रविवार, १५ एप्रिल, २०१२

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे

स्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने नजीक बाहेर रोडवर असलेल्या चहा च्या स्टोल वर नेतात. आणि मुला सोबत असलेल्या नाते वाईकास मुलाचे नाव गाव , शिक्षण , पगार व राहण्या संबधित प्रश्न विचारतात .मुलीचा बाप सरकारी नोकरी च्या अपेक्षेत असतो. जेव्हा त्याला कळते कि मुलगा प्राइवेट जोब करतो तेव्हा विचारताना मुलगा एखादा गुन्हेगार असेल तसे हाव भाव चेहरावर दिसू लागतात.मुलाला सर्व काही विचारले जाते. सर्व काही अगदी व्यवस्थित आहे. मुलाला कोणते हि व्यसन नाही. स्वतः चे घर आहे ,रेगुलर जोब आहे, कोणाचाही एक पैशाचा कर्जबाजारी नाही. राहणीमान अगदी व्यवस्तीत आहे. त्या मुलीच्या बापाचे नसेल असे त्याचे घर आणि राहणीमान आहे. मधेच एक बहाणा करून ती व्यक्ती घरी फोन करून , दूर जावून काही तरी विचारते आणि मुलाला प्रत्युतर देते कि मुलगी तर आज पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यास गेली आहे. ती तुम्हास संध्याकाळी भेटेल. ते मुद्दाम तसे बोलतात कारण त्यांना माहित आहे समोर ची व्यक्ती फार लांबून आली आहे ते काही थांबणार नाही. अर्थात विषय तिथेच संपतो. असाच प्रकार माझा मित्र आणि माझ्या सोबत घडून गेला. मी चकितच झालो होतो कि समाजात एवढी निर्लज्ज लोक असतील कि ते कमीत कमी घरी चहा साठी बोलावून चर्चा करू शकत नाही. आणि रोडावर बसून एखाद्या स्टोल वर त्या संदर्भात चर्चा करतील. लोकांची मानसिकता आज पण बदलेली नाही. नव्या नियमानुसार सरकारी नोकरी वर कुठलाही पदावर किवा क्लास वन ऑफिसर जरी असेल त्याला देखील पूर्वी जे लाभ मिळत होते ते मिळत नाहीत. हो सुट्याच्या लाभ जरूर मिळतो. आणि दुसरा महत्वाचा फायदा असा कि सरकारी नोकरी वर आले म्हणजे बेफिकर होवून काम करणे. राजा पण आपला आणि प्रजा पण आपली. मग चालू द्यायचा कारभार आपल्या मर्जी नुसार. मला वाटते असे कोणाचे हि अपमान व्हायला नको त्या साठी. अश्या पालकांनी घरा बाहेर, कामाच्या ठिकाणी किवा जिथे ते लोकाना भेटतात  तिथे एक  पाटी लावली पाहिजे आणि त्यावर स्पष्ट  मोठ्या अक्षरात लिहिले पाहिजे "मुली साठी सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे". जेने करून त्यांना खोटे बोलावे लागणार नाही कि "मुलगी कलेक्टर ची परीक्षा देण्यास गेली आहे किवा पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यासाठी गेली आहे वगैरे" शिवाय या मुळे बराच वेळ वाचेल दोन्ही पक्षाचा. आणि अपमानास्पद तर मुळीच वाटणार नाही. खरे आहे ना ? मला वाटते समाजात दोन वर्ग पडतात . एक वर्ग असा असतो जो मुलीची वय निघून जाते, मुलगी चांगलीच वयस्कर होते पण सरकारी नोकरी वाला नवरा मुलीचा बापाला मिळत नाही तो पर्यंत तो तिचे लग्न करत नाही. येथे सहन करणे फक्त मुलीच्या नशिबात येते. अशा वेळेस टोमणे मारणारे बिचार्या त्या मुलीला प्रत्यक्ष किवा अप्रत्येक्ष रिते वयाच्या बाबतीत चर्चा करून टोमणे मारतात. तिची मानसिक अवस्था बिघडते. कोणतीही मुलगी समोर जावून आपल्या आई वडिलांना कधी हि सांगू शकत नाही कि माझे आता लग्न करा. ती फक्त सहन करू शकते. समाजात असे बरेच प्रकरण पहावयास मिळतात. मग शेवटी ..."बाबा पण गेले  नि दसम्या पण गेल्या". सरकारी नोकरी च्या भूता मुळे आलेली चांगली स्थळे पण ते गमावतात. आणि आबड धोबड ठिकाणी मुलीला देवून टाकतात. याचा परिणाम फक्त बिचारी ती मुलगी भोगते. हा झाला एक वर्ग आणि दुसरा वर्ग जे मोजके आणि व्यावहारिक असतील. ते म्हणतात ना "लोहा गरम है मार दो हातोडा"  तसे त्यांचे असते योग्य स्थळ आणि माणसे दिसली म्हणजे मुलीची पसंत नापसंत विचारतील आणि मग लग्न साठी पुढे येतील. 
चला शिर्डी जाण्याचा प्लान आहे तिकीट बुक करण्यासाठी लवकर जावे लागेल.बाकी चर्चा पुढच्या भागात... 

५ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. माझे पण तेच मत आहे. मन त्या मानसिकतेचे काय ? त्याला आडा घालणे शक्य आहे का ?

      हटवा
  2. जीतेन्द्र , तुम्ही अगदी मनाची गोष्ट येथे लिहिली आहे. गेल्या वर्षी माझ्या धाकट्या भावासाठी मुलगी शोधात असताना असा प्रकार घडून गेला. माझ्या वडिलांना आणि मला तर अनावर संताप आला होता. वडील म्हणायचे कि तो कोणतेही प्रलोभन देवून जरी मुलगी देण्यास तयार असेल तरी हि त्याची मुलगी करायची नाही. कारण त्या व्यक्ती ला शिस्त माहित नव्हते मोठ्या तोर्याने आणि अहंकाराने ती व्यक्ती बोलायची... कृपया तुमचे पुढचे विचार मांडा..उत्सुकतेने वाचण्यासाठी वात पाहतोय...
    -नवीन गावित

    उत्तर द्याहटवा
  3. तुमच्या अभिप्राय बद्दल आभार..लवकरच पोस्ट करणार पुढे वेळ मिळाल्यावर

    उत्तर द्याहटवा
  4. aho kay third degree lavli aahe tumhi sarkari nokri walya mage...javu dya soda ki bicharyanna. tase mala dekhil tond dyave lagle aahe..pan aplya sarkha vyakti kahi karu shakat nahi.

    उत्तर द्याहटवा