गुरुवार, १ डिसेंबर, २०११

कोलावेरी कोलावेरी दी .

     बऱ्याच दिवसानी येथे परत फिरत आहे. मागचा सम्पूर्ण एक महिना नुसत्या ह्या गावी तर त्या गावी मुलगी पाहण्यात पसार  झाले. त्यात ही बऱ्याच रसप्रद घड़ा मोड़ी झाल्यात. ती चर्चा नंतर कधी करेल. तर सध्या वळूया   आजच्या विषया वर .
      आज सकाळी ८.०५ ला अकरावीच्या वर्गात कॉम्पुटर चा  दुसरा तास होता. नेटवर्क चा टोपिक चालला होता. चर्चा चालू होती. मधेच काही मुली हळू हळू त्यांच्या चर्चा खाली मान घालून करत होते. अगोदर तर मी त्यांना ध्यानात घेतले नाही. पण जवळ जवळ पाच मिनिटे पसार झाली असतील आवाज वाढला. साहजिक पणेच त्या मुलीना उभे केले आणि रागावून वर्गाच्या बाहेर जाण्याचा इशारा केला.पण तरी जाताना एक मुलगी बोलली. "बस का सर !! कोलावेरी ?!!" . मी स्तब्ध झालो. मला काही समजलेच नाही. म्हणून मी काही प्रत्युत्तर दिले नाही. पुढे चर्चा करून नेटवर्क चा टोपिक संपवला. वर्गाच्या बाहेर आलो. तेव्हा दुसरी मुलगी म्हणाली, ""सर डोन्ट कोलावेरी ..." . आता तर माझ्या डोक्याचा एक एक तंतू हलला होता. डोके खाजवत स्टाफ रूम मध्ये शिरलो. सतत विचार करत राहिलो. काय आहे हे कोलावेरी. उत्तर शोधण्या साठी सरळ कॉम्पुटर लेब मध्ये दाखल झालो आणि गुगल वर सर्च केले. पाहतो तर कोलावेरी नावाने एक तमिळ चित्रपटाचे गाणे होते ते. आणि त्याचा अर्थ होता "अगदी संतापाने एखाद्याच्या खून करणार तेवढ्या रागाने पाहणे". मला समजले त्या मुलीना काय सांगायचे होते. 
     इंटरनेट वर सध्या या कोलावेरी ने धूम केली आहे. सर्वत्र तेच. शाळेत , रोडवर, कॉलेज मध्ये, हॉटेल मध्ये, बस मध्ये, एखादा नमुना जर रिंग टोन ठेवत असेल तर हीच "कोलावेरी". तसे पहिले तर वास्तविक अर्थ या गाण्याचा बर्याच लोक्कांना माहीत  नाही पण नुसती धून आवडते म्हणून ऐकायचे आणि आनंदाने मान हलवायची किवा अंग मोडायचे. मी देखील समजण्यासाठी पाच वेळेस ऐकले तरी अमुक शब्द मला समजले नाही. शेवटी इंटरनेट वरून लीरीस शोधून वाचले तेव्हा कळले की कोलावेरी ही काय भानगड आहे. 


२ टिप्पण्या: