शनिवार, २३ जून, २०१८

आज ( Nirjala Ekadashi ) निरजला एकादशी आहे

आज  कामावर मन लागत नव्हते कारण  एकच  कि आज  निरजला एकादशी  आहे. बहुसंख्य स्टॅफ अबसेन्ट होता. एकाला विचारले तेव्हा कळलं कि ते सर्व उपवास करणार म्हणून येणार नाही. मला नवल वाटले. मला काहीच माहित नव्हते म्हणून मी गुगल वर सर्च केले तेव्हा कळाले कि विष्णू ची भक्ती या दिवशी केली जाते व दान धर्म केला जातो. जग जरा विचित्र आहे. स्वतः ला मोक्ष प्राप्त करायचे आहे म्हणून उपवास करायचा व दान धर्म करायचा. एक प्रश्न पडतो जर भीम एकादशी नसती आली तर त्यांनी दान धर्म केला असता का ? नाही ना ? म्हणून सांगतो स्वार्था  शिवाय येथे मनुष्य काहीच करत नाही. उपवास जर करायचा असेल तर खऱ्या अर्थाने मनातील वाईट गोष्टीचा त्याग केला पाहिजे. दुसऱ्या बद्दल ची ईर्षा संपवली पाहिजे. मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार असतील तर त्यांचा त्याग करायला हवे. तर तो खरा उपवास. अन्यथा तुम्ही फक्त शरीराचे अन्न  पाणी एका दिवसा साठी बंद करून परमेश्वराला लुबाडण्या चा प्रयत्न करतात तो योग्य नाही. मला नाही माहीत कि किती लोक् माझ्या गोष्टी शी सहमत होतील. कदाचित वाचकांना राग देखील येईल. पण जे सांगतो ते खरे आहे. मंदिरात  दान पेटित टाकतात  किंवा ब्राह्मणानं दान दक्षिणा  कश्याला हो ? देवाला का पैसे हवेत ? आणि बाह्मणांना काही कमी आहे का  ? खरे दान करायचे असेल तर त्या रस्त्यावरील उपाशी असलेल्या भिकाऱ्याला अन्नाचे किंवा वस्त्राचे दान करा . आणि मग पहा , तुम्हाला मोक्ष कडे धाव घेण्याची गरज नाही , मोक्ष तुमच्या कडे येईल. कारण दानी  व पवित्र आत्म्यास मोक्ष प्राप्त होत असते. 

मंदिरात दान  करून नको दाखवू  कि तू किती मोठा दाणी 
अरे पैसा माझया पासून या जगात कारण मी पैश्याचा  धनी

काढून टाक अहंकार ,द्वेष व विषमतेचा विचार जो  आहे मनात
कारण राजा असो किंवा राणी संस्कारी असो किंवा अहंकारी सर्व गेलेत स्मशानातं  

सर्व वाचक गणास हार्दिक शुभेच्छा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा