सोमवार, १३ जून, २०११

थोडे माझ्या विषयी ..........

नमस्कार मित्रानो , माझे नाव जितेंद्र इंदवे आहे . computer trainer म्हणून मी  सुरत मध्ये एका शाळेत कार्यरत आहे. इंटरनेट विश्वामध्ये मी सुमारे आठ वर्ष पासून आहे. ब्लोग्गिंग वर लक्ष होते पण कधी हि जास्त रस घेतला नाही. विचार करायचो कि काय मिळते तिथे पोस्टिंग केल्याने ?. पैसे तर मिळत नाही पण खोटा समय  वाया जातो. म्हणून ब्लोग्गिंग साठी जास्त जवळीकता साधली नाही. पण आता काही लोकांचे ब्लोग वाचल्याने वाटले कि यात खोटे किवा वेद घालविण्याचा काही संबंध नाही. कमीत कमी एखादा व्यक्ती आपल्या मन स्थितीचे, त्याच्या अनुभवाचे वर्णन करून काही मानसिक भार हलका करू शकतो. आणि त्यामुळे जर कोणी व्यक्तीला त्याचातून मनोरंजन किवा उपयुक्त जानकारी मिळत असेल तर ती गोष्ट करणे म्हणजे समय वाया घालवणे नव्हे. तर येथे जास्त फिलोसोपिकॅल व्यक्ती म्हणून स्वताला सादर न करता माझ्या विषयावर येतो.
                         पण त्या आधी मला माफी मांगावी लागेल, कारण मी जन्मा पासूनच सुरत मध्ये असल्या कारणाने माझी मराठी भाषा पाहिजे तेवढी ठळक नाही. म्हणून विचार मांडताना व्याकरण दोष किवा शब्द दोष असतील तर त्या साठी क्षमा असावी. माणसाच्या जीवनात पावलो पावली नेहमी अश्या घाडा मोडी , घटना घडतात  कि ज्याच्यामुळे पावले चालत राहतात पण मंन चालत नाही ते कुठे तरी अटकते. मग ते एका क्षण साठी का होई ना ..अश्याच काही गोष्टी माझे मन येथे नमूद करण्या साठी प्रेरित झाले आहे. मित्रानो एक गोष्ट तुम्हास सांगायला हवी. ती अशी कि अमुक लेख तुम्हास काळ क्रमाने मिळणार नाहीत कारण मनात , हृदयात व डोक्यात त्या जश्या आठवल्यात तश्या मी मांडायचा प्रयत्न केला आहे.

महत्वाची गोष्ट सांगायची राहिली कि ब्लोग चे नाव एक पथिक का ? तसे तुम्ही सुज्ञ आहात शीर्षकाचा अर्थ सांगायची मला आवश्यकता वाटत नाही. तरी औपचारिकता म्हणून सांगतो .. पथिक म्हणजे मार्ग वर चालणारा ..तसा प्रत्येक व्यक्ती या जगात एक पथिक आहे .. तो कोणत्या ना कोणत्या मार्ग वर निघालेला आहे. प्रत्येकाचे लक्ष वेगळे आहे.  माझे हि आहे. मी ते चर्चा करून तुमचा मूळ डाउन करत नाही. तर भेट घ्या माझ्या ब्लोग वर आणि पहा या पथिकाच्या मार्गावर काय काय येते. 



शेवटी , येथे वाचकाचा माला प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा.


तुमचा 

जितेंद्र इंदवे 

  

६ टिप्पण्या: