जुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, "लग्न केले कि नाही?" किवा "किती मुले आहेत तुम्हास ?". या प्रश्नाचे उत्तर देवून मी पण कंटाळलो आहे. किती वेळा परत परत तेच उत्तर देत राहायचे ? शेवटी नाईलाजाने मित्र वर्तुळा पासून दूर राहिलो आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसे पाहिजे तसे स्थळ मिळत नाही . आणि समजा मिळाले तर तिथे एक अथवा दोन कारणाशिवाय जमत नाही. एक तर मुलगी जास्त शहाणी असेल किवा आई वडील व नाते वाईक दीड शहाणे असतील. दोन वर्ष झाले आहे पण ज्या सुंदरी च्या शोधात आहे ती काही अजून काही मिळालेली नाही. मागे, मला झालेल्या अनुभवाची नोंद " सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे भाग
एक व
दोन " मध्ये केली आहे. या वर्ष दरम्यान देखील मला नवीन अनुभव झाला.खानदेश भागात "नंदुरबार " म्हणून जिल्हा आहे. त्या ठिकाणी मुलगी पाहण्यासाठी गेलो होतो. मुलीने बारावी नंतर डी एम एल टि केले होते आणि त्या बेस वर सरकारी हॉस्पिटल मध्ये जोब वर होती. अर्थात सरकारी नोकरी वर होती.जवळच्या नाते वाईकाने मला तिथे पाहण्यासाठी बोलावले.पण माझ्या मनात तर होतेच कि ते नक्की सरकारी नोकरीवाला नवरा शोधात असतील. म्हणून आपले जाणे योग्य नाही. मी टाळले. परत चार महिन्या नंतर दुसर्या नातेवाइका कडून त्याच मुली साठी बोलावाले गेले. मनातल्या मनात विचार आला कि मुलगी काही माझ्या कुंडळि मधून जात नाही आहे. आपण नक्की गेले पाहिजे. माझ्या शाळेतील एका शिक्षक मित्रा कडून माहिती मिळाली कि ते मुलगी च्या वडिलाना ओळखतात. जेव्हा ते (मुलीचे वडील ) बस ड्राइवर होते तेव्हा ते नेहमी त्या शिक्षांना भेटत असत (त्यांचा कोलेज च्या रूट वर तीच एक बस होती ). व्यक्ती चांगले आहेत म्हणून आपण गेले पाहिजे असे मला वाटले.
नंदुबार ला आलो , त्या ठिकाणी सर्व प्रथम जुन्या विस्तारत जिथे ते राहत होते तिथे त्याचा विषयी माहिती गोळा केली. पण आश्चर्य !! कोणी हि मला त्यांच्या स्वभाव व वर्तणूक विषयी चांगले सांगितले नाही.पण तरी माझ्या शिक्षक मित्राचे शब्द माझ्या लक्ष्यात होते. तेच डोक्यात ठेवून पुढे गेलो.
बाजार पेठात त्यांचे दुमजली जुन्या टाईपचे घर होते , बाहेरून ते घर, माधव राव पेशवे यांच्या काळातले वाटत होते. घराची अवदशा पाहून वाटले नक्की यु एन ने त्या घराला इंडिअन हेरीटेज मध्ये सामील करायला हवे.आत गेलो, बसलो, समोर च एकी कडे आई व दुसरी कडे बहिण बसली. मी एका पलंगावर बसलो. माझ्या डाव्या हाता कडे त्या दरवाज्यात मुलीची आई उभी होती. आणि उजव्या हाता कडे वडील एका खुर्ची वर बसले होते.काल रात्री गली मध्ये लग्नाचा कार्यक्रम होता म्हणून मुलगी थकलेली होती. त्यामुळे तिला तयार होवून चहा पाणी घेवून येण्यासाठी बराच वेळ लागला. तो पर्यंत मुलीचे वडील नाते वाईक विषयी एक दोन गोष्ट करू लागले. जवळ जवळ पंधरा मिनिटा नंतर चहा आणि पाण्याचा ट्रे हातात घेवून मुलगी पांढर्या साडीत सुसज्ज होऊन आली. मुलेचे वय जवळ पास एकोणतीस ते तीस च्या जवळ पास होते पण मुलगी सुंदर होती त्यामुळे मी वय ईग्नोर केले..तिने प्रेमाने मला , आई व बहिणीस चहा दिला.
दोघांनी एक दुसर्याचा परिचय करवून घेतला.नाव , गाव, शिक्षण,इच्छा वगैरे विषयी चर्चा झाली. वीस मिनिटे पसार झाली , पण मुलीची आई अजून काही बसलेली नव्हती.मुलीच्या मागे दरवाज्यात उभीच राहिली. मला हे समजत नव्हते कि त्या मुलीच्या आईला बसायला काय झाले होते ?...अहो तब्बल वीस मिनिटा पासून जे काही गोष्टी होत होत्या त्यात ते उभे राहूनच हो कार आणि नकार देत त्यांचे मत मांडत होते. या चित्रा वरून तर एकच निष्कर्ष मला काढता आला कि येथे घरात मुलीच्या आईचे वर्चस्व आहे, वडील बिचारे नुसते औपचारिकता म्हणून असतील. पण पुढच्याच क्षणाला त्यांनी चांगल्याच पद्धतीने स्वतः चा परिचय करवून दिला.
कारण समोरून अश्या काही स्टेटमेंटचा मारा त्यांनी केला कि मला तर फक्त ऐकतच राहावे लागले.
त्या पैकीचे काही विधाने या प्रमाणे होती.
"आमचे अमुक व्यक्ती (काका - मामा ) हे नाशिक शिक्षण बोर्डात अधिकारी आहेत "
"माझी मुलगी समग्र राज्यात अमुक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे."
"माझ्या मुलीला फोरेन मध्ये आमक्या गोष्टी साठी बोलावण्यात आलेले , पण आम्ही पाठवले नाही "
"औरंगाबाद हून एम बी ए झालेली व्यक्ती मुली साठी आली होती पण आम्हास आवडले नाही"