पास आठ जन होतो. म्हणून आम्हास ते खर्चिक वाटले. पण न इलाज होता. शेवटी एका लौज वर सर्वांनी दोन रूम भाड्याने घेवून स्नान केले. मला तर वाटले कि स्नान केल्या शिवाय दर्शन केले तरी चालेल फक्त मन पाप पासून आणि वाईट विचार पासून एकदाचे धुतले पाहिजे. पण काकांनी स्नान करून जाण्याचा आग्रह केला.सर्व तयार झाले आणि निघाले मंदिराच्या दिशेने. 
आई ला पूजा अभिषेक साठी जे काही लागते ते विकत घेतले. पादत्राणे एका दुकानात ठेवले आणि निघालो सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. सर्व प्रथम काकांनी व भाऊ बहिणींनी ज्योत पहिल्या पायथ्याशी लावली. त्याच्या मागो माग मी देखील कपूर च्या वडीची ज्योत लावली. अश्या बर्याच पायर्यावर ज्योती लावल्यात. मधेच एका स्थळावर सोबत घेतलेले तेल, जे एका प्लास्टिक च्या पिशवीत होते ते वाहिले. ते तेल का वाहिले ते आज पर्यंत मला समजले नाही. मला वाटले एखादी पौराणिक कथा असेल त्या मागे त्याची नक्की खाली उतरल्यावर माहिती घेवू. पण दर्शन करून परत फिरल्यावर मला काही त्या बाबतीत विचारयाचे लक्ष्यात राहिले नाही. आता ते मला पुढे कधी प्रसंग जाण्याचा बनला तर माहित होईल. माझी प्रकृती ठीक नव्हती . शरीर अशक्त होते. पंधरा दिवसा पासून चा आजारी होतो. पाय उचलले जात नव्हते. पण जेम तेम मनात मातेचे नाव घेवून वर चढायला सुरुवात केली होती. पण मातेच्या कृपेने मला कोणतेही कष्ट जाणवले नाही आणि मी थेट वर मंदिरात जावून पोहचलो. सुदैवाने मातेची आरती व स्नान चालले होते. मला ते लाभले. मातेचे दुधाने स्नान केले जात होते. पण ते दुध खाली कुठे जात होते त्याचा काही मला पत्ता लागला नाही.नक्कीच चमत्कार म्हणावे लागेल. खाली उतरल्या नंतर दुकानावरून प्रसाद घेतला. आणि पादत्राणे घेवून लौज वर गेलोत. आप आपल्या बेग्स धरून गाडीत ठेवले आणि पुढे नाशिकला लग्न अटेंड करायचे असल्या कारणाने नाशिक मार्गावर निघालो.

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2

दोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे "सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे" या विषयावर चर्चा चालली होती. मला तर फारच विचित्र अनुभव झाले. अश्या ठिकाणी मुलगी पहावयास गेलो जिथे साधी बसण्यासाठी पण जागा व्यवस्थित नसेल. घराच्या पहिल्या द्वार पासून तर शेवटच्या द्वार पर्यंत नुसती धूळ उडतांना दिसते. कावळे एका खिडकीतून दुसर्या खिडकीद्वारे उडताना दिसायचे .... बसावेसे पण वाटत नाही. मुलगी जरी नुसती बारावी पास होती. पण मुलीचे पालक आणि नाते वाईक, जणू त्या मुलीने मोठाच पराक्रम केला असेल अशा पद्धतीने तिचा परिचय करून देतात. आणि त्या परिचय मध्ये पण मुलाला त्याचे हलक्या प्रकारचे स्टेटस आहे तसे दर्शवितात. आणि सरकारी नोकरी आहे का ? त्याच ओळीवर जास्त भर देतात.  अशा वेळेस मन तर फार वैतागले होते, मनात वाटायचे कुठे जंगला मध्ये मुलगी पहावयास येवून गेलो. या लोकांना बारावी च्या पुढे आणि सरकारी नोकरी शिवाय पण काही तरी असते ते माहीत आहे का ?. स्वतः वर संताप पण येत होता कि   येण्या अगोदर कमीत कमी चौकशी करायला हवी होती. माझा एक मित्र , विनोद जो कोल्हापूर ला आहे , बिचारा असाच कंटाडून गेला होता या सरकारी नोकरीच्या भूता मुळे , सर्व काही असून हि त्याला पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. नेहमी एकच प्रश्न समोर येत होता "सरकारी नोकरी आहे का?" जवळ जवळ एकाद वर्ष तो मुलीच्या शोधात होता. पण काही नाही. मग शेवटी त्याने ठरवले कि या सरकारी नोकरीच्या भुताला कसे हाताळायचे. तो सुरत मध्ये म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये कंत्राटी धोरणाने जल विभागात नोकरी वर लागला. सर्व काही त्याने प्लानिग नुसार केले. चार ते पाच महिन्यात त्याने खालचे वरचे जे कोणतेही अधिकारी असतात त्यांना खिस्यात केले. अर्थात पैस्याची लाच देवून त्यांना तयार केले. आणि परत एक वर्ष नंतर त्याच ठिकाणी गेला जिथे त्याला मुलगी आवडली होती. मोठ्या तोर्याने त्याने त्याचा काका आणि मामा बरोबर जावून मुलीच्या पालकाशी लग्नाची गोष्ट केली. या वेळेस मात्र सरकारी नोकरी माझ्या मित्राला असल्या कारणाने त्यांनी नकार दिला नाही(जी खरोखर नव्हती). त्यांनी सुरत म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये चौकशी केली. आणि त्यांना खरे वाटले. शेवटी  सासर्याने सर्व काही लग्नाचा खर्च केला कारण त्याला सरकारी नोकरीवाला नवरा मुलगी साठी पाहिजे होता आणि तो मिळाला देखील.दीड वर्ष तो सुरत मध्ये राहिला, पण त्याला भीती देखील वाटत होती कि जर मुलीच्या बापाला माहित झाले तो फ्रोड चा केस दाखल करेल. त्यामुळे त्याने लग्न झाले असून हि कोर्ट मेरीज केले. आणि लग्नाचे प्रमाणपत्र मिळवून घेतले.तेथे  सही करण्यासाठी माझे मित्र हजर राहिले होते. पण तसे काही झाले नाही जशी त्याला भीती होती. मुलगी सुखात होती. कोणतेही टेन्शन नव्हते. आणि बराबर दीड वर्ष नंतर तो कोल्हापूर परत स्वतः च्या घरी स्थायी झाला. सासर्यास माहित झाले. पण करणार काय  ?  त्याला मुलगी आनंदात दिसली. सर्व काही ठीक ठाक दिसले. शेवटी जी परिस्थिती होती ती त्याने मान्य केली. आज हि त्यांचा संसार सुखात चाललेला आहे. त्यांची लग्नाची एनिवर्सरी असली की त्या दिवशी ते आठवण करून मला फोन जरूर करतात. थोडक्यात, असे लोक पण सरकारी नोकरी चा भूत पळविण्यासाठी जवाबदार म्हणता येतील. हे गोविंदाच्या "कुली नंबर वन" नावाच्या चित्रपटात होते तसे झाले. पण प्रत्येकाचे तसे नशीब नसते. नाव त्याचे विनोद होते, पण त्याने गंभीर विनोद करून सुखद अंत आणला.  कित्येक मुलीचे पालक फसून हि जातात. डोळ्यावर सरकारी नोकरीचा लालचचा  काळा पट्टा असल्या कारणाने.  

रविवार, १५ एप्रिल, २०१२

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे

स्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने नजीक बाहेर रोडवर असलेल्या चहा च्या स्टोल वर नेतात. आणि मुला सोबत असलेल्या नाते वाईकास मुलाचे नाव गाव , शिक्षण , पगार व राहण्या संबधित प्रश्न विचारतात .मुलीचा बाप सरकारी नोकरी च्या अपेक्षेत असतो. जेव्हा त्याला कळते कि मुलगा प्राइवेट जोब करतो तेव्हा विचारताना मुलगा एखादा गुन्हेगार असेल तसे हाव भाव चेहरावर दिसू लागतात.मुलाला सर्व काही विचारले जाते. सर्व काही अगदी व्यवस्थित आहे. मुलाला कोणते हि व्यसन नाही. स्वतः चे घर आहे ,रेगुलर जोब आहे, कोणाचाही एक पैशाचा कर्जबाजारी नाही. राहणीमान अगदी व्यवस्तीत आहे. त्या मुलीच्या बापाचे नसेल असे त्याचे घर आणि राहणीमान आहे. मधेच एक बहाणा करून ती व्यक्ती घरी फोन करून , दूर जावून काही तरी विचारते आणि मुलाला प्रत्युतर देते कि मुलगी तर आज पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यास गेली आहे. ती तुम्हास संध्याकाळी भेटेल. ते मुद्दाम तसे बोलतात कारण त्यांना माहित आहे समोर ची व्यक्ती फार लांबून आली आहे ते काही थांबणार नाही. अर्थात विषय तिथेच संपतो. असाच प्रकार माझा मित्र आणि माझ्या सोबत घडून गेला. मी चकितच झालो होतो कि समाजात एवढी निर्लज्ज लोक असतील कि ते कमीत कमी घरी चहा साठी बोलावून चर्चा करू शकत नाही. आणि रोडावर बसून एखाद्या स्टोल वर त्या संदर्भात चर्चा करतील. लोकांची मानसिकता आज पण बदलेली नाही. नव्या नियमानुसार सरकारी नोकरी वर कुठलाही पदावर किवा क्लास वन ऑफिसर जरी असेल त्याला देखील पूर्वी जे लाभ मिळत होते ते मिळत नाहीत. हो सुट्याच्या लाभ जरूर मिळतो. आणि दुसरा महत्वाचा फायदा असा कि सरकारी नोकरी वर आले म्हणजे बेफिकर होवून काम करणे. राजा पण आपला आणि प्रजा पण आपली. मग चालू द्यायचा कारभार आपल्या मर्जी नुसार. मला वाटते असे कोणाचे हि अपमान व्हायला नको त्या साठी. अश्या पालकांनी घरा बाहेर, कामाच्या ठिकाणी किवा जिथे ते लोकाना भेटतात  तिथे एक  पाटी लावली पाहिजे आणि त्यावर स्पष्ट  मोठ्या अक्षरात लिहिले पाहिजे "मुली साठी सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे". जेने करून त्यांना खोटे बोलावे लागणार नाही कि "मुलगी कलेक्टर ची परीक्षा देण्यास गेली आहे किवा पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यासाठी गेली आहे वगैरे" शिवाय या मुळे बराच वेळ वाचेल दोन्ही पक्षाचा. आणि अपमानास्पद तर मुळीच वाटणार नाही. खरे आहे ना ? मला वाटते समाजात दोन वर्ग पडतात . एक वर्ग असा असतो जो मुलीची वय निघून जाते, मुलगी चांगलीच वयस्कर होते पण सरकारी नोकरी वाला नवरा मुलीचा बापाला मिळत नाही तो पर्यंत तो तिचे लग्न करत नाही. येथे सहन करणे फक्त मुलीच्या नशिबात येते. अशा वेळेस टोमणे मारणारे बिचार्या त्या मुलीला प्रत्यक्ष किवा अप्रत्येक्ष रिते वयाच्या बाबतीत चर्चा करून टोमणे मारतात. तिची मानसिक अवस्था बिघडते. कोणतीही मुलगी समोर जावून आपल्या आई वडिलांना कधी हि सांगू शकत नाही कि माझे आता लग्न करा. ती फक्त सहन करू शकते. समाजात असे बरेच प्रकरण पहावयास मिळतात. मग शेवटी ..."बाबा पण गेले  नि दसम्या पण गेल्या". सरकारी नोकरी च्या भूता मुळे आलेली चांगली स्थळे पण ते गमावतात. आणि आबड धोबड ठिकाणी मुलीला देवून टाकतात. याचा परिणाम फक्त बिचारी ती मुलगी भोगते. हा झाला एक वर्ग आणि दुसरा वर्ग जे मोजके आणि व्यावहारिक असतील. ते म्हणतात ना "लोहा गरम है मार दो हातोडा"  तसे त्यांचे असते योग्य स्थळ आणि माणसे दिसली म्हणजे मुलीची पसंत नापसंत विचारतील आणि मग लग्न साठी पुढे येतील. 
चला शिर्डी जाण्याचा प्लान आहे तिकीट बुक करण्यासाठी लवकर जावे लागेल.बाकी चर्चा पुढच्या भागात... 

शुक्रवार, १६ मार्च, २०१२

परीक्षेत कोपी कितपत योग्यं ?

तीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्या ब्लोक मध्ये सुपर विजन ची जवाबदारी देण्यात आली होती त्या ब्लोक मध्ये तर अगदी आनंदाचे वातावरण होते. कारण आता पर्यंत सर्वच पेपर्स सोपे होते. पण जशी मुलांच्या हातात प्रश्नपत्रिका गेली तसे त्यांच्या चेहराचे हाव भाव बदलले. प्रत्येक जन चिंतातूर दिसत होते. कारण पेपर पाहिजे तेवढा सोपा नव्हता. मुले कॉपी करण्याचे प्रयत्न करू लागले. मी मात्र कोणत्या हि प्रकारे त्यांना कोपी करू देत नव्हते. काहींचे चेहरे तर रडके झाले होते. वाटत होते आताच रडून देतील कि काय ? पण ते म्हणतात ना चोरी करणार एन केन प्रकारे करूनच घेतो. तसे इथे घडले. तीन तास दरम्यान मला देखील काही पेपर वर्क करायचे होते. ते करताना जेव्हा हि टेबल वर जावून बसलो किवा उत्तर पत्रिकेत सही करण्यासाठी एखाद्या च्या बेच कडे गेलो कि पाठी मागे मुकाट्याने कोपी करायला सुरुवात होते असे. दोनदा एका मुलीला व मुलाला कोपी न करण्यासाठी टोचून बोललो. कार्यवाही करण्याची धमकी देखील दिली. फक्त दहा पंधरा मिनिटे शांत बसले असतील परत कोपी करण्याची त्यांची तळमळ सुरु होत असे. इथे एक नाही दोन नाही पण जवळ जवळ अर्धा क्लास,  वीस ते पंचवीस मुले उदास चेहरा ठेवून एक मेका कडे  मदतीच्या भावनेने पाहत होते. काही तर फारच दुखी दिसत होते.मनात आले आपण जरा जास्त कठोर झालो आहोत तसे करायला नको. पण कर्तव्य ते कर्तव्य असते ना. मी शेवट पर्यंत कोपी करू दिली नाही. ज्याला त्याला अधून मधून . माझी नझर चुकवून करता आली असेल तर केली असेल पण नझर समक्ष बिलकुल नाही. पेपर संपल्या वर एक मन म्हणत होते कि कमीत कमी पास होण्या इतकी कोपी करू द्यायला पाहिजे होती. दुसरे मन म्हणत होते कि मी योग्यच केले. बातमी पत्रात जेव्हा हि मुले मुलींचे आत्महत्येचे प्रकरण वाचले कि मला कधी कधी स्वतः वर संताप पण येतो कि माझ्या सारखेच शिक्षक या गोष्टीला जवाबदार असतील. तेव्हा अशी नोकरी करावीशी वाटत नाही.आणि एक विचार असा हि येतो कि यांना जर नुसत्या कोपी करवूनज जर पास व्हायचे असेल तर मग त्या शाळा कश्या साठी ? आणि ते तेजस्वी मुले जे उच्च क्रमांकासाठी  कोणत्या हि ट्युशन शिवाय रात्र दिवस मेहनत करतात त्यांच्या शी एव्हढा मोठा अन्याय ???? ? आई वडिलांच्या कष्टाचे पैसे मुले व मुलींनी का बरे उडवायचे ? फक्त परीक्षेलाच या कोपी करा आणि पास व्हा ..बरोबर ना ? फार विचित्र वाटते खोल वर विचार केला कि. आज बातमी पत्रात हरियाना राज्यात मुले कशी पराक्रम करतात बोर्डाच्या परीक्षेत चोरी करण्या साठी त्या संदर्भात बातमी वाचली आणि छायाचित्र पाहिलेत मला अस्श्चार्याचा धक्का लागला. ते छायाचित्र मी इथे पोस्ट करत आहे पाहाल..................
    





गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

फेसबुक चा पंचनामा

रात्रीचे दहा वाजलेले आहेत, समोरच सत्संग चा कार्यक्रम असल्या मुळे लौड स्पीकर चा मोठ्याने घोंघाट  होत आहे. आज बारा ते एक वाजे पर्यंत काही झोप लागणार नाही. अगदी खिडकीच्या समोरच्या दिशेला तो लाउड स्पीकर लावलेला आहे. इ मेल चेक केले, फेसबुक वर थोडा हिंडलो. पण कंटाळा आला. काही नवीन नाही. तीच लबाड गोष्ट दिसते. एखादी मुलगी एखादे फोटो अपलोड करते आणि मध माश्या प्रमाणे मुळे कमेंट करण्यासाठी तुटून पडतात. त्या फोटो मध्ये जरी काही आकर्षक नसेल तरी बेफाम पणे "wow", "nice", "chhaan" वगैरे सारख्या शब्दाचा प्रेम पूर्वक वर्षाव होतो.घरात असलेले फ्रीज आणि फेसबुक यांच्यामध्ये एक साम्म्यता आहे. ती म्हणजे आपण नेहमी अधून मधून फेसबुक उघडून बघत असतो. कोणी कमेंट केली तर नाही न ? कोणी मेसेज तर नाही केला ना ? पण तिथे नवीन काही नसते. तसेच फ्रीज च्या संदर्भात आहे आपण परत परत उत्सुकतेने दरवाजा उघडून पाहतो पण नवीन काही नसते. होय , पण एक अपवाद म्हणावा लागेल. तो अपवाद म्हणजे लबाडी. अशी विधाने हामखास पणे फेसबुक वर पहावयास  मिळतात. पण एक गोष्ट तर स्वीकारावीच लागेल कि जिथे मुली असतील तेथे गर्दी असेलच. दोन आठवड्या पूर्वी माझ्या एका मैत्रिणीला फेसबुक वर एका दिवसात २०३ फ्रेंड्स request मिळाल्यात. फेसबुक च काय ..ओर्कुट मध्ये देखील तसेच. असे वाटते ना कि मुली साठी अर्धे जग रिकाम टेकडे आहे. एक  वेळ होता शालेय मुला मुलींच्या हातात जास्तकरून अभ्यास विषयक साहित्य असायचे . आता फक्त मोबाईल फोन दिसतो.आणि त्यात हि ते फेसबुक वर चिकटलेले दिसतात. अहो  चालू वर्गात देखील !!!...
आज माझ्या BSNL च्या conection  मधेय प्रोब्लेम असल्याने फोन कॉम्पुटर शी जोडून इंटरनेट सर्फिंग करत होतो. वाटले आज छान स एखादा टोपिक लिहिणार पण............ ...हत्ती च्या !!!??!  पावर कट झाला आहे. बेटरी आवाज करत आहे.कॉम्पुटर बंद करावे लागणार. पण समोर जनरेटर वर परत घोघाट सुरु झाला आहे त्यामुळे   कानात कापूस खुपसावा लागणार .. चलां, नंतर कधी आपण चर्चा करू. भेटू मग...शुभ रात्री.

     
  

रविवार, २९ जानेवारी, २०१२

देर से आए पर दुरुस्त आए

आज शाळेत ओपन हाउस होते. अर्थात मुल व मुलींचे पालक त्यांनी उत्तर वहीत परीक्षेत काय लिहिले ते पाहण्यासाठी येतात. सकाळी आठ ते दहा पर्यंत कार्यक्रम चालला.आणि साडे दहा पर्यंत मी फ्री झालो. वाटले आज थोडा फार आराम करणार आणि काही वाचन करायचे होते ते करणार. एकाद तासांनी घरी पोहचलो. हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. तोच समोरून डॉक्टरचा फोन आला. त्यांनी मला डोळे तपासनीस बोलावले होते. जेवण करता करता रेल्वेचा टाईम टेबल पाहू लागलो. पाहतो तर फक्त २० मिनिटे बाकी होती ट्रेन सुटायला. मग मला जेवण सोडून द्यावे लागले. घाईतच कपडे बदलले , बूट घातले काळा चष्मा लावला आणि निघालो. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी रिक्षेत बसलो. रीक्षा चालकाला त्वरेने नेण्यासाठी मी विनंती केली. पण तो जशी बैल गाडी चालते तशी रिक्षा चालवत होता. मी त्याला दोन वेळा विनंती केली. पण तेच. शेवटी कंटाळून ती रिक्षा सोडली आणि दुसरी रिक्षेत बसलो.त्याने वेगाने चालवली रिक्षा, पण ट्राफिक मुळे उशीर झाला. स्टेशन च्या गेट पर्यंत पोहचलो तेवढ्यात तर गाडी प्लेटफोर्म वर आली. सूदैवाने तिकीट विंडो वर गर्दी नव्हती. पटकन तिकीट काढले आणि दोन नंबरच्या प्लेटफोर्म कडे धाव घेतली. धावत असतांना मी विसरलो कि मी रेल्वे ट्रेक क्रॉस करून पडत होतो. आणि त्याच ट्रेक वर मुंबई (विरार) - भरूच शटल वेगाने येत होती.ते दृश्य पाहून दोन्ही प्लेटफोर्म वरचे लोक जोराने ओरडू लागले. तेव्हा माझे समोर येणारी ट्रेन वर लक्ष गेले. आणि समय सूचकता वापरून ट्रेक वरून बाजूला झालो.मी फार काही तरी अनुभवले त्या एक क्षणात. मला वाटले जीव गेला आणि परत आला त्या एका क्षणात. मी स्तब्ध होतो. जवळचे रेल्वे पोलीस माझ्या कडे आले. आणि हाथ धरून समोरच्या प्लेटफोर्म वर घेवून गेले व बाक वर बसवले. त्यांनी मला सांगितले कि हा चमत्कार आहे कि तू वाचला. पुढे असे करू नको. तुझी गाडी सुटत असेल तर सुटू दे, सुटलेली गाडी परत मिळेल पण शरीरातील जीव नावाची गाडी जर एकदा जीवनाच्या प्लेटफोर्म वरून गेली तर कधी परत येत नाही.मी त्यांचा आभार व्यक्त केला आणि समोर उभी असलेल्या गाडीत जावून बसलो. या घटने मुळे सर्व लोकांची दुर्ष्टी माझ्यावरच होती. मधेच शाळेतील एक शिक्षक भेटले त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यात. अर्धा तास नंतर माझे stop आले मी उतरलो.रोटरी आय हॉस्पिटल जाण्यासाठी रिक्षेची वाट पहिली. पण एक पण रिक्षा चालक ४० किवा ५० रुपया खाली बसवायला तयार नव्हता.जिथे जाण्यासाठी किमान ५ रुपये लागतात तेवढ्या जागे साठी ५० रुपये ? मी पायीच निघालो. 
     जवळ जवळ २० मिनिटांनी तेथे पोहचलो.केस पेपर काढला आणि क्लिनिक मध्ये शिरलो पाहतो तर एक हि डॉक्टर नाही. त्यांची  Conference  चालली होती त्यामुळे मला वाट पहावी लागली.आणखी दोन तास झाले तेव्हा ते डॉक्टर आले. माझ्या अगोदरच काही पेशंट येवून बसलेले होते. ते एक एक करून मध्ये बोलावल्यावर जात होते.मी मात्र माझा नंबर कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. मध्ये मध्ये च दुसरे पेशंट येत होते. ते हि आत जात होते. मी विचार केला नंतर येणार्यांना आत बोलावत आहे मला का बोलावत नाही ?आत वार्ड रूम मधेय जावून  नर्स ला दोन वेळा विचारले. दोन्ही वेळा तिने सांगितले "डॉक्टर बोलावतील तुम्हास ..थोडे थांबा." परत बाक वर जावून बसलो.समोर एक सतरा - अठरा वर्षाची मुलगी आणि ३५ ते ३६ वर्ष  वयोगटातील स्त्री येवून बसली. दोन्ही एन आर आई होते. त्या मुलीच्या आई ला गुजराती बोलता येत होते पण मुलीला अजिबात गुजराती समजत नव्हते आणि बोलता पण येत नव्हते म्हणून ते इंग्लिश मधून संभाषण करत होते. मी काळा चष्मा घातला होता म्हणून त्यांना वाटत होते कि माझे लक्ष त्यांचावरच आहे.कदाचित ती स्त्री माझा तिरस्कार करत होती. माझ्या कडे पाहून ती स्त्री तिच्या मुलीला स्थानिक लोका विषयी बरे वाईट सांगू लागली.मला तर रागच आला होता. पण काही न बोलण्याचे योग्य वाटले आणि बसून राहिलो.माझा नंबर आला आत गेलो.तपासणी झाली , औषध घेतली आणि निघालो स्टेशन कडे. त्या दोन्ही एन आर आई माय लेकी देखील माझ्या मागे निघालेत. योगानु-योग त्यांनाही स्टेशन जावयाचे होते म्हणून एकाच रिक्षेत बसलो. त्या स्त्रीला वाटले मी गुजराती असावा म्हणून तिने मला प्रश्न केला "तमे गुजराती  छो ?"(तुम्ही गुजराती आहात का ?) मी प्रत्युत्तर दिले "हु भारतीय छु." (मी भारतीय आहे.) आणि मी स्थानिक व्यक्ती आहे. त्या स्त्रीला अपमानास्पद वाटले आणि तिने बोलणे बंद केले. तिच्या मुलीला माझ्या विषयी बरे वाईट इंग्रजी तून सांगू लागली.मी फक्त ऐकत होतो. स्टेशन आले. रिक्षे चे पैसे दिले आणि पुढे निघालो.तिच्या कडे सुटे पैसे नव्हते म्हणून रिक्षा चालक डोके लावू लागला. मी मागे वळून तो प्रकार पाहिला आणि स्वतः समोर जावून त्या दोघांचे हि  दहा रुपये रिक्षा चालकाला दिले. आणि घाईत  प्लेटफोर्म कडे निघालो. त्या दिवशी मला तर असे वाटले कि माझ्या नशिबाच्या रेघा मधून त्या दोन्ही व्यक्ती निघणार नव्हती. कारण ज्या ट्रेन मध्ये मी बसलो त्याच ट्रेन वर ते पण मागो माग आले. मी दहा रुपये जरी दिले तरी ती स्त्री (मुलीची आई) मला थेंक यु म्हणायला पण तयार नव्हती.. गच्च गर्दी असल्याने लोक एक मेकांना लोटत होते. आणि त्यांना भारतातील अशी धक्का बुक्कीची सवय नव्हती.मी त्या मुलीला माझ्या जागेवर बसण्याचा इशारा केला.अगोदर तिने नाकारले .थोड्या वेळाने गर्दी जास्त वाढली , मी परत इशारा केला, तेव्हा ती मुलगी येवून बसली. मी मात्र उभा राहिलो.पंधरा मिनिटे झाली माझे स्टेशन येणारच होते. मी त्या स्त्री जवळ गेलो आणि म्हटले "which ever place you go to visit, never ever insult of there local people. There will not be always a gujarti to help you. there will be only an indian and that indian means a local people. at lest don't teach your child to wrong things about local people. you also belongs to same locality before being a foreigner." ती स्त्री अवाक च झाली होती. तिने देखील काळा चष्मा घातला होता . तो चष्मा डोक्या वर करून तिने खाली मान घातली. तेव्हा ती मुलगी मला मात्र "thanks" म्हटली.मी वेल कम म्हटले आणि उतरलो. कदाचित त्या स्त्रीला चुकी कळली असेल त्या मुळे तिने खिडकी मधूनच "बाय" चा इशारा केला. तेव्हा वाटले कि आता ती स्त्री कोणाचाही अपमान करणार नाही.चलो कोई बात नाही "देर से आये पर  दुरुस्त आये"                                                 

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

जाना था जापान , पहोच गए चीन !!

हाश !! संपली मुलांची परीक्षा. कालच बारावी च्या मुलांची  कम्प्युटर विषयाची परीक्षा संपली. दोन दिवस चालली. गुण देण्यासाठी सकाळ पासून दुपारचे बारा वाजेपर्यंत एका लेब मधून दुसर्या लेब मधेय चकरा मारत होतो. आता थोडा विसावा मिळाला आहे.तरी अधून मधून मेनेजमेंट मुलाकडून प्रोजेक्ट तयार करवून घेण्यासाठी रोज रोज टोमणा मारत आहेत. कॉम्प्युटर चा हेड फोनमध्ये बिघाड झाला आहे. त्याला सर्विस सेन्टर वर घेवून जावयाचे आहे. मित्राचे जुने कॉम्प्युटर घरी आणून ठेवले आहे त्याचे दुरुस्तीकरण बाकी आहे.इतर वर्गामध्ये अजून बरेच धडे पूर्ण करायचे राहिले आहेत.त्या बद्दल प्रिन्सिपल माझी लेफ्ट राईट  करवून घेत आहे . रोज नवीन काही न काही काम निघत आहे. माझे स्वतः चे कामे अजून राहिली आहेत ते पूर्ण करायला वेळ मिळत नाही. तीन आठवड्या पूर्वी आमचे जुने हेड अमेरिके हून परत आले  तेव्हा पासून शाळा सुटल्या वर हि दोन दोन तीन तीन तास मीटिंग करत बसत आहे. काय करायचे काही सुचत नाही. हे झाले .. लगेच तीन दिवसा पूर्वी पूर्ण फेमिली गावाला गेली आहे. मग काय ? अहो.. घरातील सर्व ...म्हणजे सर्वच काम करावे लागत आहे. भांडी , कपडे , बाजार , पाणी भरणे पासून सर्व काही. असे वाटते ना कि लोक जगण्यासाठी काम करतात पण मी कामा साठी जगात आहे. नुसती कृत्रिम लाईफ झाली आहे. आजचा दिवसच विचित्र होता. आज गुगल वर सर्च करून साधी खिचडी कशी बनवतात ती कृती शोधली आणि कागदावर लिहून घेतली.बस त्या लिहिलेल्या कृती नुसार सुरवात केली. पण तांदूळ उकडत असतांना मला समझले नाही कि अजून किती पाणी ओतावे लागेल. चुकीने माझ्या ने जास्त पाणी टाकले गेले. दहा ते पंधरा मिनिटे ते जास्ती चे पाणी बाष्प बनून जात नाही तो पर्यंत वाट पाहिली. पाणी चे बाष्प तर झाले पण तेथे खिचडी च्या ऐवजी दुसराच कोणत्या तरी प्रकारचा पदार्थ तयार झाला. मी तर डोक्यालाच हात लावला. म्हटले "झाले कल्याण ....जाना था जापान पोहोच गये चीन" खिचडी च्या एवजी पिवळ्या रंगाचा चवदार गुंदर तयार झालेला दिसत होता !!. मला भीती हि वाटली कि बाबा आले तर नक्कीच बोलतील. मग आता काय पर्याय ? फेकू तर शकत नव्हतो. काय करायचे ? घराच्या बाहेर निघून गाय शोधू लागलो. म्हटले दिसली तर टाकून देणार. पण तेही दिसत नव्हती. तरी वाटले एकाद तासाने रोड वर ईकडे तिकडे फिरताना एखादी गाय तर नक्की दिसेल. दोन तास पसार झाले पण गाईचा काही पत्ता नाही. शेवटी पाच वाजता गाय दिसली तेव्हा ते गाई समोर ठेवले. तो पर्यंत मेगी वर टाइम पास केला.चांगलीच फजिती झाली आज. बघू ..उद्या जर आई लवकर परतली. तर परत अशी फजिती होणार नाही. नाही तर परत दुपारी मेगी आणि संध्याकाळी चाइनीस च्या स्टोल वर चाइनीस. पण एक गोष्ट लक्षात आली कि जेवण बनवणे म्हणजे काही तोंडाचा खेळ नव्हे.शाळेला उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्यात का आई कडून नक्कीच काही तरी बनवायचे शिकून  घ्यावयाचे आहे.