शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

कोण असेल तो ?


     आज पासून सुमारे दहा वर्षा पूर्वीची गोष्ट. तेव्हा मी आय टी आय अंकलेश्वर येथे शिकत होतो. रोजच रेल्वेने सुरत पासून तर अंकलेश्वर चा प्रवास करायचो. तसा मला रोज सकाळी लवकर उठायचं म्हणजे फारच मोटा त्रास वाटायचे , मी आळसी होतो. तरी आई पाच वाजता उठून सारखी   "उठ उठ लवकर उठ ......गाडी चुकणार तू आज ...उठ लवकर " शब्द कानावर टाकत असे. शेवटी मला उठावे लागायचे. आणि मग घाई घाई ने मी तयार होत असे. फारच कठीण दिवस होते. कोठल्याही प्रकारचा ब्रेकफास्ट न घेता धावत रेल्वे स्टेशनावर पोहोचायचो. आणि पाच वाजे पर्यंत कुठले हि जेवण न घेता रेल्वेने परतायचो. कधी कधी मित्रांनी जर होस्टेल मध्ये बनवले असेल तर त्यांच्या आग्रहावर जावून जेवणाचा आस्वाद घ्यायचो पण ते कधी कधी होते..कारण मला रोज रोज त्यांच्या आग्रहावर जावून त्यांच्या बरोबर होस्टेल वर जेवण करणे बरोबर वाटत नव्हते. कदाचित मला फार शरम वाटत असे. असाच रुटीन चालला होता. 
     एके दिवशी , मी रोजच्या नियम प्रमाणे आय टी आय ला जाण्यास निघालो. ट्रेन आली बसलो. तीन तास पसार झाले , माझे स्टेशन आले आणि मी उतरलो.  प्लेटफोर्म कडे निघालो. अचानक एक व्यक्ती माझ्याकडे धावत आला आणि उदगारला, "ला भाई कल के बाकी पैसे दे दे पेपर ले के तू तो गायब हि हो गये  हा ?" त्याचे हे बोलणे ऐकून मी तर अवाकच झालो. मला कळत नव्हते तो कसले पैसे मागत आहे. मी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याला सोप्या भाषेत सांगितले कि तो जी व्यक्ती मला समजत आहे ती व्यक्ती मी नाही. तो कोणी दुसरा आहे आणि मी दुसरा. पण तो काही माझी गोष्ट स्वीकारायला तयार नव्हता. त्याच्या चेहरा वर संतापाचे भाव मी वाचू शकत होतो. मी घाबरलो आणि शेवटी त्याला पंधरा रुपये दिले आणि तेथून निघालो. चालत असतांना मला सारखा विचार येत होता कि खरच दुसरा व्यक्ती आहे का या ठिकाणी जो माझ्या सारखा दिसत असेल ? पण उत्तर कोण देणार? डोक्याला दोन्ही हात्तानी खाजत आय टी आय मध्ये आलो. मित्रांना हि घटना सांगितली. पण मला अपेक्षा नव्हती तसा प्रतिसाद त्यांचा कडून मिळाला हि गोष्ट ऐकल्यानंतर सर्व माझ्यावर हसू लागले, आणि म्हणाले कि "तुला त्या माणसाने चांगलाच बनवला. पैसे हि घेवून गेला तो वेडा.."  तेव्हा मला स्वतःवर थोडा फार संताप आला कि मी का बरे त्या माणसाला पैसे देवून टाकले ?
     तो दिवस संपला घरी आलो आणि जेवण न करता शांततेने जावून झोपलो. दुसरा दिवस उगवला. परत घाई घाईत स्टेशनवर पोहचलो. ट्रेन आली ...... सुखरूप अंकलेश्वर स्टेशन वर आलो. तेव्हा परत आजू बाजू ला मी त्या काल  मिळालेल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही दृष्टीस पडला नाही. मला वाटले मित्र जे काल बोलले ते खरे होते. चालत चालत पाच मिनिटे झाली असतील, एस टी स्टेन्ड जवळून पसार होत होतो. स्टेन्ड वरच सारखी गर्दी जमलेली दिसली. कदाचित एखादी घटना घडली असेल. मी जवळ न जाता दुरूनच पाहत होतो. एक इसम जवळ आला आणि म्हणाला "क्या यार क्या हो राहा था वहा पे कूच पता चला क्या ? और येह क्या तू दो मिनिट मी कपडे बदल के भी आ गया  हा ?" तर हे शब्द एकूण तर माझ्या डोक्यातील सर्व तंतू हलले ...स्वतःलाच विचारले काय म्हणतो आहे हा इसम ? तेथे मी कोणते हि उत्तर न देता सरळ आई टी आई कडे वात धरली. ती घटना देखील मी मित्रांना  सांगितली नाही. कारण मला वाटलेच की ते काल प्रमाणेच माझी मस्करी करतील आणि हसतील.दिवस संपला घरी परतलो. आणि जेवण न करता झोपलो. पण एक विचार जो माझ्या डोक्यात सतत येत होता कि खरोखर तिथे एखादा व्यक्ती आहे जो माझ्या सारखा दिसत असेल ? मी तेथे आई टी आई मध्ये शिक्षण पूर्ण केले  पण शेवट पर्यंत त्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. फक्त तो विचार डोक्यात प्रश्न्याच्या स्वरुपात राहिला कि "खरोखर तिथे आहे कोणी माझ्या सारखा ?आणि जर असेल तर, कोण असेल तो ?"   "     

४ टिप्पण्या:

  1. मी अस एकलय या जगात सारखी दिसणारी 7 माणसे असतात कदाचित ही गोष्ट खरी असेल अस तूझ्या अनूभवा वरुन वाटतेमी अस एकलय या जगात सारखी दिसणारी 7 माणसे असतात कदाचित ही गोष्ट खरी असेल अस तूझ्या अनूभवा वरुन वाटते

    उत्तर द्याहटवा
  2. @ सीमा हे मलाही माहित नव्हते कि जगात स्वतः सारखी दिसणारी सात माणसे असू शकतात. हे मला आत्ता तुझ्या बोलण्यावरून लक्षात आले. असतील , परत माझा ब्लोग वाचून प्रतिसाद दिला त्या बद्दल आभार.

    उत्तर द्याहटवा
  3. होय गडी खरोखर छान लिहिले ..बस असेच लिहित रहा..पण तरी एक सांगायचे आहे कि अमुक जोड शब्दात येथे सुधारणा करायला हवी. जर ते टाईप मिस्टेक नसेल आणि फोंटचा प्रोब्लेम असेल तर मग जावू दे , नाही तर जरूर पहा.....

    उत्तर द्याहटवा
  4. मस्त लिहिले आहे..छान

    उत्तर द्याहटवा