सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

निसर्गाची किमया



विजेच्या रुपाने शंखनाद झाला
रवि कुठे ढगा मागे लपला 
गार गार मंद मंद वारा वाहिला 
अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला 

हिरवे हिरवे हे गवत डोलू लागले
मूक जनावर ही काही  तरी गीत बोलू  लागले
माती च्या सुगंधाने मन मोहिले 
नभाने इंद्रधनुष्य रुपी वस्त्र परिधान केले 

काय ते मधुर संगीत पावसाच्या सरी ने निर्माण केले 
ते एकण्यात मन माझे तल्लीन झाले 
कवितेच्या चार ओळी लिहिताना ध्यान माझे निसर्गात गुंतले 
काय लिहिणार ? कारण मना तील सारे विचार पाउसाच्या पाण्यात भिजले. 

कविते साठी बसलो होतो पण ती अपूर्ण राहिली 
कारण निसर्गाची अशी किमया पूर्वी मी कधी न पाहिली
अहो भाग्य माझे , आंतरात्मा निसर्ग सौंदर्याचा साक्षी झाला 
फार फार आभार तुझे परमेश्वरा !! 
मला या स्वर्गात जन्म दिला 
मला या स्वर्गात जन्म दिला 


-- जितेन्द्र

४ टिप्पण्या:

  1. छान..आवडली कविता ..तरी अजुन अपेक्षा आहेत

    उत्तर द्याहटवा
  2. छान कविता आहे पण खूपच टिपिकल मराठी शब्द आहेत ते समजत नाहीत तेवढा आमचा पण विचार कराछान कविता आहे पण खूपच टिपिकल मराठी शब्द आहेत ते समजत नाहीत तेवढा आमचा पण विचार करा

    उत्तर द्याहटवा
  3. कमेन्ट केले त्याबद्धल आभार ...तरी कोणते टिपिकल शब्द आहेत ते सांगावेत ...

    उत्तर द्याहटवा
  4. पाउसा बद्दल चांगलाच प्रेम आहे तुम्हास ....छान ..आवडले

    उत्तर द्याहटवा