रविवार, २९ जानेवारी, २०१२

देर से आए पर दुरुस्त आए

आज शाळेत ओपन हाउस होते. अर्थात मुल व मुलींचे पालक त्यांनी उत्तर वहीत परीक्षेत काय लिहिले ते पाहण्यासाठी येतात. सकाळी आठ ते दहा पर्यंत कार्यक्रम चालला.आणि साडे दहा पर्यंत मी फ्री झालो. वाटले आज थोडा फार आराम करणार आणि काही वाचन करायचे होते ते करणार. एकाद तासांनी घरी पोहचलो. हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. तोच समोरून डॉक्टरचा फोन आला. त्यांनी मला डोळे तपासनीस बोलावले होते. जेवण करता करता रेल्वेचा टाईम टेबल पाहू लागलो. पाहतो तर फक्त २० मिनिटे बाकी होती ट्रेन सुटायला. मग मला जेवण सोडून द्यावे लागले. घाईतच कपडे बदलले , बूट घातले काळा चष्मा लावला आणि निघालो. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी रिक्षेत बसलो. रीक्षा चालकाला त्वरेने नेण्यासाठी मी विनंती केली. पण तो जशी बैल गाडी चालते तशी रिक्षा चालवत होता. मी त्याला दोन वेळा विनंती केली. पण तेच. शेवटी कंटाळून ती रिक्षा सोडली आणि दुसरी रिक्षेत बसलो.त्याने वेगाने चालवली रिक्षा, पण ट्राफिक मुळे उशीर झाला. स्टेशन च्या गेट पर्यंत पोहचलो तेवढ्यात तर गाडी प्लेटफोर्म वर आली. सूदैवाने तिकीट विंडो वर गर्दी नव्हती. पटकन तिकीट काढले आणि दोन नंबरच्या प्लेटफोर्म कडे धाव घेतली. धावत असतांना मी विसरलो कि मी रेल्वे ट्रेक क्रॉस करून पडत होतो. आणि त्याच ट्रेक वर मुंबई (विरार) - भरूच शटल वेगाने येत होती.ते दृश्य पाहून दोन्ही प्लेटफोर्म वरचे लोक जोराने ओरडू लागले. तेव्हा माझे समोर येणारी ट्रेन वर लक्ष गेले. आणि समय सूचकता वापरून ट्रेक वरून बाजूला झालो.मी फार काही तरी अनुभवले त्या एक क्षणात. मला वाटले जीव गेला आणि परत आला त्या एका क्षणात. मी स्तब्ध होतो. जवळचे रेल्वे पोलीस माझ्या कडे आले. आणि हाथ धरून समोरच्या प्लेटफोर्म वर घेवून गेले व बाक वर बसवले. त्यांनी मला सांगितले कि हा चमत्कार आहे कि तू वाचला. पुढे असे करू नको. तुझी गाडी सुटत असेल तर सुटू दे, सुटलेली गाडी परत मिळेल पण शरीरातील जीव नावाची गाडी जर एकदा जीवनाच्या प्लेटफोर्म वरून गेली तर कधी परत येत नाही.मी त्यांचा आभार व्यक्त केला आणि समोर उभी असलेल्या गाडीत जावून बसलो. या घटने मुळे सर्व लोकांची दुर्ष्टी माझ्यावरच होती. मधेच शाळेतील एक शिक्षक भेटले त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यात. अर्धा तास नंतर माझे stop आले मी उतरलो.रोटरी आय हॉस्पिटल जाण्यासाठी रिक्षेची वाट पहिली. पण एक पण रिक्षा चालक ४० किवा ५० रुपया खाली बसवायला तयार नव्हता.जिथे जाण्यासाठी किमान ५ रुपये लागतात तेवढ्या जागे साठी ५० रुपये ? मी पायीच निघालो. 
     जवळ जवळ २० मिनिटांनी तेथे पोहचलो.केस पेपर काढला आणि क्लिनिक मध्ये शिरलो पाहतो तर एक हि डॉक्टर नाही. त्यांची  Conference  चालली होती त्यामुळे मला वाट पहावी लागली.आणखी दोन तास झाले तेव्हा ते डॉक्टर आले. माझ्या अगोदरच काही पेशंट येवून बसलेले होते. ते एक एक करून मध्ये बोलावल्यावर जात होते.मी मात्र माझा नंबर कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. मध्ये मध्ये च दुसरे पेशंट येत होते. ते हि आत जात होते. मी विचार केला नंतर येणार्यांना आत बोलावत आहे मला का बोलावत नाही ?आत वार्ड रूम मधेय जावून  नर्स ला दोन वेळा विचारले. दोन्ही वेळा तिने सांगितले "डॉक्टर बोलावतील तुम्हास ..थोडे थांबा." परत बाक वर जावून बसलो.समोर एक सतरा - अठरा वर्षाची मुलगी आणि ३५ ते ३६ वर्ष  वयोगटातील स्त्री येवून बसली. दोन्ही एन आर आई होते. त्या मुलीच्या आई ला गुजराती बोलता येत होते पण मुलीला अजिबात गुजराती समजत नव्हते आणि बोलता पण येत नव्हते म्हणून ते इंग्लिश मधून संभाषण करत होते. मी काळा चष्मा घातला होता म्हणून त्यांना वाटत होते कि माझे लक्ष त्यांचावरच आहे.कदाचित ती स्त्री माझा तिरस्कार करत होती. माझ्या कडे पाहून ती स्त्री तिच्या मुलीला स्थानिक लोका विषयी बरे वाईट सांगू लागली.मला तर रागच आला होता. पण काही न बोलण्याचे योग्य वाटले आणि बसून राहिलो.माझा नंबर आला आत गेलो.तपासणी झाली , औषध घेतली आणि निघालो स्टेशन कडे. त्या दोन्ही एन आर आई माय लेकी देखील माझ्या मागे निघालेत. योगानु-योग त्यांनाही स्टेशन जावयाचे होते म्हणून एकाच रिक्षेत बसलो. त्या स्त्रीला वाटले मी गुजराती असावा म्हणून तिने मला प्रश्न केला "तमे गुजराती  छो ?"(तुम्ही गुजराती आहात का ?) मी प्रत्युत्तर दिले "हु भारतीय छु." (मी भारतीय आहे.) आणि मी स्थानिक व्यक्ती आहे. त्या स्त्रीला अपमानास्पद वाटले आणि तिने बोलणे बंद केले. तिच्या मुलीला माझ्या विषयी बरे वाईट इंग्रजी तून सांगू लागली.मी फक्त ऐकत होतो. स्टेशन आले. रिक्षे चे पैसे दिले आणि पुढे निघालो.तिच्या कडे सुटे पैसे नव्हते म्हणून रिक्षा चालक डोके लावू लागला. मी मागे वळून तो प्रकार पाहिला आणि स्वतः समोर जावून त्या दोघांचे हि  दहा रुपये रिक्षा चालकाला दिले. आणि घाईत  प्लेटफोर्म कडे निघालो. त्या दिवशी मला तर असे वाटले कि माझ्या नशिबाच्या रेघा मधून त्या दोन्ही व्यक्ती निघणार नव्हती. कारण ज्या ट्रेन मध्ये मी बसलो त्याच ट्रेन वर ते पण मागो माग आले. मी दहा रुपये जरी दिले तरी ती स्त्री (मुलीची आई) मला थेंक यु म्हणायला पण तयार नव्हती.. गच्च गर्दी असल्याने लोक एक मेकांना लोटत होते. आणि त्यांना भारतातील अशी धक्का बुक्कीची सवय नव्हती.मी त्या मुलीला माझ्या जागेवर बसण्याचा इशारा केला.अगोदर तिने नाकारले .थोड्या वेळाने गर्दी जास्त वाढली , मी परत इशारा केला, तेव्हा ती मुलगी येवून बसली. मी मात्र उभा राहिलो.पंधरा मिनिटे झाली माझे स्टेशन येणारच होते. मी त्या स्त्री जवळ गेलो आणि म्हटले "which ever place you go to visit, never ever insult of there local people. There will not be always a gujarti to help you. there will be only an indian and that indian means a local people. at lest don't teach your child to wrong things about local people. you also belongs to same locality before being a foreigner." ती स्त्री अवाक च झाली होती. तिने देखील काळा चष्मा घातला होता . तो चष्मा डोक्या वर करून तिने खाली मान घातली. तेव्हा ती मुलगी मला मात्र "thanks" म्हटली.मी वेल कम म्हटले आणि उतरलो. कदाचित त्या स्त्रीला चुकी कळली असेल त्या मुळे तिने खिडकी मधूनच "बाय" चा इशारा केला. तेव्हा वाटले कि आता ती स्त्री कोणाचाही अपमान करणार नाही.चलो कोई बात नाही "देर से आये पर  दुरुस्त आये"                                                 

1 टिप्पणी: