शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2

दोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे "सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे" या विषयावर चर्चा चालली होती. मला तर फारच विचित्र अनुभव झाले. अश्या ठिकाणी मुलगी पहावयास गेलो जिथे साधी बसण्यासाठी पण जागा व्यवस्थित नसेल. घराच्या पहिल्या द्वार पासून तर शेवटच्या द्वार पर्यंत नुसती धूळ उडतांना दिसते. कावळे एका खिडकीतून दुसर्या खिडकीद्वारे उडताना दिसायचे .... बसावेसे पण वाटत नाही. मुलगी जरी नुसती बारावी पास होती. पण मुलीचे पालक आणि नाते वाईक, जणू त्या मुलीने मोठाच पराक्रम केला असेल अशा पद्धतीने तिचा परिचय करून देतात. आणि त्या परिचय मध्ये पण मुलाला त्याचे हलक्या प्रकारचे स्टेटस आहे तसे दर्शवितात. आणि सरकारी नोकरी आहे का ? त्याच ओळीवर जास्त भर देतात.  अशा वेळेस मन तर फार वैतागले होते, मनात वाटायचे कुठे जंगला मध्ये मुलगी पहावयास येवून गेलो. या लोकांना बारावी च्या पुढे आणि सरकारी नोकरी शिवाय पण काही तरी असते ते माहीत आहे का ?. स्वतः वर संताप पण येत होता कि   येण्या अगोदर कमीत कमी चौकशी करायला हवी होती. माझा एक मित्र , विनोद जो कोल्हापूर ला आहे , बिचारा असाच कंटाडून गेला होता या सरकारी नोकरीच्या भूता मुळे , सर्व काही असून हि त्याला पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. नेहमी एकच प्रश्न समोर येत होता "सरकारी नोकरी आहे का?" जवळ जवळ एकाद वर्ष तो मुलीच्या शोधात होता. पण काही नाही. मग शेवटी त्याने ठरवले कि या सरकारी नोकरीच्या भुताला कसे हाताळायचे. तो सुरत मध्ये म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये कंत्राटी धोरणाने जल विभागात नोकरी वर लागला. सर्व काही त्याने प्लानिग नुसार केले. चार ते पाच महिन्यात त्याने खालचे वरचे जे कोणतेही अधिकारी असतात त्यांना खिस्यात केले. अर्थात पैस्याची लाच देवून त्यांना तयार केले. आणि परत एक वर्ष नंतर त्याच ठिकाणी गेला जिथे त्याला मुलगी आवडली होती. मोठ्या तोर्याने त्याने त्याचा काका आणि मामा बरोबर जावून मुलीच्या पालकाशी लग्नाची गोष्ट केली. या वेळेस मात्र सरकारी नोकरी माझ्या मित्राला असल्या कारणाने त्यांनी नकार दिला नाही(जी खरोखर नव्हती). त्यांनी सुरत म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये चौकशी केली. आणि त्यांना खरे वाटले. शेवटी  सासर्याने सर्व काही लग्नाचा खर्च केला कारण त्याला सरकारी नोकरीवाला नवरा मुलगी साठी पाहिजे होता आणि तो मिळाला देखील.दीड वर्ष तो सुरत मध्ये राहिला, पण त्याला भीती देखील वाटत होती कि जर मुलीच्या बापाला माहित झाले तो फ्रोड चा केस दाखल करेल. त्यामुळे त्याने लग्न झाले असून हि कोर्ट मेरीज केले. आणि लग्नाचे प्रमाणपत्र मिळवून घेतले.तेथे  सही करण्यासाठी माझे मित्र हजर राहिले होते. पण तसे काही झाले नाही जशी त्याला भीती होती. मुलगी सुखात होती. कोणतेही टेन्शन नव्हते. आणि बराबर दीड वर्ष नंतर तो कोल्हापूर परत स्वतः च्या घरी स्थायी झाला. सासर्यास माहित झाले. पण करणार काय  ?  त्याला मुलगी आनंदात दिसली. सर्व काही ठीक ठाक दिसले. शेवटी जी परिस्थिती होती ती त्याने मान्य केली. आज हि त्यांचा संसार सुखात चाललेला आहे. त्यांची लग्नाची एनिवर्सरी असली की त्या दिवशी ते आठवण करून मला फोन जरूर करतात. थोडक्यात, असे लोक पण सरकारी नोकरी चा भूत पळविण्यासाठी जवाबदार म्हणता येतील. हे गोविंदाच्या "कुली नंबर वन" नावाच्या चित्रपटात होते तसे झाले. पण प्रत्येकाचे तसे नशीब नसते. नाव त्याचे विनोद होते, पण त्याने गंभीर विनोद करून सुखद अंत आणला.  कित्येक मुलीचे पालक फसून हि जातात. डोळ्यावर सरकारी नोकरीचा लालचचा  काळा पट्टा असल्या कारणाने.  

1 टिप्पणी:

  1. सत्यपरिस्थिती आहे
    अजून ह्या सरकारी नोकरीचे गरुड काही केल्या सुटत नाही.

    उत्तर द्याहटवा